Weekly Horoscope – May 2017

साप्ताहिक राशीभविष्य – २८ मे ते ३ जून २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

बुध-शुक्र-हर्षल प्रथम, रवि द्वितीय, चंद्र-मंगळ पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र-राहु पंचम, चंद्र-गुरु षष्ठ, शनि-प्लुटो नवम, नेपच्यून-केतू लाभ, शुक्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होता कामा नये. शिक्षणाच्या निमित्ताने प्रवास होतील. अर्थाजनांतील गोंधळाची स्थिती विचारपूर्वक हाताळा. मरगळ झटकून अर्थाजन कसे होईल याचा विचार करा. पैशासाठी तगादा लावा. प्रेमात विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घ्या. प्रेमांच्या माणसांशी तुटक वागू नका. वैवाहिक जीवन सुखावह असेल. पतीपत्नीनी किरकोळ गोष्टीवरुन वाद घालणे टाळावे. व्यवहाराच्या कायदेशीर बाबीकडे लक्ष द्या. कामात निर्माण होणारे अडथळे सहकाऱ्यांच्या मदतीने दूर करु शकाल.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

रवि प्रथम, चंद्र-मंगळ द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र-राहु चतुर्थ, चंद्र-गुरु पंचम, शनि-प्लुटो अष्टम, नेपच्यून-केतू दशम, शुक्र लाभ, बुध-शुक्र-हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. आरोग्याच्या तक्रारींचा घाबरुन न जाता मुकाबला करा. आरोग्यविषयक तपासण्या करण्यात टाळाटाळ करु नये. झोपेचे तंत्र सांभाळा. कुटुंबातील आपली एकरुपता काहीशी कमी जाणवत आहे. गोंधळलेल्या स्थितीचा त्याग करा. एक दुसऱ्यांचे स्वभाव जुळत नसतानासुध्दा प्रत्येकाशी जुळवून घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांना अध्ययनात योग्य यश प्राप्त करता येईल. प्रयत्न चिकाटी व सातत्य हवे. काम योग्य वेळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणाला ही आश्र्वासन देऊ नका. आपल्या कार्याची योजनांची गुप्तता पाळा.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
मिथुन

चंद्र-मंगळ प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र-राहु पराक्रम, चंद्र-गुरु चतुर्थ, शनि-प्लुटो सप्तम, नेपच्यून-केतू नवम, शुक्र दशम, बुध-हर्षल-शुक्र लाभ, रवि व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. डोके शांत ठेवून वागणे श्रेयस्कर राहील. उष्णतेच्या त्रासापासून जपावे. प्रकृतीची काळजी अवश्य घ्यावी. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. तुमच्यात असलेली विवेकबुध्दी वापरुन तुम्ही अशक्य कठीण परिस्थितीवर मात करु शकाल. सबुरीचे धोरण स्विकारा ज्येष्ठांचा सल्ला घ्या. सलोखा व न्यायबुध्दीचा वापर करा. जुन्या घरासंबंधीचे सर्व प्रश्न मनासारखे सुटतील. घरातील वातावरण सौम्य ठेवण्याचा प्रयत्न करा. बुध्दीचातुर्याने पैलूंचा विकास करा. अभ्यासात घाई गर्दी करणे योग्य नाही.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क

चंद्र प्रथम, चंद्र-राहु द्वितीय, चंद्र-गुरु पराक्रम, शनि-प्लुटो षष्ठ, नेपच्यून-केतू अष्टम, शुक्र नवम, बुध-शुक्र-हर्षल दशम, रवि लाभ, चंद्र-मंगळ व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. स्वभावात काहीसा तापटपणा येईल. एकटयाने राहून अस्वस्थता वाढवून घेऊ नका. रागावर आणि चिडचिडीवर नियंत्रण ठेवा. स्वत:च्या बोलण्याने शत्रुता वा कटूता वाढवू नका. कौटुंबिक प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या. वादविवादाचे प्रसंग टाळा. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकू नये. लेखी व्यवहारात चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. कामाचा उरक जास्त राहिल. वरिष्ठांना विश्वासात घेऊन आपली अडचण सांगा. त्यांच्या मधील गैरसमज दूर करा. थोडे नमते घ्या.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                     सिंह

राशीस्थानी चंद्र-राहु, चंद्र-गुरु द्वितीय, शनि-प्लुटो पंचम, नेपच्यून-केतू सप्तम, शुक्र अष्टम, बुध-शुक्र-हर्षल नवम, रवि दशम, चंद्र-मंगळ लाभ, चंद्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. पैशाचा सततचा ओघ लक्षात घेता भविष्यकालीन योग्य गुंतवणूक हितकारक आहे. नातेवाईकांपासून आर्थिक व्यवहारात सावध रहावे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आपली हुकूमशाही आवरा. सहजीवन म्हणजे तडजोड हे लक्षात ठेवा. कामावर असलेली जबाबदारी स्विकारा. जबाबदारी निभावण्याची क्षमता आपल्यात पूरेपूर आहे. प्रेम करताना योग्य व्यक्तिची निवड करा. एक दुसऱ्याचा विश्वास संपन्न करा. व्यवसायातील प्रगतीचा आलेख गतीमान राहील. सहकाऱ्यांबरोबर वादविवाद करु नका . नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत चंद्र-गुरु, शनि-प्लुटो चतुर्थ, नेपच्यून-केतू षष्ठ, शुक्र सप्तम, बुध-शुक्र-हर्षल अष्टम, रवि नवम, चंद्र-मंगळ दशम, चंद्र लाभ, चंद्र-राहु व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. व्यायामाची आवड निर्माण करा. नेहमी सकस व ताजे अन्न खाल्ले पाहिजे. आपले वजन नियंत्रणात ठेवा. घरात लवचिक धोरण ठेवा. भावाबहिणीशी काही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी नवे वेळापत्रक तयार करावे. विद्यार्थ्यांनी काही तरी नवे शिकण्याचा प्रयत्न करावा. साथीदाराच्या कामाचे कौतुक करा. आपल्या वागण्यात बदल आणा. जीवनसाथीचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या. सामाजिक कार्यातून लाभ होईल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

पराक्रमात शनि-प्लुटो, पंचमात नेपच्यून-केतू, शुक्र षष्ठ, बुध-शुक्र-हर्षल सप्तमात, रवि अष्टमात, चंद्र-मंगळ नवमात, चंद्र दशमात, चंद्र-राहु लाभात, व्ययात चंद्र-गुरु अशी ग्रहांची ठेवण असेल. अध्यात्मिक क्षेत्रात करत असलेल्या प्रयत्नाना उत्तम यश लाभतील. विद्यार्थ्यांनी बाहेरील मोहजालापासून स्व:ला अलिप्त ठेवून आपले सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे. विद्यार्थ्यांनी मनाची एकाग्रता ठेवावी. प्रेम संबंधात सावधानतापूर्वक विचार करावयास हवा. दिलेला शब्द पाळण्याचे कसोशीने प्रयत्न करा. जोडीदाराबरोबर अबोला टाळावा. पती-पत्नीनी प्रयत्नपूर्वक एकमेकांच्या आवडीनिवडी जपाव्यात व एकमेकांना सहकार्य करावे. महत्वाची मंजूरी अपेक्षित असेल तर ती मिळेल. मान सन्मान प्राप्त होईल. स्वत:जवळील कौशल्य वापरा.

मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

शनि-प्लुटो द्वितीय, चतुर्थात नेपच्यून-केतू, पंचमात शुक्र, षष्ठात बुध-शुक्र-हर्षल, सप्तमात रवि, अष्टमात चंद्र-मंगळ, नवमात चंद्र, चंद्र-राहु दशमात, लाभात चंद्र-गुरु असे ग्रहमान असतील. तुम्ही शारीरिक अडचण असल्यास ताबडतोब डॉक्टरी इलाज जरुर करावेत. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल  घडविण्याची गरज आहे. योगासनावर भर द्या. वाहन चालविताना काळजी घ्यावी. अधिक पैशाचा हव्यास टाळणे उचित होईल. आर्थिक गुंतवणूक करताना पूर्ण विचारंती करणे जरुरी आहे. कोणताही आर्थिक निर्णय ठामपणे घ्यावा. नोकरीतील घरसोड वृत्ती सोडून द्या. नोकरीत अशामुळे स्थिरता मिळत नाही. व्यापाऱ्यांनी करार करताना आपला धंदा कसा वाढेल याचा विचार करुन तसे करावेत.

मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

आपल्या राशीत शनि-प्लुटो, पराक्रमात नेपच्यून-केतू, चतुर्थात शुक्र, पंचमात बुध-शुक्र-हर्षल, षष्ठात रवि, सप्तमात चंद्र-मंगळ, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र-राहु, चंद्र-गुरु दशम अशी ग्रहांची रचना असेल. रेंगाळलेले काम पूर्ण करण्यांची संधी मिळेल. इतरांसाठी कठीण असणारे विषय तुम्ही सहजरित्या सोडवाल. नोकरीसाठीचा प्रयत्न यशस्वी होईल. व्यावसायिकांनी बाजारांतील अफवांवर विश्वास ठेवू नये म्हणजे आपल्यास कोणताही तोटा होणार नाही. काळानुसार बदलायला हवंच. घरगुती कामासाठी वेळ काढा. घरासंबंधीच्या गोष्टी हातावेगळ्या करु शकाल. प्रेमांच्या माणसांशी तुटक वागू नका. प्रेम प्रसंगामध्ये सावधगिरी बाळगा. जोडीदाराच्या इच्छापूर्ती साठी भेटवस्तूचा वापर करा. विरोधकांना संधी देऊ नका.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                       मकर

द्वितीयात नेपच्यून-केतू, पराक्रमात शुक्र, चतुर्थात बुध-शुक्र-हर्षल, पंचमात रवि, षष्ठात चंद्र-मंगळ, सप्तमात चंद्र, अष्टमात चंद्र-राहु, नवमात चंद्र-गुरु, व्ययस्थानात शनि-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. प्रकृती बाबतीत हयगय करु नये. आपल्या आरोग्यावर ताण वाढेल असे काम टाळा. बाहेरील खाण्यापेक्षा घरगुती जेवण व फलाहारावर भर द्या. खर्चावर बुध्दीचातुर्याने नियंत्रण आणा. जमेल त्या पध्दतीने थोडया थोडया आर्थिक गुंतवणूक करणे भविष्यासाठी हितकराक आहे. आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा नाहीतर जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा जवळ माणसे नसतील. संततीबाबत प्रश्न सुटतील. इतरांची अतिचिकित्सा करु नका. कोणावर अवलंबून राहणे टाळावे.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी नेपच्यून-केतू, द्वितीयात शुक्र, पराक्रमात बुध-शुक्र-हर्षल, चतुर्थात रवि, पंचमात चंद्र-मंगळ, षष्ठात चंद्र, सप्तमात चंद्र-राहु, अष्टमात चंद्र-गुरु, लाभस्थानी शनि-प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. घरातील वातावरण समाधानकारक असल्याने कौटुंबिक स्वास्थ लाभेल. कुटुंबासाठी इच्छित खरेदी कराल. कुटुंबात शुभकार्य होईल. नातलग, पाहुणे यांची भेट होईल. अर्थप्राप्तीसाठी सुयोग्य नियोजन करा. कोणताही आर्थिक व्यवहार अनोळखी व्यक्तीशी करु नका. प्रेम संबंधात एक दुसऱ्याचे सहकार्य महत्वाचे होईल. संयमाने साथीदारांशी वागल्यास प्रेमात वृध्दी होईल. जोडीदाराशी कुठल्याही खाजगी गोष्टी लपवू नका. जोडिदाराची काळजी घ्या व त्यांच्या मर्जीप्रमाणे वागून मार्ग काढा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

Pisces | Kalnirnay Horoscope
                        मीन 

आपल्या राशीत शुक्र, द्वितीयात बुध-शुक्र-हर्षल, पराक्रमात रवि, चतुर्थात चंद्र-मंगळ, पंचमात चंद्र, षष्ठात चंद्र-राहु, सप्तमात चंद्र-गुरु, दशमात शनि-प्लुटो, व्ययात नेपच्यून-केतू असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ वाढेल. घरच्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत. घरात ज्येष्ठांना चार सबुरीच्या गोष्टी सांगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिविकास हे ध्येय बाळगावे. विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक अभ्यासात मन रमवण्याचा प्रयत्न करावा. प्रेमाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. प्रिय व्यक्तीच्या लहानसहान अपेक्षांचा अंदाज घ्या. यंदा कर्तव्यअसणाऱ्यांना विवाहकारक योग येतील. वैवाहिक जीवनसाथी उदार अंतःकरणाचा व मुक्त विचारांचा असेल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

साप्ताहिक राशीभविष्य – २१ मे ते २७ मे २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

चंद्र-बुध-हर्षल प्रथम, चंद्र-रवि-मंगळ द्वितीय, मंगळ पराक्रम, राहु पंचम, गुरु षष्ठ, शनि-प्लुटो नवम, नेपच्युन-केतु लाभ, चंद्र-शुक्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. अनेक दिवसापासून जवळच्या प्रवासाला जाण्याचे आपले स्वप्न या आठवडयात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपल्या स्वभावातील अचानक होणाऱ्या बदलावर नियंत्रण ठेवावे लागेल. नाती टिकवण्यासाठी बोलण्यावर वचक ठेवा, शक्यतो दुखवू नका. घरातील वाद विकोपाला जाऊ देऊ नका. चोरटया प्रेमाचा मोह आवरता येणार नाही. प्रेम प्रसंगामध्ये सावधगिरी बाळगा. वैवाहिक जीवनात कटकटी होणार नाहीत याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात दुराव्याचे प्रसंग येतील. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

चंद्र-रवि-मंगळ प्रथम, मंगळ द्वितीय, राहु चतुर्थ, गुरु पंचम, शनि-प्लुटो अष्टम, नेपच्युन-केतु दशम, चंद्र-शुक्र लाभ, चंद्र-बुध-हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. स्वत:चे अस्तित्व राखून कामे करण्याची संधी मिळेल. आपल्य मित्रांना मदत करण्याची संधी मिळेल. अनाकलनीय खर्चाना तोंड द्यावे लागेल. आर्थिक स्थिती बलवान करण्याचा प्रयत्न करा. घरच्यांशी किरकोळ गोष्टीवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांवर अवलंबून राहू नका. मुलांना स्वत:विषयी काळजी घ्यायाला शिकवा. विद्यार्थ्यांनी बरीच अमिषे असली तरी अभ्यासात अधिक लक्ष द्यावे. स्वत:च्या हिंमतीने व स्वबळावर यश मिळवाल. शासकीय कागदपत्राबाबत काटेकोर असावे. काम करताना अपघात होणार नाही यांची काळजी घ्या.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

मंगळ प्रथम, राहु पराक्रम, गुरु चतुर्थ, शनि-प्लुटो सप्तम, नेपच्युन-केतु नवम, चंद्र-शुक्र दशम, चंद्र-बुध-हर्षल लाभ, चंद्र-रवि-मंगळ व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. जमिनीच्या मालमत्तेसाठी पैसा गुंतविण्याचा मानस राहील. खर्चापेक्षा बचतीकडे कल वाढवावा लागेल. मुलांना आयु्ष्यात ध्येय, उद्देश ठरवायला शिकवा. मुलांना योजना बनवायला शिकवा. नवीन रोजगार मिळू शकेल. कमी श्रमात बुध्दीकौशल्याने लाभ होतील. धंदा व्यवसायात मोठी जबाबदारी पेलावी लागेल. विकासाच्या वाटेवर थांबू नका. पुढे चालत राहा. मित्र परिवारांबरोबर व्यवहार करताना व्यसनापासून चार हात दूर राहणे फायद्याचे ठरेल. शक्यतो कोणाला जामिन राहू नये. कोणताही करार करताना दिशाभूल होणार नाही याची दक्षता घ्या.

ष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क

राहु द्वितीय, गुरु पराक्रम, शनि-प्लुटो षष्ठ, नेपच्युन-केतु अष्टम, चंद्र-शुक्र नवम, चंद्र-बुध-हर्षल दशम, चंद्र-रवि-मंगळ लाभ, मंगळ व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. आपल्या बोलण्याने कोणी दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. थोर व वयोवृध्द व्यक्तींचा अपमान होऊ देऊ नका. धंदा, व्यवसायात नोकरीत थोडी गोंधळचीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या शक्ती बाहेरची कामे तुम्हाला करावी लागतील. जबाबदारी वाढेल. आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने चालू राहणार नाहीत याची काळजी घ्या. व्यक्तीची पारख करुन मगच शब्द दया. जुन्या ओळखीचा फायदा करुन घेता येईल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                     सिंह

राशीस्थानी राहु, गुरु द्वितीय, शनि-प्लुटो पंचम, नेपच्युन-केतु सप्तम, चंद्र-शुक्र अष्टम, चंद्र-बुध-हर्षल नवम, चंद्र-रवि-मंगळ दशम, मंगळ लाभस्थानातून भ्रमण करणार आहेत. कौटुंबिक स्तरावर सुखासमाधानाचे वातावरण राहील. संततीच्या चुकांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. नातेवाईकांच्या वागण्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. नीट नियोजन करुन धनार्जनासोबत धन संचय करा. उसने पैसे देताना चार वेळेस विचार करावा. धार्मिक क्षेत्रांना तसेच वृध्दाश्रमास आर्थिक मदत करण्याची संधी मिळेल. अधिकार गाजवून प्रेम संपादन करता येत नाही. आपल्या वागण्यात बदल आणा. वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रेमाने वागा. कुटुंबातील त्यांच्या स्थानाची जाण करुन दया. त्यांच्यावर पूर्ण विश्र्वास टाका.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत गुरु, शनि-प्लुटो चतुर्थ, नेपच्युन-केतु षष्ठ, चंद्र-शुक्र सप्तम, चंद्र-बुध-हर्षल अष्टम, रवि-मंगळ नवम, मंगळ दशम, राहु व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. शारीरिक तक्रारीकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. आजार केव्हा बळावेल हे सांगता येणार नाही वेळीच वैद्यकीय तपासण्या करुन घ्या. घरच्याचे महत्वाचे सहकार्य मिळेल. नात्यात तोचतोचपणा आणायला आपणच जबाबदार असाल तेव्हा काहीतरी वेगळे करा. मातुल घराण्यात अस्वस्थता राहील. नातेवाईकांशी संभाषण विवाद टाळणे तुमच्या हिताचे ठरेल. प्रेम संबंधात एक दुसऱ्याचे सहकार्य महत्वाचे होईल. संयमाने साथीदारांशी वागल्यास प्रेमात वृध्दी होईल. जीवनसाथीच्या हदयात स्थान मिळवा. परस्परांच्या स्वातंत्र्याचा योग्य मान राखा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

पराक्रमात शनि-प्लुटो, पंचमात नेपच्युन-केतु, चंद्र-शुक्र षष्ठ, चंद्र-बुध-हर्षल सप्तमात, चंद्र-रवि-मंगळ अष्टमात, मंगळ नवमात, राहु लाभात, व्ययात गुरु अशी ग्रहांची ठेवण असेल. अतिश्रम,अशक्तपणा या गोष्टींची काळजी घ्यावी. किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास वैद्यकीय खर्च वाढतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाशिवाय यश नाही. शिक्षणाचा उपयोग अयोग्य कामासाठी करु नका. प्रेमसंबंधात मोहक व अती हळव्या साथीदारांशी संबंध असू शकतील. त्यांच्या भावनांची जपणूक करा. वैवाहिक जीवनात वादविवाद टाळा. जोडीदारास मानसन्मान द्या. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही यांची दक्षता घ्या. बोलण्याची धडाडी वाढेल व इतरांवर छाप पडेल. जमिन खरेदीचे व्यवहार काळजीपूर्वक करावेत.

मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
              वृश्चिक

शनि-प्लुटो द्वितीय, चतुर्थात नेपच्युन-केतु, पंचमात चंद्र-शुक्र, षष्ठात चंद्र-बुध-हर्षल, सप्तमात चंद्र-रवि-मंगळ, अष्टमात मंगळ, राहु दशमात, लाभात गुरु असे ग्रहमान असतील. सामाजिक जीवनात मदत करताना आपल्या कुवतीचा विचार करणे आवश्यक आहे. वाहन खरेदी विक्रीचे व्यवहार सध्या तरी करु नयेत. वाहन चालविताना वाहनाच्या गतिवर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक जीवनात मतभेद जरी तीव्र झाले तरी टोकाची भूमिका न घेता विसरा व क्षमा करा. नव्या ओळखीतून प्रेम प्रकरणाला चालना मिळेल. प्रेम विवाहाला पोषक वातावरण राहील. जीवनसाथीविषयी विश्वास उत्पन्न करा. एक दुसऱ्यामध्ये एकोपा चांगला राहिल. तुमच्या क्रांतिकारक विचारांना कृतीत आणा. थोर व अनुभवी व्यक्तींचा आदर करा. धंदा, व्यवसायात नोकरीत थोडी गोंधळचीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

आपल्या राशीत शनि-प्लुटो, पराक्रमात नेपच्युन-केतु, चतुर्थात चंद्र-शुक्र, पंचमात चंद्र-बुध-हर्षल, षष्ठात चंद्र-रवि-मंगळ, सप्तमात मंगळ, नवमात राहु, गुरु दशम अशी ग्रहांची रचना असेल. घरच्यांचे महत्वाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील गोष्टीना जरुरीनुसार प्राधान्य देणे जरुरीचे आहे. एखादे महत्वाचे काम विशिष्ट मंजूरीसाठी अडून राहिले असेल तर ती मिळू शकेल. बुध्दीकौशल्याने कामे यशस्वी कराल. धंदा व्यवसायाच्या विकासासाठी नवीन योजना आखाल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या चांगल्या कामाची दखल घेतील. काही नवे उपक्रमांचे नियोजन करता येईल. मानसिकता सकारात्मक ठेवल्यास चिंता कमी होतील. जमा व खर्च यांचा तालमेळ ठेवल्यास बऱ्याच चिंता कमी होतील.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                       मकर

द्वितीयात नेपच्युन-केतु, पराक्रमात चंद्र-शुक्र, चतुर्थात चंद्र-बुध-हर्षल, पंचमात चंद्र-रवि-मंगळ, षष्ठात मंगळ, अष्टमात राहु, नवमात गुरु, व्ययस्थानात शनि-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. आरोग्याच्या जुन्या तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका. स्वभावात चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा जास्तीत जास्त मौन पाळा, संयम ठेवा. आर्थिक अडचणीमुळे मानसिक ताण तणाव वाढेल. उधार उसनवारीचे व्यवहार तुम्हाला हितकारक ठरणार नाही. बाहेरील व्यक्तीना कुटुंबातील बाबीमध्ये ढवळाढवळ करु देऊ नका. बाहेरील व्यक्तींशी विशेष संवाद ठेऊ नका. व्यक्ती तितक्या प्रवृती त्यामुळे प्रत्येकाच्या भावनेला न्याय द्या. तुम्ही योग्य ध्येय गाठण्याकडे लक्ष द्या व काम करा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी नेपच्युन-केतु, द्वितीयात चंद्र-शुक्र, पराक्रमात चंद्र-बुध-हर्षल, चतुर्थात चंद्र-रवि-मंगळ, पंचमात मंगळ, सप्तमात राहु, अष्टमात गुरु, लाभस्थानी शनि-प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. आपला मनमिळावू स्वभाव कुटुंबातील सर्वांना योग्य ती दाद देईल. ज्येष्ठ व्यक्तीचा मान राखा. घरातील वाद एकमेकांच्या सामोपचाराने घरातच सोडवा. घरामध्ये काही अंतर्गत सजावट करण्याची संधी मिळेल. प्रेम प्रकरणांच्या जास्त आहारी जाऊ नये. प्रवासात अपरिचीत व्यक्तीच्या प्रेमात पडू नका. वैवाहिक संबंधात जीवनसाथीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करु नका. वैवाहिक जीवनात जीवनसाथी अहमभावी व जिद्दी असू शकेल. त्याच्याशी ताळमेळ साधावयास हवा. थोर व्यक्तींचा सहवास लाभेल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

Pisces | Kalnirnay Horoscope
                        मीन 

आपल्या राशीत चंद्र-शुक्र, द्वितीयात चंद्र-बुध-हर्षल, पराक्रमात चंद्र-रवि-मंगळ, चतुर्थात मंगळ, षष्ठात राहु, सप्तमात गुरु, दशमात शनि-प्लुटो, व्ययात नेपच्युन-केतु असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. निरागस आरोग्याचा लाभ मिळून मानसिक आनंद वाढेल. शुध्द सात्विक व चौरस आहार ही निरोगी जीवनाची किल्ली आहे. तुमची कौटुंबिक जबाबदारी वाढेल. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची योग्य काळजी घ्या. त्यांचा आरोग्यावर खर्च होईल. काही प्रसंगी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे जरुरीचे आहे़  कोणाकडून अधिकची अपेक्षा करु नये. इतरांच्या सल्ल्यामुळे निर्णय बदलू नये. संततीवर झेपेल एवढीच जबाबदारी टाकावी. नैतिक आचरण चांगले ठेवा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

साप्ताहिक राशीभविष्य – १४ मे ते २० मे २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

रवि-बुध-हर्षल प्रथम, रवि-मंगळ द्वितीय, राहु पंचम, गुरु षष्ठ, चंद्र-शनि-प्लुटो नवम, चंद्र दशम, चंद्र-नेपच्युन-केतू लाभ, शुक्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्य उत्तम रितीने पार पाडण्याची संधी मिळेल. आपल्या बोलण्याचा दरारा निर्माण होण्याची शक्यता असल्याने शब्द जपूनच वापरावेत. संततीच्या अपेक्षा वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहार करताना मनस्थिर ठेवा. भवितव्याविषयी तरतूद करून ठेवावी लागेल. थकबाकी वसुलीवर लक्ष ठेवा. विद्यार्थ्यांनी दिशाहीन न होता जिद्द ठेवावी. तुम्ही स्वत:हून ठरवून घेतलेले शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा. आपल्या स्वभावातील अचानक बदलाचा विचार करणे गरजेचे आहे.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

रवि-मंगळ प्रथम, राहु चतुर्थ, गुरु पंचम, चंद्र-शनि-प्लुटो अष्टम, चंद्र नवम, चंद्र-नेपच्युन-केतू दशम, शुक्र लाभ, रवि-बुध-हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. राजकारण, समाजकारण यासारख्या क्षेत्रात उत्तम यश लाभेल. सरकारी कामांना गती मिळण्याचे संकेत आहेत. आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवलात तर अनेक गोष्टी आपल्याला साध्य करणे सहज सोपे जाईल. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. आपल्या जबाबदारीत वाढ संभवते. विद्यार्थ्यांनी मेहनत घेतल्यास चांगले यश मिळेल. बौध्दिक वर्तुळातील आपली छाप कायम ठेवता येईल. मित्रमंडळीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. नावीन्याकडे तुमची झेप ठेवावी लागेल. दक्ष राहणे व स्वयंसिध्द होणे गरजेचे आहे.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

राहु पराक्रम, गुरु चतुर्थ, चंद्र-शनि-प्लुटो सप्तम, चंद्र अष्टम, चंद्र-नेपच्युन-केतू नवम, शुक्र दशम, रवि-बुध-हर्षल लाभ, रवि-मंगळ व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. तुमच्या निर्णयामुळे कौटुंबिक स्तरावर समाधान निर्माण होईल. घरात सगळ्यांशी संवाद साधू शकाल. भावंडांच्या अडचणीवर नीट विचार करुन उत्तर द्यावे. घरामध्ये पूर्वी ठरलेला एखादा कार्यक्रम पार पडेल. शक्यतो कोणाला जामिन राहु नये. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. कोर्टकेसमध्ये सतर्क राहा. विद्यार्थ्यांनी अभ्यासातून लक्ष विचलीत होता कामा नये. दिशाहीन न होता सातत्य व चिकाटीने अभ्यास केल्यास उत्तम यश लाभेल. स्वतःच्या कर्तृत्वावर ठाम विश्वास ठेवा.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क

राहु द्वितीय, गुरु पराक्रम, चंद्र-शनि-प्लुटो षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र-नेपच्युन-केतू अष्टम, शुक्र नवम, रवि-बुध-हर्षल दशम, रवि-मंगळ लाभस्थानातुन भ्रमण करणार आहेत.प्रेमात थाडेसे सबुरीने घेतल्यास लाभदायक ठरेल. प्रेमातील गैरसमज दूर करता येतील. वैवाहिक सौख्याबद्दल आलेल्या अडचणींवर सामोपचाराने मार्ग काढा. जीवनसाथीसाठी वेळ काढावाच लागेल हे ध्यानात ठेवा. कुटुंबातील एकोपा जपण्याकडे लक्ष द्या. घरात व बाहेर दोन्ही आघाडयांवर धैर्याने तोंड द्यावे लागेल. घरातीलवडीलधाऱ्य मंडळींची काळजी घ्या. स्वत:चे म्हणणे इतरांवर लादू नका. महत्वाच्या कामात दुसऱ्यांवर विसंबून राहू नये. अडथळयांची पर्वा न करता तुमचे प्रयत्न वाढवत राहा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                     सिंह

राशीस्थानी राहु, गुरु द्वितीय, चंद्र-शनि-प्लुटो पंचम, चंद्र षष्ठ, चंद्र-नेपच्युन-केतू सप्तम, शुक्र अष्टम, रवि-बुध-हर्षल नवम, रवि-मंगळ दशमस्थानातुन भ्रमण करणार आहेत. कामाचा उरक वाढवावा लागेल. काम करताना वेळेचे बंधन राखा. नोकरीमध्ये तुमच्या गुणांना भरपूर वाव मिळेल. नवीन व्यवसाय सुरु होईल. भागिदारीच्या व्यवसायातील लोकांनी आपले नवे भागीदार निवडतांना चोखंदळ असावे म्हणजे पुढे पश्चातापाची वेळ येणार नाही. कुटुंबातील सर्वांचे समाधान करण्याचा तुमचा कल राहील. गोड बोलून घरातील सर्वाची मने जिकंण्याचा प्रयत्न करा. क्षेत्र कोणतेही असो, तुमची घोडदौड वेगवान ठरणार आहे. सावध तो समाधानी हे व्यवहार सूत्र विसरु नका.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत गुरु, चंद्र-शनि-प्लुटो चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र-नेपच्युन-केतू षष्ठ, शुक्र सप्तम, रवि-बुध-हर्षल अष्टम, रवि-मंगळ नवम, राहु व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल घडविण्याची गरज आहे. अतिश्रम अशक्तपणा या गोष्टीपासून काळजी घ्यावी. प्रेम संबंधात भावनांचा अतिरेक होता कामा नये. प्रेमात गैरसमजुतीमुळे ताणतणाव येऊ देऊ नका. वैवाहिक जीवनातील कर्तव्य पूर्ण करा. सहजीवनाचे महत्त्व जीवनसाथीस पटवून द्या. एखादे महत्वाचे काम विशिष्ट मंजूरीसाठी अडून राहिले असेल तर ती मिळू शकेल. बुध्दीकौशल्याने कामे यशस्वी कराल. व्यवहाराच्या कायदेशीर बाबीकडे लक्ष द्या. नवनव्या आव्हानास सामोरे जाण्याची मनाची तयारी ठेवा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

पराक्रमात चंद्र-शनि-प्लुटो, चंद्र चतुर्थ, पंचमात चंद्र-नेपच्युन-केतू, शुक्र षष्ठ, रवि-बुध-हर्षल सप्तमात, रवि-मंगळ अष्टमात, राहु लाभात, व्ययात गुरु अशी ग्रहांची ठेवण असेल. अधूनमधून प्रकृतीच्या आवश्यक त्या तपासण्या करुन घेणे हितावह आहे. डॉक्टरी सल्ल्याने औषधोपचार करावे. गरज वाटल्यास डॉक्टर बदलण्यास मागे पुढे पाहू नका. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे खर्च वाढणार नाही याची काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहारातील पकड सैल होणार नाही याची दक्षता घ्या. प्रेम सबंधात जोडिदाराच्या भावनांशी खेळल्यास विश्वासाला तडा जाईल. प्रेम सबंधात आपले सहकार्य महत्वाचे आहे. पतीपत्नीनी किरकोळ गोष्टीवरुन वाद घालणे टाळावे. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

चंद्र-शनि-प्लुटो द्वितीय, चंद्र पराक्रम, चतुर्थात चंद्र-नेपच्युन-केतू, पंचमात शुक्र, षष्ठात रवि-बुध-हर्षल, सप्तमात रवि-मंगळ, राहु दशमात, लाभात गुरु असे ग्रहमान असतील. कुटुंबातील वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करा. मतभेदास कारणीभूत ठरणारे मुद्दे दूर करा. मनातील संशयाचे विचार दूर करण्यास प्राधान्य द्या. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुमच्या कार्यपध्दतीत बदल करणे भाग पडेल. एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर पूर्ण त्यात झोकून देऊन काम करा. तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करु नका. आईच्या घराण्याबरोबर होणारे वादाचे विषय टाळा.  सामाजिक क्षेत्रात मनासारखे कामे करण्याची संधी मिळेल. आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

आपल्या राशीत चंद्र-शनि-प्लुटो, द्वितीय चंद्र, पराक्रमात चंद्र-नेपच्युन-केतू, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि-बुध-हर्षल, षष्ठात रवि-मंगळ, नवमात राहु, गुरु दशम अशी ग्रहांची रचना असेल. गैरमार्गाने जाणाऱ्यमुलांना वेळीच रोखण्याची जबाबदारी पालकांची आहे हे ध्यानात ठेवा. संततीच्या चुका त्यांच्या नजरेस आणून देणे आवश्यक ठरेल. घरात काही अंतर्गत सजावट करायची असल्यास अनुकूल असा कालावधी आहे. नोकरदार तसेच व्यवसायिकांना आपल्या कामात मानाचे स्थान प्राप्त होईल. योजलेल्या कामांना उत्तम गती मिळण्याचे संकेत आहेत. शत्रु आपल्यासमोर टिकाव धरु शकणार नाहीत. तुमचे कौतुक करणाऱ्यांपासून सावध असावे. स्वत:चा निर्णय पुन्हा तपासुन पहाणे आवश्यक आहे.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                       मकर

चंद्र प्रथम, द्वितीयात चंद्र-नेपच्युन-केतू, पराक्रमात शुक्र, चतुर्थात रवि-बुध-हर्षल, पंचमात रवि-मंगळ, अष्टमात राहु, नवमात गुरु, व्ययस्थानात चंद्र-शनि-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. जुन्या प्रकृतीच्या त्रासावर कायमस्वरुपी इलाज करणे गरजेचे आहे. स्वत:च्या तब्येतीची जोपासना करा. सकस व सात्विक आहारावर भर द्या. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी योग्य त्या हालचाली करा. वाढणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न कौटुंबिक संवादातून यश देईल. घरात आपले ऐकलेच पाहिजे असा आग्रह धरु नका. घरात लवचिक धोरण ठेवा.  आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यला दोषी ठरवताना आधी आत्मपरीक्षण करणे गरजेचे असते.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी चंद्र-नेपच्युन-केतू, द्वितीयात शुक्र, पराक्रमात रवि-बुध-हर्षल, चतुर्थात रवि-मंगळ, सप्तमात राहु, अष्टमात गुरु, लाभस्थानी चंद्र-शनि-प्लुटो, व्ययात चंद्र असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. सकारात्मक विचारांना प्राधान्य द्या. स्वप्नरंजनात न राहता ते साध्य करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी. शेजारी तसेच मित्र परिवारांना मदत करण्याची संधी मिळेल. संततीच्या चुकाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. घरच्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्या. घरातील हट्टी व्यक्तीचा त्रास होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होणार असला तरी चैन व उधळेपणा यावर नियंत्रण ठेवणे अधिक गरजेचे राहील. स्वत:च्या कामाबद्दल व कर्तव्यबद्दल व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

Pisces | Kalnirnay Horoscope
                        मीन 

आपल्या राशीत शुक्र, द्वितीयात रवि-बुध-हर्षल, पराक्रमात रवि-मंगळ, षष्ठात राहु, सप्तमात गुरु, दशमात चंद्र-शनि-प्लुटो, लाभात चंद्र, व्ययात चंद्र-नेपच्युन-केतू असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. आपले शत्रु आपल्यासमोर टिकाव धरु शकणार नाहीत. घरातील पाळीव प्राण्यांच्या आरोग्यास जपा. मातुल घराण्याबरोबर कोणतेही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कौटुंबिक वाटाघाटीत तुम्हाला मोठेपणा मिळेल. नियमांचे पालन करुन निर्णय घ्या. इतरांच्या फूटपट्टीने स्वत:स मोजण्याचा वेडेपणा करु नये. तुमचा सल्ला इतरांना फायद्याचा ठरेल. नातेवाईकांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे भाग पडेल. वरिष्ठांना तक्रारीची संधी देऊ नये.  शेजाऱ्यांकडून अपेक्षित मदत मिळेल. 

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

साप्ताहिक राशीभविष्य – ०७ मे ते १३ मे २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

रवि-बुध-हर्षल प्रथम, मंगळ द्वितीय, राहु पंचम, चंद्र-गुरु षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र अष्टम, शनि-प्लुटो नवम, नेपच्युन-केतु लाभ, शुक्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. विनाकारण धाडस किंवा प्रवास करु नये. स्वत:च्या तब्येतीची जोपासना करा. दिलेले कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न करा. हाती आलेला पैसा सांभाळून वापरावा लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष विचलीत होऊ देता कामा नये. न कंटाळता अभ्यासात सातत्य ठेवावयास हवे. शेजाऱ्यांशी अधिक सलगी नको. पूर्ण कल्पना आल्याशिवाय निर्णय घेण्याची घाई करु नये. आपल्या कठोर बोलण्याने नवे शत्रू निर्माण होण्याची शक्यता आहे तेव्हा ते टाळा.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

मंगळ प्रथम, राहु चतुर्थ, चंद्र-गुरु पंचम, चंद्र षष्ठ, चंद्र सप्तम, शनि-प्लुटो अष्टम, नेपच्युन-केतु दशम, शुक्र लाभ, रवि-बुध-हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. कौटुंबिक निर्णय विचारपूर्वक घ्या. शांत चित्ताने तुम्ही तुमची कर्तव्य पूर्ण करा. कुटुंबात सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. स्थावर मालमत्तेचे व्यवहार या आठवडयात न करणे योग्य होईल. प्रेमात जोडिदाराच्या कलेने घ्या. वादाचे विषय टाळा. जोडीदाराशी कुठल्याही खाजगी गोष्टी लपवू नका. वैवाहिक जीवनात सुखद अनुभव येण्यासाठी सामंजस्य ठेवा. एकमेकांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्याकडे कल ठेवा. आपले कार्यक्रम ठरवून तुम्ही स्वत:ला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

राहु पराक्रम, चंद्र-गुरु चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र षष्ठ, शनि-प्लुटो सप्तम, नेपच्युन-केतु नवम, शुक्र दशम, रवि-बुध-हर्षल लाभ, मंगळ व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. मित्र तुमच्या विचारांनी प्रभावित होतील. मित्र परिवारांमध्ये आर्थिक व्यवहार करणे शक्यतो टाळावेत. कुटुंबातील वडिलधाऱ्यव्यक्तींचा मानसन्मान ठेवा. भावनांच्या आहारी जाऊ नका. संतती इच्छुकांनी जास्त प्रयत्न करावे. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. शैक्षणिक क्षेत्रातील अडचणींसाठी शिक्षकांची मदत घ्या. शैक्षणिक क्षेत्रात सरावाचे धोरण अवलंबावे लागेल. विश्वसनीय व्यक्तीशिवाय शक्यतो कोणाला जामिन राहू नका. तुम्ही अधिक कष्ट करण्याची तयारी ठेवा. कोणतेही दस्ताऐवज पूर्ण वाचल्याशिवाय सही करु नका.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क

राहु द्वितीय, चंद्र-गुरु पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र पंचम, शनि-प्लुटो षष्ठ, नेपच्युन-केतु अष्टम, शुक्र नवम, रवि-बुध-हर्षल दशम, मंगळ लाभस्थानातून भ्रमण करणार आहेत. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: वेळेवर करा. तुमच्या कामाचा झपाटा वाढल्यामुळे कामे लवकर मार्गी लागतील. आपल्या साहेबांची मर्जी राखा. नोकरीमध्ये योग्य मार्गदर्शन मिळेल. भागीदाराची निवड योग्य विचारपूर्वक करावयास हवी. चैतन्य आणण्याचा प्रयत्न करा. नियोजन करुन मोठे प्रकल्प हाताळल्यास त्यात यश मिळेल. कौटुंबिक सामंजस्य टिकविण्यावर भर असावा. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. सत्याची कास धरा व पुढचा मार्ग स्वीकारा म्हणजे यशाचा मार्ग सुलभ होईल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                     सिंह

राशीस्थानी राहु, चंद्र-गुरु द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र चतुर्थ, शनि-प्लुटो पंचम, नेपच्युन-केतु सप्तम, शुक्र अष्टम, रवि-बुध-हर्षल नवम, मंगळ दशमस्थानातून भ्रमण करणार आहेत. तब्येतीकडे दुर्लक्ष न करता कामामधून आरोग्यासाठी पुरेसा वेळ द्या. आहार विहारांची बंधने पाळणे गरजेचे आहे. आरोग्यासाठी बाहेरील पदार्थ वर्ज्य करा. उसने पैसे देताना चार वेळेस विचार करावा. जमिनीच्या व्यवहारात लाभ होतील. आपल्या बुध्दीचातुर्याची अर्थाजनाला जोड द्या. प्रेमात काहीसा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. सबुरीने घ्या. एकमेकांसाठी वेळ काढा. वैवाहिक जीवनात एकमेकांमधील  गैरसमज टाळा. वैवाहिक जीवनात आलेल्या व्यत्ययाला दूर करा. कायदे विषयक प्रश्न सोडविताना मध्यस्थावर अवलंबून राहू नये.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत चंद्र-गुरु, चंद्र द्वितीय, चंद्र पराक्रम, शनि-प्लुटो चतुर्थ, नेपच्युन-केतु षष्ठ, शुक्र सप्तम, रवि-बुध-हर्षल अष्टम, मंगळ नवम, राहु व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. मानसिक व शारिरीक त्रासातून मुक्त होण्यासाठी मेडिटेशन करा. सर्वसामान्य विकारापासून सावधानता बाळगा. मानसिक व शारिरीक त्रासातून मुक्त होण्यासाठी मेडिटेशन करा. सर्वसामान्य विकारापासून सावधानता बाळगा. प्रेम सबंधात कोणताही तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. प्रिय व्यक्तींच्या मनाचा वेध घ्या. जोडीदारास दाखविलेल्या स्वप्नांची पूर्तता करा. परस्परात मोकळेपणा असणे आणि संवाद राहणे हे यशस्वी विवाहाला आवश्यक असते. दगदग व धावपळ करुनच यश लाभेल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

चंद्र प्रथम, चंद्र द्वितीय, पराक्रमात शनि-प्लुटो, पंचमात नेपच्युन-केतु, शुक्र षष्ठ, रवि-बुध-हर्षल सप्तमात, मंगळ अष्टमात, राहु लाभात, व्ययात चंद्र-गुरु अशी ग्रहांची ठेवण असेल. शारीरिक तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका अशा दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास वैद्यकीय खर्च वाढतील. थंड पेय व खाद्य पदार्थापासून दूर राहावे. देण्याघेण्याचे व्यवहार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने करा. आर्थिक गुंतवणूक करताना पूर्ण विचारंती करणे जरुरी आहे. कर्ज घेणे टाळावयास हवे. प्रेम संबंधात कोणीही चुकू शकतो म्हूणन आपल्या जोडिदाराच्या चुका सौम्य शब्दात दाखवा. एकमेकांबद्दल विश्वासार्हता वाढवणे जरुरुीचे आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांमधील  गैरसमज टाळा. वैवाहिक जीवनात आलेल्या व्यत्ययाला दूर करा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

चंद्र प्रथम, द्वितीयात शनि-प्लुटो, चतुर्थात नेपच्युन-केतु, पंचमात शुक्र, षष्ठात रवि-बुध-हर्षल, सप्तमात मंगळ, राहु दशमात, लाभात चंद्र-गुरु,व्ययात चंद्र असे ग्रहमान असतील. प्रिय व्यक्तीच्या कामाचे कौतुक करा. स्वत:चेच खरे करु नका. प्रेम करताना योग्य व्यक्तीची निवड करा. जीवनसाथी हळवा, भावूक व आज्ञाधारक वृत्तीचा असेल. तुमच्या एखाद्या चुकीच्या कृतीमुळे अबोला धरण्याची शक्यता नाकारता येत नाही. शुध्द सात्विक व चौरस आहार ही निरोगी जीवनाची किल्ली आहे. आहार नियमन हितकारक होईल. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा. नवे परिचय लाभदायक ठरतील. सामाजिक मान सन्मान मिळेल. नवीन कार्यक्षेत्रात तडजोडी करुन पुढे जावे.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

आपल्या राशीत शनि-प्लुटो, पराक्रमात नेपच्युन-केतु, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि-बुध-हर्षल, षष्ठात मंगळ, नवमात राहु, चंद्र-गुरु दशम, चंद्र लाभात, चंद्र व्ययात अशी ग्रहांची रचना असेल. प्रेमातील तणाव टाळण्याचा प्रयत्न करणे दोघांच्या हिताचे आहे. जोडीदारास मानसन्मान द्या. पती पत्नीतील संबंध जपावे लागतील. वातावरणात आनंद निर्माण करा. आपल्या संततीची विशेष काळजी घ्या. त्यांचे मनोबल सांभाळा. आपल्या जबाबदारीत वाढ संभवते. घरगुती कामे चातुर्याने पूर्ण करा. कामकाजात एक प्रकारचा प्रभाव राहील. न्याय बुध्दिने व्यवसाय करावयास हवा. विरोधकांच्या आरोपाकडे व टीकेकडे लक्ष देण्यात वेळ न घालवता कामावर लक्ष केंद्रित करा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                       मकर

द्वितीयात नेपच्युन-केतु, पराक्रमात शुक्र, चतुर्थात रवि-बुध-हर्षल, पंचमात मंगळ, अष्टमात राहु, नवमात चंद्र-गुरु, चंद्र दशम, चंद्र लाभात,व्ययस्थानात शनि-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. कोणत्याही गुढ विषयावर खोलवर विचार करु नका. आनंदी वृत्ती हा आरोग्याचा आधार आहे. लिखाण काम, लेखी व्यवहार प्रगतशील असे होतील. कोणत्याही स्थितीत वाहन चालविताना आपल्या हातून कायद्याचे उल्लंघंन होणार नाही याची दक्षता घ्या. नोकरीत सध्या बदल करु नका धोका आहे. कागदपत्रे जपून हाताळा. व्यापार उद्योगातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तुमच्या कार्यपध्दतीत बदल करणे भाग पडेल. अडथळयांची पर्वा न करता तुमचे प्रयत्न वाढवत राहा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी नेपच्युन-केतु, द्वितीयात शुक्र, पराक्रमात रवि-बुध-हर्षल, चतुर्थात मंगळ, सप्तमात राहु, अष्टमात चंद्र-गुरु, नवमात चंद्र, दशमात चंद्र,लाभस्थानी शनि-प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. उगीच आर्थिक  जबाबदारी स्वीकारु नका. कोणताही आर्थिक व्यवहार अनोळखी व्यक्तीशी करु नका. अडकलेल्या पैशासाठी वारंवार संबंधित व्यक्तीस आठवण करणे हितावह आहे. विद्यार्थ्यांना मनाची एकाग्रता ठेवणे आवश्यक आहे. प्रयत्नांची कास न सोडता बुध्दीचातुर्याने काम करावे. घरातील लहान मुलांच्या आरोग्यास जपावे लागेल. प्रथम आपल्या क्षमतेचा विचार करणे व मग आश्वासन देणे योग्य ठरेल. करार पत्रावर नीट वाचून सह्या करा. जबाबदारी अंगावर येऊन पडली तर ती टाळू नका.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मीन | साप्ताहिक राशिभविष्य
                      मीन

आपल्या राशीत शुक्र, द्वितीयात रवि-बुध-हर्षल, पराक्रमात मंगळ, षष्ठात राहु, सप्तमात चंद्र-गुरु, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र, दशमात शनि-प्लुटो,व्ययात नेपच्युन-केतु असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. कर्तव्याचे पालन करताना आरोग्यसंपत्तीचे संवर्धन करण्यात दक्ष राहा. अनारोग्यास आमंत्रण ठरेल, अशी दिनचर्या आखू नका. आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक ठरेल. शेजारी तसेच लहान भावंडाचे सहकार्य उत्तम लाभेल. कुटुंबामध्ये अनेक वेळा होणाऱ्या वादविवादावर समजुदारपणे तोडगा काढावयास हवा. मुलांकडे सातत्याने लक्ष ठेवा पण ताण देऊ नका. स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्याची संधी मिळेल. हाती घेतलेल्या कार्यात सफलता मिळेल. शब्द प्रयोग करताना काळजी घ्या.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

 

साप्ताहिक राशीभविष्य – ०१ मे ते ०६ मे २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

रवि-बुध-हर्षल प्रथममंगळ द्वितीयचंद्र पराक्रमचंद्र चतुर्थचंद्र-राहु पंचमगुरु षष्ठशनि-प्लुटो नवमनेपच्युन-केतु लाभशुक्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. रागावर नियंत्रण ठेवणे कठीण होईल. आरोग्याच्या संवर्धनासाठी व्यायामाला खास प्राधान्य द्या. आहार-विहाराचे नियम पाळा. आर्थिक उलाढाल्या विचारपूर्वक करा. व्यापारात आर्थिक व्यवहार करताना मनस्थिर ठेवा. कुटुंबाबद्दल सहानुभूती असेल. सांसरिक जीवनातील चांगल्या घटनांचा आस्वाद मिळेल. विद्यार्थ्यांनी अपयशाची कसर भरुन काढण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी. केवळ अभ्यास हेच आपले ध्येय डोळयांपुढे ठेवा. नावीन्याकडे तुमची झेप ठेवावी लागेल. स्वत:ची बुध्दी जागृत ठेवा. कुणाची मदत मिळेल या आशेवर राहू नका.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

मंगळ प्रथमचंद्र द्वितीयचंद्र पराक्रमचंद्र-राहु चतुर्थगुरु पंचमशनि-प्लुटो अष्टमनेपच्युन-केतु दशमशुक्र लाभरवि-बुध-हर्षल व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. तुम्हाला खर्चाचा अंदाज अगोदर ठेवणे व त्यानुसार वागणे हितावह ठरेल. पैशाचे मोठे व्यवहार तज्ञांच्या सल्लानेच करावेत. लहान मुलांचा स्वभाव हळवा असल्यामुळे त्यांना योग्य अशी दाद द्या. कुटुंबातील आपली एकरुपता काहीशी कमी जाणवत आहे. कुटुंबातील वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी नवे वेळापत्रक तयार करावे. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी वाढेल. लेखी व्यवहार करार योग्य मार्गाने तडीस जातील. स्वत:ची कामे शक्यतो स्वत:वेळेवर करा.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

चंद्र प्रथमचंद्र द्वितीयचंद्र-राहु पराक्रमगुरु चतुर्थशनि-प्लुटो सप्तमनेपच्युन-केतु नवमशुक्र दशमरवि-बुध-हर्षल लाभमंगळ व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. मंगलकार्याचे वारे वाहू लागतील. मित्र परिवार नातेवाईकांना मदत करण्याची संधी मिळेल. आपल्या शेजाऱ्यांशी कोणत्याही प्रकारे वाद विवाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. कोणत्याही प्रकारचे करार शक्यतो न करणे उत्तम होईल. नोकरीत कर्तव्य करावेइतरांना सुधारणा करण्यासंबंधी उपदेश देत बसू नये. नोकरीत स्वत:च स्थान निर्माण कराल. व्यवसाय उद्योगात नवीन कल्पना आकार देतील. दिलेला शब्द पाळावा लागेल. जबाबदारीचे ठिकाणी चुका होणार नाही याची काळजी घ्यावी.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क

चंद्र प्रथमचंद्र-राहु द्वितीयगुरु पराक्रमशनि-प्लुटो षष्ठनेपच्युन-केतु अष्टमशुक्र नवमरवि-बुध-हर्षल दशममंगळ लाभचंद्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आरोग्य सांभाळून आपण काम करावे. आरोग्याच्या संवर्धांनाकडे लक्ष द्या. आनंदी वृत्ती हा आरोग्याचा आधार आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या मनाचा विचार करा. कौटुंबिक वाद वाढवू नका. आपल्या कर्तव्यपूर्तीत दिरंगाई करु नका. व्यवहारात अर्थाजन कसे होईल याचा विचार करा. थोडयाशा कठोर वागण्याने अशी येणी मिळवता येतील. अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.परिस्थितीपुढे माघार न घेता तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवलात तर मार्ग निघू शकेल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                     सिंह

राशीस्थानी चंद्र-राहुगुरु द्वितीयशनि-प्लुटो पंचमनेपच्युन-केतु सप्तमशुक्र अष्टमरवि-बुध-हर्षल नवममंगळ दशमचंद्र लाभचंद्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. मुलांच्या बाबतीत अधिक जागृक रहावे लागेल. आपल्या प्रियजनांच्या मनातील विश्वास डळमळीत होणार नाही याची दक्षता घ्या. पाहुण्यांची वर्दळ वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेम संबंधात भावनांचा अतिरेक होता कामा नये. जोडिदाराच्या भावनांशी खेळल्यास विश्वासाला तडा जाईल. वैवाहिक जीवनात कटकटी होणार नाहीत याची काळजी घ्या. विवाहासंबंधी निर्णय स्थगित ठेवा. कामासाठी नातेवाईकांबरोबर दूर जावे लागेल. स्वत:च्या अडीअडचणीचा इतरांकडून फायदा उठवला जाणार नाही याची काळजी घ्यावी.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत गुरुशनि-प्लुटो चतुर्थनेपच्युन-केतु षष्ठशुक्र सप्तमरवि-बुध-हर्षल अष्टममंगळ नवमचंद्र दशमचंद्र लाभचंद्र-राहु व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. कोठलाही आजार किंवा दुखणी अंगावर काढू नयेत. वेळेवर उपचार केले तर मोठमोठे रोगही दूर ठेवता येतात. विद्यार्थ्यांना यशाकरता जास्त मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना शाँटकर्ट घेऊन चालणार नाही. स्वत:च्या बोलण्यामुळे व्यक्ती संबंध बिघडणार नाही यांची काळजी घ्यावी. घरगुती कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सज्ज व्हावे लागेल. स्वतःचे म्हणणे खरे करण्यापेक्षा शांत राहा. व्यवहारातकायद्यात चोख राहा. सामाजिक प्रतिसाद वाढता राहिल. कोणाकडून अधिकची अपेक्षा करु नये.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

पराक्रमात शनि-प्लुटोपंचमात नेपच्युन-केतुशुक्र षष्ठरवि-बुध-हर्षल सप्तमातमंगळ अष्टमातचंद्र नवमातचंद्र दशमातचंद्र-राहु लाभातव्ययात गुरु अशी ग्रहांची ठेवण असेल. आपणास शाकाहार फायदेशीर ठरेल. कामाचा ताण मनास व शरीरास बाधक ठरणार नाही याची दक्षता घ्या. संततीच्या चुकांमुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना योग्य मान द्या. कौटुंबिक निर्णयाबाबतीत सल्ला व चर्चा केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. सार्वजनिक ठिकाणी किरकोळ गोष्टींवरुन वाद विवाद टाळावेत. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. विकासाच्या वाटेवर थांबू नका. पुढे चालत राहा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

द्वितीयात शनि-प्लुटोचतुर्थात नेपच्युन-केतुपंचमात शुक्रषष्ठात रवि-बुध-हर्षलसप्तमात मंगळचंद्र अष्टमातचंद्र नवमातचंद्र-राहु दशमातलाभात गुरु असे ग्रहमान असतील. खाण्याच्या वेळा निश्चित ठेवणे आरोग्यास हितकारक असते. औषधोपचार चालू असतील तर योग्य वेळी औषधे घ्या. आहारविहाराचे नियम पाळा. सात्विक आहार ठेवा. नीट नियोजन करुन धनार्जनासोबत धन संचय करा. उधार उसनवारीचे व्यवहार तुम्हाला हितकारक ठरणार नाही. कुटुंबात सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांना आपलेसे करुन पुढे वाटचाल करा. मोठया लोकांच्या ओळखी होऊन त्यातून फायदा मिळेल. अति आत्मविश्वास बाजूस ठेवून योग्यवेळी योग्य धोरण राबवणे हिताचे ठरेल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

आपल्या राशीत शनि-प्लुटोपराक्रमात नेपच्युन-केतुचतुर्थात शुक्रपंचमात रवि-बुध-हर्षलषष्ठात मंगळसप्तमात चंद्रअष्टमात चंद्र,नवमात चंद्र-राहुगुरु दशमात अशी ग्रहांची रचना असेलकुटुंबातील सलोखा व एकोपा टिकवून ठेवण्यास यश येईल. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे हे लक्षात घ्यावे लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नक्की नोकरी लागेल. नोकरीत प्रमोशनमुळे रुबाब वाढणार आहे पण जबाबदाऱ्याही वाढतील. नवा व्यवसाय सुरु करता येईल. व्यवसायातील अडथळे परिश्रमाने दूर करता येतील. कोणताही पेपर व्यवस्थित वाचल्याशिवाय त्यावर सही करु नये किंवा त्याला समंती देऊ नये.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                       मकर

द्वितीयात नेपच्युन-केतुपराक्रमात शुक्रचतुर्थात रवि-बुध-हर्षलपंचमात मंगळषष्ठात चंद्रसप्तमात चंद्रअष्टमात चंद्र-राहुनवमात गुरुव्ययस्थानात शनि-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. आपल्या आरोग्यावर ताण पडेल असे काम टाळावयास हवे. प्रकृतीची उपेक्षा करु नका. बाहेरील खाण्यापेक्षा घरगुती जेवण तसेच फलाहारावर भर द्या. खर्चाच्या अनेक वाटांवर नियंत्रण आणावे लागेल. भवितव्याविषयी तरतूद करून ठेवावी लागेल. कौटुंबिक जीवनात वादावादी किंवा काही किरकोळ खटके निर्माण होऊ शकतात. घरातील वाद घरातच सोडवा. वडीलधाऱ्या मंडळीचा वेळोवेळी सलॢा घेणे नेहमीच लाभदायक होईल. सरकारी कामांना चालना मिळेल. विरोधकांना संधी देऊ नका.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी नेपच्युन-केतु, द्वितीयात शुक्र, पराक्रमात रवि-बुध-हर्षल, चतुर्थात मंगळ, पंचमात चंद्र, षष्ठात चंद्र, सप्तमात चंद्र-राहु, अष्टमात गुरु, लाभस्थानी शनि-प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. विद्यार्थ्यांनी दिशाहीन न होता जिद्द ठेवावी. स्वत:च्या छंदाकडे लक्ष देण्याची ही वेळ नाही हे विद्यार्थ्यांनी नीट ध्यानात ठेवावे. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. आपल्या जबाबदारीत वाढ संभवते. पैशाचा सततचा ओघ लक्षात घेता भविष्यकालीन योग्य गुंतवणूक हितकारक आहे. अर्थाजन वाढविण्यासाठी केलेले विविध तर्क तुम्हास लाभाचे होतील. जास्त कोणास मदत करण्याच्या भानगडीत पडू नये. इतरांच्या सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकण्यापुरतेच मर्यादेत ठेवणे.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मीन | साप्ताहिक राशिभविष्य
                      मीन

आपल्या राशीत शुक्रद्वितीयात रवि-बुध-हर्षलपराक्रमात मंगळचतुर्थ चंद्रपंचमात चंद्रषष्ठात चंद्र-राहुसप्तमात गुरुदशमात शनि-प्लुटोव्ययात नेपच्युन-केतु असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. ताण तणावाला दोन हात लांब ठेवणे हितकर होईल. स्वतःस जास्त दगदग करुन घेऊ नका. सामाजिक क्षेत्रात सेवा करण्याची उत्तम संधी प्राप्त होईल. घरातील माणसांची मने सांभाळा. तुम्हास गोड आश्वासन देणाऱ्या नातेवाईकांना वेळीच ओळखणे गरजेचे आहे. हिशेब आणि हिशेबीपणा ठेवला तर आपण खूप काही करु शकाल. तुमच्यातील चांगल्या गुणांची पारख इतरांकडून होईल. स्पर्धासाहसप्रलोभने यांपासून दूर रहावे. गोड बोलून कार्यभाग साधा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली