मेष
मन शांत ठेवून निर्णय घेतल्यास बरेच काही साध्य करू शकाल.महिन्याच्या पूर्वार्धात आर्थिकप्राप्ती चांगली झाल्याने हाती पैसा खेळेल.उत्तरार्धात काही अप्रिय घटनांमुळे मन थोडे विचलित होईल.युक्तीने मार्ग काढा.
वृषभ
थोरामोठ्यांची कृपा आणि अधिकारात झालेली वाढ यामुळे कामातील उत्साह वाढून यशस्वीतेचे प्रमाण वाढणार आहे. कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांबरोबरचे मतभेद वेळीच मिटवा. उत्तरार्धात कौटुंबिक आनंदात भर टाकणारी एखादी घटना घडेल.
मिथुन
पैशाचा योग्य विनियोग करणे जो जाणतो तोच आर्थिक समस्यांवर सहज मात करू शकतो.सध्या हाती असलेल्या पैशाचा विचारपूर्वक वापर करा.सरकारी कामात यश मिळेल.
कर्क
या महिन्यात ज्या नवीन क्षेत्रात प्रवेश कराल तेथे यशस्वी व्हाल.तुमच्या कष्टाचे चीज झाल्याने समाधान मिळेल.सामाजिक कार्यात नावलौकिक होईल.पोटाच्या तक्रारी वाढतील.महिलांनी कर्तव्य-पालन करताना आरोग्याकडेही लक्ष द्यावे.
सिंह
कार्यक्षेत्रात मानापमानाला महत्त्व देणे आपल्या प्रगतीला बाधक ठरेल.महत्त्वाचे निर्णय घेताना भावनेच्या आहारी जाऊ नका.एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल.कौटुंबिक जीवनात सामंजस्याचे धोरण अवलंबावे लागेल.
कन्या
कौटुंबिक गैरसमज हे अधिक मनस्ताप देणारे असतात,ते नक्कीच टाळा. सामाजिक क्षेत्रात तुमच्या ज्ञानाचा आदर केला जाईल.योजनेचा सखोल अभ्यास केल्याशिवाय गुंतवणुकीचा निर्णय घेऊ नका.प्रवासात तब्येत सांभाळणे आवश्यक आहे.
तूळ
सर्व काही सुरळीत चालू असताना ‘हातचे सोडून पळत्याच्या पाठी’ लागू नका.प्रलोभने, झटपट पैसा मिळण्याचे मार्ग यापासून दूरच राहा.सध्या तरी ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवणे अधिक सुखावह, फलदायी असेल.
वृश्चिक
मित्रपरिवारात दाखविलेला अतिविश्वास अंगलट येण्याची अधिक शक्यता आहे.कौटुंबिक पातळीवरही काही तडजोडी कराव्या लागतील.उत्तरार्धात कामाचा वेग वाढेल.खोळंबलेली कामे मार्गी लागतील.धनप्राप्तीही होईल.
धनु
ग्रहमानामुळे काहीसे त्रस्त होण्याची वेळ तुमच्यावर या महिन्याच्या पूर्वार्धात येईल असे दिसते.आर्थिक निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.संयमाने वागावे लागेल. शाब्दिक चकमकी टाळा.उत्तरार्ध सुखावह व फलदायी राहील.
मकर
पैसा म्हणजेच सर्वस्व नाही. प्रसंगी पैशापेक्षा चांगले संबंध किती महत्त्वाचे ठरतात,याची प्रचिती या महिन्यात तुम्हाला येईल.कार्यक्षेत्रातील गुप्तशत्रूंच्या हालचाली थंडावतील.कुटुंबातील इतरांच्याही भावनांचा आदर करा.
कुंभ
तुमच्या नियोजनपूर्वक केलेल्या योजनांना यश येणार आहे.नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या संधी येतील.उत्तरार्धात कौटुंबिक पातळीवर काही आनंददायी घटना घडतील.महिलांचा धार्मिक कार्यात सहभाग राहील.
मीन
आपल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.तुमची तब्येत हा नाजूक विषय.सांप्रत आहाराविहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यास प्रवासात मनमुराद आनंद उपभोगता येईल.उत्तरार्धात मित्रपरिवारात वावरताना मर्यादांचे भान असू द्या.