Horoscope (Marathi)- April 2018

राशीभविष्य - एप्रिल २०१८

मेष

आपल्या कामाचा वेगव दर्जा उंचावणे सध्या जरुरीचेआहे.जवळच्यांपैकी कोणी वेगळावागत-बोलत असेल तर तो विषययुक्तीने हाताळा. अपचनाच्यात्रासाकडे दुर्लक्ष करू नका.चैनीच्याखर्चावर नियंत्रण हवे.


वृषभ

ह्या महिन्यात लाभलेल्याग्रहमानाचा योग्य फायदा उठवूनतुम्ही तुमचे यश खेचून आणण्यातयशस्वी व्हाल.काही कमावण्याकरिताकाही गमवावे लागते, हे जाणून वागलात तर मनस्ताप टाळू शकाल.


मिथुन

गुरुचे पाठबळ ही ह्यामहिन्याची जमेची बाजू होय. समाजातील थोरामोठ्या व्यक्तींशीअसलेले संबंध उपयोगी पडतील. घरात एखादे शुभकार्य ठरेल.कौटुंबिक पातळीवर मात्र थोडी अस्थिरता संभवते.


कर्क

मंगळ चांगली अर्थप्राप्ती करून देण्याससहाय्यकारी ठरेल.उत्तरार्धात रविची मिळणारी साथही उपयोगी पडेल.नातेवाईकांपासून थोडा मनस्तापजरूर होईल, मात्र संयमाने वागल्यासत्याची तीव्रता कमी होईल.


सिंह

व्यवहार सावधपणे करा,असे ह्या महिन्याचे सांगणे आहे.विरोधक थोडे वरचढ होण्याचीशक्यता आहे.शब्दाने शब्द न वाढवतामुद्देसूद मांडणी करून बाजी मारता येईल.उत्तरार्धात धनप्राप्ती संभवते.


कन्या

आप्तेष्टांबरोबरचेमतभेद इतरांकडे बोलून दाखवूनका, परिस्थिती जास्त कठीण होईल.घरातील काहींच्या आजारपणामुळेतुमच्या दैनंदिन वेळापत्रकावरपरिणाम होण्याची शक्यता आहे.केलेली गुंतवणूक उपयोगी येईल.


तूळ

जीवनप्रवासात चढउतारहे असतातच.ह्या महिन्यात ग्रहमानाच्या अनुकूलतेचा प्रत्यय तुम्हाला विविध पातळ्यांवर अनुभवता येईल.उत्तरार्धात आप्तेष्टां बरोबरी मतभेद लवकरात लवकर मिटवावेत. गुंतवणुकीचे प्रमाण वाढवा.


वृश्चिक

या महिन्याच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध अधिक उत्साहवर्धक आणि प्रगतिकारक आहे.मित्रपरिवारातील एखाद्या व्यक्तीच्यात ऱ्हेवाईक वागण्या बोलण्याने तुम्हीथोडे नाराज होण्याची शक्यता जाणवते.कायद्याचे पालन करा.


धनु

‘सावध तो सुखी’ हे तुम्ही जाणताच.सध्या अधिक सावध राहा, असे ग्रहमानाचे तुम्हाला सांगणे आहे.जवळची म्हणवणारी एखादी व्यक्ती तुमच्या विरोधी कारवायांत गुंतली असण्याची शक्यता आहे.प्रवासात पैसे सांभाळा.


मकर

मनाजोगती आर्थिकप्राप्ती झाली की होणारा आनंद काहीन्याराच असतो.सध्या तुम्हा लोकांनाअसाच काहीसा अनुभव येणार आहे.पूर्वार्ध अधिक उत्साहवर्धक असेल.उत्तरार्धात जमिनीचे व्यवहार टाळा.


कुंभ

राहुच्या अनुकूलतेचाफायदा या काळात तुम्हालामिळेल.रेंगाळलेली कामे मार्गीलागतील.अल्पपरिचित व्यक्तीवरविश्वास ठेवून व्यवहार करू नका.मंगळाच्या अनुकूलतेमुळे आर्थिकविवंचनांची तीव्रता कमी होईल.


मीन

आपले म्हणणे कधीव कसे मांडायचे, हे ठरवूनवागलात तर बऱ्याच समस्या कमी होतील गुप्तशत्रूंपासून सावध राहा.विवाहेच्छुकांना अनुरूप जीवनसाथीमिळेल. नेत्रविकाराचे त्रास संभवतात.