Horoscope (Marathi)- August 2018

राशीभविष्य - ऑगस्ट २०१८

मेष

कार्यक्षेत्रात कोणत्याही दडपणाविना काम करा. वरिष्ठांशी केलेली सल्लामसलत उपयुक्त ठरेल. आर्थिक काटकसरीने केलेला एखादा व्यवहार अंगलट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रमंडळींकडून  अधिक अपेक्षा नकोत.

 


वृषभ

कामाचा व्याप व वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मनस्ताप टाळण्यासाठी कौटुंबिक वाद लवकरात लवकर कसे मिटतील, हे पाहा. आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.


मिथुन

महिन्याच्या पूर्वार्धात आर्थिक व्यवहारात अधिक सावध राहावे लागेल. उत्तरार्धात ग्रहमानाची साथ लाभत आहे. तुमच्या शब्दाला किंमत प्राप्त होईल. जमीन-जुमल्याच्या कामात प्रगती संभवते.


कर्क

नोकरी-व्यवसायात अपेक्षित संधी चालून आल्याने कामाचा उत्साह वाढेल. आपल्या योजना, निर्णय याबाबत गुप्तता बाळगा. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. ओळखीत देवघेवीचे व्यवहार टाळा.


सिंह

आत्मविश्वासपूर्वक केलेली कामे यशस्वी होतातच. कामानिमित्त घरापासून लांब जावे लागण्याची शक्यता आहे. आर्थिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींवर बारीक लक्ष हवे. मित्रपरिवारात वादविवाद टाळावेत.


कन्या

लोभापायी कुठल्याही मोहात अडकू नका. तुमचे कर्तृत्व आणि जिद्द यांच्या जोरावर सरशी तुमचीच होईल. ग्रहमान अनुकूल आहे. कार्यक्षेत्रातील प्रगतीचा वेग चांगला असेल. आर्थिक पातळी उंचावेल.


तूळ

‘तुमचे निर्णय तुम्हीच घ्या’ असे ह्या महिन्याचे तुम्हाला सांगणे आहे. नातेवाईकांच्या हस्तक्षेपाला वेळीच आवर घालणे तुमच्या हिताचे ठरेल. नोकरी-व्यवसाय क्षेत्रात कार्य मनाजोगते होईल. कोर्टकचेरीतील प्रकरणे तडजोडीने मिटवा.


वृश्चिक

बऱ्याच महिन्यांपासून अपेक्षित असलेली गोष्ट ह्या महिन्यात घडून येईल. आर्थिक प्राप्तीत वाढ होईल, मात्र वरिष्ठांशी वा तज्ज्ञांशी सल्लामसलत न करता निर्णय घेणे घातक ठरेल. विरोधकांवर मात करणे कठीण जाणार नाही.


धनु

ह्या महिन्यात छोट्याशा कामालाही मोठी शक्ती लावावी लागेल. थोड्याशा प्रतिकूलतेने अजिबात नाराज होऊ नका. कठोर बोलणे टाळलेत तर निर्णय तुमच्या बाजूने लागेल. कौटुंबिक जीवनात गैरसमजाला थारा देऊ नका.


मकर

अति आत्मविश्वास हा कधीही घातकच असतो. सध्या, थोड्या सावधगिरीने वागण्याचा काळ आहे. आपले म्हणणे खरे करण्यात आग्रही राहिलात तर नाहक नुकसान होण्याची शक्यता जाणवते.


कुंभ

ह्या महिन्यात ध्येयपूर्तीचा आनंद तुम्हाला उपभोगता येणार आहे. मिळणारे यश आणि विरोधकांचा पाडाव यामुळे तुमची घोडदौड जोरात होणार आहे. मैत्रीतील मतभेदास खतपाणी घालू नका.


मीन

महिन्याच्या पूर्वार्धातील एखादी अप्रिय घटना वगळता महिना चांगला जाईल. उत्तरार्धात मनाजोगती कार्यसिद्धी होईल. विविध मार्गांनी आर्थिक लाभ संभवतो. कायद्याचे उल्लंघन मात्र करू नका.