Horoscope (Marathi) – December 2018

राशीभविष्य - डिसेंबर २०१८

मेष

मेहनत, कामातील सातत्य व अनुभव याच्या जोरावर यशाकडे तुम्ही वाटचाल करू शकाल. बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय घ्या. तुमचे म्हणणे खोटे पाडण्याचा प्रयत्न ह्या महिन्यात होण्याची शक्यता आहे.


वृषभ

‘अतिपरिचयात अवज्ञा’ हे लक्षात ठेवूनच ह्या महिन्यात मार्गक्रमण करणे उचित ठरणार आहे. अधिकाराच्या मर्यादेची चौकट ओलांडू नका. झटपट लाभ, प्रलोभने यापासून चार हात दूरच राहा. आहारावर नियंत्रण आवश्यक.


मिथुन

ह्या महिन्यात कार्यपूर्ततेचा आनंद आपण अनुभवणार आहात. एखाद्या जवळच्या व्यक्तींकडून अनपेक्षित वागणूक मिळाली तरी संयम ठेवा. विरोधकांच्या वाढत्या कारवायांकडे दुर्लक्ष नको. महिलांना काही नव्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.


कर्क

महिन्याच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे हाती घेऊ नका. उत्तरार्ध अनुकूल असल्यामुळे आर्थिक निर्णयांची अंमलबजावणी करणे हितावह ठरेल. मैत्रीत अतिविश्वास घातक ठरू शकतो.


सिंह

कौटुंबिक पातळीवर सहकार्याची अपेक्षा सध्यातरी न करणे योग्य. विरोधकांच्या कारवाया वाढणार आहेत. घर, जमीनजुमल्याची कामे लांबणीवर टाका. प्रवासात अनपेक्षित त्रास संभवतो.


कन्या

ह्या महिन्यात आर्थिक चणचण जरी जाणवणार नसली तरी अवाजवी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. पूर्वार्धात कामे मनाजोगती पार पडतील. उत्तरार्धात काही अप्रिय घटना संभवतात. आर्थिक व्यवहार लेखी स्वरूपात करण्यावर भर द्या.


तूळ

नवीन परिचित व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊन नको ते आश्वासन देऊ नका वा एखादा मनाविरुद्ध निर्णय घेऊ नका. कामात दगदग, धावपळ होईल. कौटुंबिक पातळीवरील छोटे-मोठे वाद उग्ररूप धारण करणार नाहीत हे पाहा.


वृश्चिक

आपल्या कृतीने वा बोलण्याने कुणाचे मन दुखावले जात नाही ना, याची दक्षता सध्या घेणे आवश्यक आहे. रक्तदाबासारख्या विकारावर त्वरित इलाज योजा. महिलांना धार्मिक कार्यातील सहभागाने मानसिक समाधान लाभेल.


धनु

ह्या महिन्यात काहींना कामानिमित्त प्रवास संभवतो. आवडत्या व्यक्तीचा वियोग सहन करावा लागेल. आर्थिक कमाई मनाजोगती होईल. अपचनाच्या विकारांना वेळीच आवर घाला.


मकर

यशोन्नतीचा सध्याचा काळ आहे. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडतील. तुमच्या यशाचा अधिक बोलबाला करू नका. घरात शुभकार्ये ठरतील. मित्रपरिवारात वावरताना थोडा सावध पवित्रा घ्या.


कुंभ

एकीकडे काही आनंददायी घटना घडतील मात्र त्याच वेळी काही प्रिय व्यक्तींकडून अप्रिय वागणे घडल्यामुळे मन नाराज होईल. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य द्या. घराचे प्रश्न मार्गी लागतील.


मीन

ज्या व्यक्तींचा सहवास तुम्हाला आनंद देतो, अशा व्यक्तींच्या गाठीभेटी ह्या महिन्यात होतील. महिन्याचा उत्तरार्ध अधिक उत्साहवर्धक असा आहे. मुलांची प्रगती समाधानकारक असेल. धनप्राप्ती चांगली होईल.