Weekly Horoscope – April 2017


साप्ताहिक राशीभविष्य – २४ एप्रिल ते ३० एप्रिल २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

चंद्र- रवि-बुध- हर्षल प्रथम, चंद्र-मंगळ द्वितीय, राहू पंचम, गुरु षष्ठ, शनि- प्लुटो नवम, चंद्र-नेपच्युन- केतु लाभ, चंद्र-शुक्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. प्रेमात विरहाचे प्रसंग येतील. नीती-अनीतीच्या कल्पना झुगारून दिल्या जातील. आपल्या विवेकबुद्धीने त्यांना हाताळा. वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रेमाने वागा. कुटुंबातील त्यांच्या स्थानाची जाण करून दया. त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाका. मोठेपणाच्या खोटया कल्पनेपायी खर्च वाढवत बसू नका. दुसऱ्यांच्या चुका दाखवताना सौम्य शब्दात सांगा. वडिलधाऱ्यांशी वाद नकोत. शांत राहून परिस्थिती काबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. राग आला तरी पटकन रागावून नातेसंबंध तोडू नये. असुरक्षिततेची भावना व शत्रूंचा त्रास वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहा.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

चंद्र-मंगळ प्रथम, राहू चतुर्थ, गुरु पंचम, शनि- प्लुटो अष्टम, चंद्र-नेपच्युन- केतु दशम, चंद्र-शुक्र लाभ, चंद्र-रवि-बुध-हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. सकारात्मक विचारांना प्राधान्य दिल्यास उत्तम आरोग्य लाभेल. सकस व सात्विक शुद्ध आहार व आराम चांगले आरोग्य प्रधान करेल. पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड झाल्याने समाधान लाभेल. मोठी गुंतवणूक टाळावी. खर्च वाढला तरी काही चांगल्या घटना घडतील. घरातील माणसांकडून जास्त अपेक्षा बाळगू नका. सहजीवन म्हणजे तडजोड हे लक्षात ठेवा. बुद्धीचा वापर करून घरात एकोपा नांदवणे जरूरीचे आहे. एक गोष्ट मिळवण्यासाठी अन्यत्र तडजोड करावी लागेल. स्वत:ची आत्मप्रौढी मिरवणे टाळावे.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

राहू पराक्रम, गुरु चतुर्थ, शनि- प्लुटो सप्तम, चंद्र-नेपच्युन-केतु नवम, चंद्र-शुक्र दशम, चंद्र- रवि- बुध-हर्षल लाभ, चंद्र-मंगळ व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. प्रेम संबंधात सावधानतापूर्वक विचार करावयास हवा. साथीदार सुशिक्षित व स्थिर वृतीचा असेल. एक दुसऱ्याचे सहकार्य महत्वाचे होईल. पती- पत्नीत सामंजस्यांचा अभाव राहील. शक्यतो जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष न देणे उचित होईल. कामावर अधिक लक्ष केंद्रीत केल्यास लाभाचे प्रमाण वाढेल. नोकरीत स्थिरता असेल. आपल्या बुद्धीचातुर्याने नोकरीत मानाचे स्थान प्राप्त होईल. व्यवसायात नावलौकिक होईल. व्यवसायातील प्रगतीचा आलेख गतीमान राहील. महत्वाच्या कागदपत्रांवर सहया करण्यापूर्वी पुरेशी काळजी घेणे आवश्यक ठरेल.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क

राहू द्वितीय, गुरु पराक्रम, शनि-प्लुटो षष्ठ, चंद्र-नेपच्युन-केतु अष्टम, चंद्र-शुक्र नवम, चंद्र- रवि- बुध-हर्षल दशम, चंद्र-मंगळ लाभस्थानातून भ्रमण करणार आहेत. आरोग्याच्या जुन्या तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका. मनाचे संतुलन बिघडू देऊ नका. आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी सकाळी फिरायला जा. योगासनावर भर द्या. खरेदी-विक्रीच्या मोहात पडू नका. जुनी वसुली करताना हितसंबंध बिघडणार नाहीत याची दक्षता घ्या. घरगुती कामे चातुर्याने पूर्ण करा. नातेसंबंध बिघडणार नाहीत याची दक्षता घ्या. आपल्या विरोधकांना जागीच खिळवून ठेवाल. सरकारी तसेच प्रशासकीय कामे उत्तमरित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. एकदा ठरवलं की त्या दिशेने कामाला लागा, तरच यश मिळेल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                     सिंह

राशीस्थानी राहू, गुरु द्वितीय, शनि-प्लुटो पंचम, चंद्र-नेपच्युन-केतु सप्तम, चंद्र- शुक्र अष्टम, चंद्र- रवि-बुध-हर्षल नवम, चंद्र-मंगळ दशमस्थानातून भ्रमण करणार आहेत. आपल्याला आपल्या गुरुजनांची तसेच वृद्धांची सेवा करण्याची संधी मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामातील बदल सकारात्मकता दाखवेल. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. आहारविहाराची बंधने पाळणे अत्यावश्यक तरेल. आर्थिकमान चांगले असल्याने वातावरण आनंदी राहील. हाती मोठया प्रमाणात पैसे येतील. प्रेमसंबंधात तणाव आणू नका. जोडीदाराशी मतभेदास कारणीभूत ठरणारे मुद्दे टाळा. जोडीदाराबरोबर अबोला टाळावा. पती- पत्नीनी प्रयत्नपूर्वक एकमेकांच्या आवडीनिवडी जपाव्यात व एकमेकांना सहकार्य करावे. आपल्या लहरी आणि हट्टी स्वभावाला थोडी मुरड घातल्यास वातावरण सलोख्याचे राहील.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत गुरु, शनि-प्लुटो चतुर्थ, चंद्र- नेपच्युन-केतु षष्ठ, चंद्र- शुक्र सप्तम, चंद्र-रवि- बुध- हर्षल अष्टम, चंद्र-मंगळ नवम, राहू व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. आरोग्यसंपत्तीचे संवर्धन करण्यात दक्ष राहा. अधूनमधून प्रकृतीच्या आवश्यक त्या तपासण्या करून घेणे हितावह आहे. अती विचार टाळावेत. नातेवाईकांच्याकडून अपेक्षा ठेवू नका. नातेवाईकांच्या मध्यस्थीने कोणतेही व्यवहार करु नका. घरगुती कामे चातुर्याने पूर्ण करा. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. आपल्या जीवलग व्यक्तीवर जास्त अपेक्षांचे ओझे ठेवू नका. जोडीदाराच्या मतांचा विचार करा आणि आदर ठेवा. वैवाहिक जोडिदाराच्या मनाचा वेध घेण्यास तत्पर राहा. वैवाहिक सौख्य वृद्धिंगत करण्यासाठी घरातील वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

पराक्रमात शनि-प्लुटो, पंचमात चंद्र- नेपच्युन-केतु, चंद्र-शुक्र षष्ठ, चंद्र-रवि-बुध-हर्षल सप्तमात, चंद्र-मंगळ अष्टमात, राहू लाभात, व्ययात गुरु अशी ग्रहांची ठेवण असेल. स्वत चे आरोग्य सांभाळणे आपल्या हाती आहे. नियमित साधा सात्विक आहार घ्या. रोजचे चालणे, व्यायाम, योगसाधना करावयास हवी. बऱ्याच दिवसापासून मातुल्य घराण्याकडे जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपल्या बोलण्यामध्ये माधुर्य आणण्याचा प्रयत्न करा. खर्चापेक्षा पैशाच्या संचयनाचा विचार करणे आवश्यक आहे. प्रॉपर्टीत पैसा गुंतवून फसू नका. गोड बोलणाऱ्या मित्रांपासून सावध राहा. पत्रव्यवहार जपून करावा. वाहन चालविताना वाहनाच्या गतिवर योग्य ते नियंत्रण ठेवावे लागेल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

द्वितीयात शनि-प्लुटो, चतुर्थात चंद्र-नेपच्युन- केतु, पंचमात चंद्र-शुक्र, षष्ठात चंद्र-रवि-बुध- हर्षल, सप्तमात चंद्र-मंगळ, राहू दशमात, लाभात गुरु असे ग्रहमान असतील. सकस व सात्विक शुद्ध आहार व योग्य विश्रांती चांगले आरोग्य प्रदान करेल. स्वत:च्या तब्येतीची जोपासना करा. सकाळी लवकर उठून जलद चालण्याचा व्यायाम केल्यास लाभ होईल. बँकेकडून किंवा इतर कोणाकडूनही आर्थिक मदतीची अपेक्षा असल्यास प्रयत्न करायला हरकत नाही. खरेदी करताना किंमत कमी करण्याचा प्रयत्न करा. नोकरीतील धरसोड वृत्ती सोडून द्या. नोकरीत अशामुळे स्थिरता मिळत नाही. व्यापाऱ्यांनी करार करताना आपला धंदा कसा वाढेल याचा विचार करून तसे करावेत. काळानुसार बदलायला हवंच.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

आपल्या राशीत शनि-प्लुटो, पराक्रमात चंद्र-नेपच्युन- केतु, चतुर्थात चंद्र- शुक्र, पंचमात चंद्र-रवि- बुध-हर्षल, षष्ठात चंद्र-मंगळ, नवमात राहू, गुरु दशमात अशी ग्रहांची रचना असेल. आपल्या ठामाचा योग्य मोबदला प्राप्त होईल. नोकरीतील प्रगती लाभदायक आहे. विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या स्विकारण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी आवाक्याबाहेरचे धाडस करु नये. कोणाच्या प्रभावाखाली जाऊन निर्णय घेऊ नये. कामगारांशी व्यवहार करतांना जपून करावे. स्वत:ची कामे शक्यतो स्वत वेळेवर करा. तुम्ही कुटुंबियांना आपलेसे करून पुढे वाटचाल करा. घरगुती वातावरण चांगले ठेवा. संततीच्या चुकाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. स्वत:च्या कामाबद्दल व कर्तव्याबद्दल व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                       मकर

द्वितीयात चंद्र-नेपच्युन- केतु, पराक्रमात चंद्र-शुक्र, चतुर्थात चंद्र-रवि- बुध-हर्षल, पंचमात चंद्र- मंगळ, अष्टमात राहू, नवमात गुरु, व्ययस्थानात शनि-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. क्षमतेपेक्षा अधिक परिश्रम करणे आरोग्यास हानीकारक तरेल. स्वभावात चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता आहे. तब्येत बिघडेपर्यंत जागरण करु नका. आर्थिक धोरणात परिस्थितीनुरूप बदल करा. पैशांचे व्यवहार करताना माणसांची योग्य पारख करा. घरच्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत. घरात ज्येष्ठांना चार सबुरीच्या गोष्टी सांगणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट फार न ताणता त्यातून सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल हयाचा विचार करा. विद्यार्थ्यांनी कसून कष्ट करावेत तरच यश मिळेल. गोड बोलून कार्य साध्य करा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी चंद्र- नेपच्युन-केतु, द्वितीयात चंद्र- शुक्र, पराक्रमात चंद्र-रवि- बुध-हर्षल, चतुर्थात चंद्र- मंगळ, सप्तमात राहू, अष्टमात गुरु, लाभस्थानी शनि-प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. या आठवडयात शक्यतो कोणाला जामिन न राहणे उचित होईल. लेखी व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची खात्री करून घेण्यासाठी जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करून घ्यावे. घरगुती गोष्टींचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नये. कौटुंबिक जीवनात मतभेद जरी तीव्र झाले तरी टोकाची भूमिका न घेता विसरा व क्षमा करा. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. आपल्या कामातून ओळख निर्माण करा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मीन | साप्ताहिक राशिभविष्य
                      मीन

आपल्या राशीत चंद्र- शुक्र, द्वितीयात चंद्र- रवि- बुध- हर्षल, पराक्रमात चंद्र-मंगळ, षष्ठात राहू, सप्तमात गुरु, दशमात शनि- प्लुटो, व्ययात चंद्र- नेपच्युन- केतु असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. प्रिय व्यक्तीच्या कामात हातभार लावा. परस्परांमधील लहानसहान मतभेद दूर करा. एकमेकांशी गोड बोलण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील काही सदस्य दुराग्रही असू शकतात. घरातील वाद एकमेकांच्या सामोपचाराने घरातच सोडवा. ज्येष्ठ व्यक्तीचा मान राखा. नोकरदार लोकांनी आपल्या वरिष्ठांशी अतिशय जपून राहावे. ऑफिसमध्ये फालतू राजकारणात भाग घेऊ नये. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. आपण कामातून स्वत : च्या कुवतीनुसारच व्यापार करावा. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा झगडून मिळवावी लागेल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

 

साप्ताहिक राशीभविष्य – १७ एप्रिल ते २३ एप्रिल २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

रवि-बुध-हर्षल प्रथम, मंगळ द्वितीय, राहू पंचम, गुरु षष्ठ, चंद्र अष्टम, चंद्र-शनि-प्लुटो नवम, चंद्र- दशम, चंद्र-नेपच्युन- केतु लाभ, शुक्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. कुटुंबामध्ये अनेक वेळा होणाऱ्या वादविवादावर समजुदारपणे तोडगा काढावयास हवा. तुमच्यात असलेली विवेकबुद्धी वापरून तुम्ही अशक्य कठीण परिस्थितीवर मात करू शकाल. सबुरीचे धोरण स्विकारा, ज्येष्ठांचा सल्ला घ्या. अधिक लालसेने चुकीच्या मार्गाने धनार्जन करण्याचा मोह आवरावयास हवा. खर्चालाही अनेक वाटा फुटतील. खर्चावर बुद्धीचातुर्याने नियंत्रण आणा. विद्यार्थ्यांनी बाहेरील मोहजालापासून स्वत:ला अलिप्त ठेवा. आपले सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे. तणावातून मार्ग शोधावा लागेल. नातेवाईकांकडून अपेक्षा ठेवू नका.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

मंगळ प्रथम, राहू चतुर्थ, गुरु पंचम, चंद्र सप्तम, चंद्र-शनि-प्लुटो अष्टम, चंद्र नवम, चंद्र-नेपच्युन- केतु दशम, शुक्र लाभ, रवि-बुध-हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. तिखट व तामसी पदार्थ खाण्याचे टाळावे. जेवणाची एकच वेळ असावी. ताण तणावाला दोन हात लांब ठेवणे हितकर होईल. स्वत:स जास्त दगदग करून घेऊ नका. कौटुंबिक प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या. वादविवादाचे प्रसंग टाळा. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. सहजीवन म्हणजे तडजोड हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावतील. वाचन, चिंतन मननाचा उत्तम परिणाम होऊ शकतो. प्रथम आपल्या क्षमतेचा विचार करणे व मग आश्वासन देणे योग्य ठरेल.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

राहू पराक्रम, गुरु चतुर्थ, चंद्र षष्ठ, चंद्र- शनि-प्लुटो सप्तम, चंद्र अष्टम, चंद्र-नेपच्युन-केतु नवम, शुक्र दशम, रवि-बुध- हर्षल लाभ, मंगळ व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. कोणत्याही क्षेत्रात धाडस करताना विचार करावा लागेल. लेखी व्यवहार किंवा करार करताना आपल्या हातून काही चुका होणार नाहीत याची दक्षता घ्या. प्रियजनांच्या गाठीभेटी आणि कौटुंबिक कार्यक्रमामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. घरात लवचिक धोरण ठेवा. विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची खात्री करून घेण्यासाठी जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करून घ्यावे. स्वत : ची बुद्धी जागृत ठेवा. नोकरीत वरचा दर्जा मिळू शकेल. बदली व बढती दोन्हीची शक्यता राहील. धंदा व्यवसायात चैतन्य आणण्याचा प्रयत्न करा.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क

राहू द्वितीय, गुरु पराक्रम, चंद्र पंचम, चंद्र- शनि-प्लुटो षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र- नेपच्युन- केतु अष्टम, शुक्र नवम, रवि-बुध-हर्षल दशम, मंगळ लाभस्थानातून भ्रमण करणार आहेत. स्वत:ला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावयास हवा. तणावमुक्त जीवन स्वीकारा. किरकोळ असणाऱ्या आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करु नये. खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. भावाबहिणीशी काही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कुटुंबात सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे हे लक्षात घ्यावे लागेल. नोकरदारांनी जबाबदारी वाढवून घेऊ नये. नोकरीत कोणालाही तुमच्या कामात ढवळाढवळा करु देऊ नका. सरकारी कामातून लाभ होईल. विकासाच्या वाटेवर थांबू नका. पुढे चालत राहा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                       सिंह

राशीस्थानी राहू, गुरु द्वितीय, चंद्र चतुर्थ, चंद्र-शनि-प्लुटो पंचम, चंद्र षष्ठ, चंद्र- नेपच्युन- केतु सप्तम, शुक्र अष्टम, रवि- बुध-हर्षल नवम, मंगळ दशमस्थानातून भ्रमण करणार आहेत. अनेक दिवसापासून योजलेल्या प्रवासाला जाण्याचे आपले स्वप्न या आठवडयात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. प्रवासात अनोळखी लोकांच्या जास्त जवळ जाऊ नका. त्यांच्याशी व्यवहार करताना सतर्कता राखावी लागेल. घरात काही मनासारखे समारंभ होतील. समोरील व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार करा. त्यांची योग्य विचारणा करा. दिलेला शब्द पाळण्याचे कसोशीने प्रयत्न करा. काही वेळा शांततेसाठीही बरीच मोठी किंमत मोजावी लागते हे ध्यानात ठेवा. कोर्ट खटल्यांच्या तारखा पुढे ढकलणे उचित राहिल.

 

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत गुरु, चंद्र पराक्रम, चंद्र-शनि- प्लुटो चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र-नेपच्युन-केतु षष्ठ, शुक्र सप्तम, रवि-बुध- हर्षल अष्टम, मंगळ नवम, राहू व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. आरोग्याबाबत आळस करणे अनारोग्यास निमंत्रण देण्यासारखे आहे. अतिश्रमाने तब्येतीच्या तक्रारी उद्‌भवतील. शारीरिक वेदनांपासून स्वत : चा बचाव करावयास हवा. प्रेम संबंधात सावधानतापूर्वक  विचार करावयास हवा. एक दुसऱ्याचे सहकार्य महत्वाचे होईल. पती-पत्नीनी प्रयत्नपूर्वक एकमेकांच्या आवडीनिवडी जपाव्यात व एकमेकांना सहकार्य करावे. महत्वाच्या कामात जोडिदाराचा सल्ला उपयुक्त तरेल. वैवाहिक सौख्य टिकवून ठेवा. सर्व गोष्टी नशिबावर अवलंबून असतात असे म्हणत हात पाय गाळून बसू नये. प्रयत्न करणे सरतेशेवटी आपल्याच हाती असते.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

चंद्र द्वितीय, पराक्रमात चंद्र-शनि-प्लुटो, चतुर्थात चंद्र, पंचमात चंद्र-नेपच्युन-केतु, शुक्र षष्ठ, रवि- बुध-हर्षल सप्तमात, मंगळ अष्टमात, राहू लाभात, व्ययात गुरु अशी ग्रहांची ठेवण असेल. दगदग कमी करण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका. तुम्ही ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना परिक्षेत अपेक्षेपेक्षा कमी यश मिळण्याची शक्यता असल्याने जास्त प्रयत्नावर भर द्यावा लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात शॉर्टकट घेऊन चालणार नाही. प्रेमांच्या माणसांशी तुटक वागू नका. प्रेम प्रसंगामध्ये सावधगिरी बाळगा. जोडीदाराविषयीची गूढ भावना मनातून काढून टाका. जोडीदाराशी कुठल्याही खाजगी गोष्टी लपवू नका. करार पत्रावर नीट वाचून सह्या करा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

चंद्र प्रथम, द्वितीयात चंद्र-शनि-प्लुटो, पराक्रमात चंद्र, चतुर्थात चंद्र- नेपच्युन-केतु, पंचमात शुक्र, षष्ठात रवि-बुध-हर्षल, सप्तमात मंगळ, राहू दशमात, लाभात गुरु असे ग्रहमान असतील. दररोज सकाळचानियमित व्यायाम, चालणे इ. ने प्रकृती उत्तम रहाण्यास मदत होईल. शुद्ध सात्विक व मिताहार ही निरोगी जीवनाची किल्ली आहे. कुटुंबातील आपापसात निर्माण झालेले ताणतणाव सामजस्थाने कमी करु शकाल. नातेवाईकांची ढवळाढवळ खपवून घेऊ नये. घरगुती कामासाठी वेळ काढा. आर्थिक गुंतवणूक भविष्यासाठी हितकारक होईल. ज्येष्ठांचा सल्ला आर्थिक कामकाजासाठी घ्या. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करु नका. अहंकार आणि मोहाला बळी पडू नका. नवीन संपर्क प्रस्थापित होतील.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

आपल्या राशीत चंद्र-शनि-प्लुटो, द्वितीयात चंद्र, पराक्रमात चंद्र-नेपच्युन- केतु, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि-बुध- हर्षल, षष्ठात मंगळ, नवमात राहू, गुरु दशमात, चंद्र व्ययात अशी ग्रहांची रचना असेल. प्रेम संबंधात एकमेकांवर विश्वास ठेवा. प्रेमाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. प्रिय व्यक्तीच्या लहानसहान अपेक्षांचा अंदाज घ्या. मनाची गोंधळाची स्थिती सोडा. साथीदाराशी विवेकाने वागा. वैवाहिक जीवनातील कर्तव्य पूर्ण करा. आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने चालू राहणार नाहीत याची काळजी घ्या. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची लक्षणीय प्रगती होईल. शह आपल्यासमोर टिकाव धरू शकणार नाही. तुमच्या क्रांतिकारक विचारांना कृतीत आणा. संघर्ष टाळा व सावध राहा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                       मकर

चंद्र प्रथम, द्वितीयात चंद्र-नेपच्युन-केतु, पराक्रमात शुक्र, चतुर्थात रवि-बुध-हर्षल, पंचमात मंगळ, अष्टमात राहू, नवमात गुरु, लाभात चंद्र, व्ययस्थानात चंद्र-शनि- प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. आरोग्याची हेळसांड करू नका. आजार झाल्यावर तातडीने उपाय योजना करावयास हवी. आहार-विहाराचे नियम पाळा. आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील. संततीच्या चुका त्यांच्या नजरेला आणून देणे आवश्यक ठरेल. तुम्हास गोड आश्वासन देणाऱ्या नातेवाईकांना वेळीच ओळखणे गरजेचे आहे. कुठलाही महत्वाचा निर्णय नीट विचारांतीच घेणे हिताचे तरेल. विचारांवर ताबा ठेवा. मानापमांनाच्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष देऊ नये.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी चंद्र-नेपच्युन-केतु, द्वितीयात शुक्र, पराक्रमात रवि-बुध-हर्षल, चतुर्थात मंगळ, सप्तमात राहू, अष्टमात गुरु, दशमात चंद्र, लाभस्थानी चंद्र- शनि- प्लुटो, व्ययात चंद्र असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. जमेल त्या पद्धतीने थोडया थोडया आर्थिक गुंतवणुकी करणे भविष्यासाठी हितकराक आहे. आर्थिक लाभ व्यवस्थित होत राहातील. स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्री व्यवहारास उत्तम यश लाभेल. घरच्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत. संततीकडून दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी अपयशाची कसर भरुन काढण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी. स्वत:चे लक्ष विचलित होऊ देऊ नका. ठाम निश्चयाने तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकता. कोणतेही साहस करताना योग्य विचार करा.

 

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

मीन | साप्ताहिक राशिभविष्य
                      मीन

आपल्या राशीत शुक्र, द्वितीयात रवि-बुध- हर्षल, पराक्रमात मंगळ, षष्ठात राहू, सप्तमात गुरु, नवमात चंद्र, दशमात चंद्र-शनि- प्लुटो, लाभात चंद्र, व्ययात चंद्र-नेपच्युन-केतु असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत.सर्वसाधारणपणे प्रकृती चांगली राहील. आपल्या खाण्याच्या वेळा निश्चित ठेवा. जेवण खाणं व्यवस्थित ठेवा. कौटुंबिक तणाव वाढू देऊ नका. वरिष्ठांना न दुखवता तुमचे मत मांडा. आपल्या वागण्या बोलण्याने सर्वावर वर्चस्व राहील. सामाजिक व धार्मिक कार्याची आवड असेल. अती विचारांवर बंधन असावयास हवे. स्पर्धात्मक गोष्टीची आवड असल्यास जरूर भाग घ्या. आपल्या शत्रूच्या कारवायांवर लक्ष असू द्या. दर्जेदार लोकांच्या ओळखी होतील.

 

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

 

साप्ताहिक राशीभविष्य – १० एप्रिल ते १६ एप्रिल २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

रवि-मंगळ-बुध-हर्षल प्रथम, मंगळ द्वितीय, चंद्र-राहु पंचम, चंद्र-गुरू षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र अष्टम, शनि- प्लुटो नवम, नेपच्युन- केतु लाभ, रवि- शुक्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. आरोग्याबाबत सतर्क राहा. निरोगी प्रकृती राखण्यासाठी मसालेदार, चटपटीत व तेलकट पदार्थ टाळणे आवश्यक बाब आहे. अनाकलनीय खर्चांना तोंड द्यावे लागेल. आर्थिक स्थिती बलवान करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना परिश्रमाशिवाय यश नाही. स्वत:च्या छंदाकडे लक्ष देण्याची ही वेळ नाही हे विद्यार्थ्यांनी नीट ध्यानात ठेवावे. प्रेम प्रसंगामध्ये सावधगिरी बाळगा. अधिकार गाजवून प्रेम संपादन करता येत नाही. पती- पत्नीत वाद होण्याची शक्यता आहे. साथीदाराच्या कामाचे कौतुक करा.

जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

मंगळ प्रथम, चंद्र-राहु चतुर्थ, चंद्र-गुरू पंचम, चंद्र षष्ठ, चंद्र सप्तम, शनि-प्लुटो अष्टम, नेपच्युन- केतु दशम, रवि-शुक्र लाभ, रवि-मंगळ- बुध- हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. घरातील समस्या थोडया बाजूला ठेवून वैयक्तिक प्रगतीकडे लक्ष द्या. स्वत:चे म्हणणे ठामपणे मांडा. आवडत्या मित्र मैत्रिणीबरोबर मजा करा. नोकरी व्यवसायात हाताखालील व्यक्तीकडून दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. इतरांवर विश्वास न ठेवता काम करा. अधिक कष्ट करून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करावे लागेल. विद्यार्थ्यांनी स्वत: हून ठरविलेले उद्दिष्ट ते पूर्ण करु शकतील. शिक्षणात उत्तम प्रकारचे यश मिळेल. टोकाचे विचार करून मनस्ताप करून घेऊ नका.

      जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

चंद्र-राहु पराक्रम, चंद्र-गुरू चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र षष्ठ, शनि-प्लुटो सप्तम, नेपच्युन-केतु नवम, रवि-शुक्र दशम, रवि-मंगळ-बुध- हर्षल लाभ, मंगळ व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. आपल्या मित्र परिवारांना तसेच नातेवाईकांना मदत करण्याची संधी मिळेल. मुलांना स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवा. मुलांना नेहमी विजेत्यासारखे वागायला शिकवा. घराच्या नुतनीकरण तसेच सुशोभिकरणासाठी खर्च कराल. मंगल कार्यात सहभागी व्हाल. कोणत्याही प्रकारचे लेखी व्यवहार किंवा करार शक्यतो करु नयेत. शेजाऱ्यांशी होणारे वादविवाद कमी कसे करता येतील याचा विचार करा. आत्मविश्वास कमालीचा वाढेल. तुमच्या क्रांतिकारक विचारांना कृतीत आणा. थोर व्यक्तींचा सहवास लाभेल.

जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                       कर्क

चंद्र-राहु द्वितीय, चंद्र-गुरू पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र पंचम, शनि-प्लुटो षष्ठ, नेपच्युन-केतु अष्टम, रवि-शुक्र नवम, रवि-मंगळ- बुध- हर्षल दशम, मंगळ लाभस्थानातून भ्रमण करणार आहेत. कौटुंबिक प्रश्न असंतोष वादाचे प्रसंग होणार नाहीत यांच्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. घरात शुभ बातमी मिळेल. कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. रोजगाराची वा अन्य संधी तुमच्याकडे स्वत : चालत येईल. न पेलणाऱ्या योजनांच्या मागे धावू नका. वरिष्ठ अधिकारी व्यक्तींशी उद्धटपणे वागू नका. सर्व व्यवहार मुत्सद्दीपणे पार पाडाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलीत होता कामा नये. स्पर्धा परिक्षेत आत्मविश्वासाने उतरा व कौतुकास पात्र व्हा. बोलताना दुसऱ्याच्या मनाला त्रास होईल असे बोलू नका. 

जाणून घ्या आपली कुंडली 

             

 

 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                    सिंह

राशीस्थानी चंद्र- राहू, चंद्र- गुरु द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र चतुर्थ, शनि-प्लुटो पंचम, नेपच्युन- केतु सप्तम, रवि-शुक्र अष्टम, रवि-मंगळ-बुध-हर्षल नवम, मंगळ दशमस्थानातून भ्रमण करणार आहेत. एकटयाने राहून अस्वस्थता वाढवून घेऊ नका. रागावर आणि चिडचिडीवर नियंत्रण ठेवा. कामाची दगदग फार होणार असल्याने प्रकृती अस्वास्थ जाणवेल. तुम्ही केलेल्या पैशासंबंधी मागणीस योग्य प्रतिसाद मिळेल. नीट नियोजन करून धनार्जनासोबत धन संचय करा. उसने पैसे देताना चार वेळेस विचार करावा. घरात आनंदी वातावरण राहील. घर सजवले जाईल. घरातील मंगल कार्ये, लग्नसमारंभ जुळतील. गोडी गुलाबीने घेतल्यास गोष्टी हाताबाहेर जाणार नाहीत. लाचलुचपती सारख्या विषयापासून दूर राहा.

 

जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत चंद्र-गुरू, चंद्र द्वितीय, चंद्र पराक्रम, शनि-प्लुटो चतुर्थ, नेपच्युन-केतु षष्ठ, रवि- शुक्र सप्तम, रवि-मंगळ-बुध-हर्षल अष्टम, मंगळ नवम, चंद्र- राहू व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. एखादया व्यक्तीचे अनुकरण करून आपली खाण्याची पद्धती बदलू नका. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करून घ्या. व्यायामाची आवड निर्माण करा. प्रेम संबंधात एक दुसऱ्याचे सहकार्य महत्वाचे होईल. समोरील व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार करा. त्यांची योग्य विचारणा करा. जीवनसाथीच्या हृदयात स्थान मिळवा. जीवनसाथीविषयी विश्वास उत्पन्न करा. नि:संकोच वृत्ती ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. संततीबाबत शुभवार्ता कानावर येईल. घरातील वाद विकोपाला जाऊ देऊ नका.

जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

चंद्र प्रथम, चंद्र द्वितीय, पराक्रमात शनि- प्लुटो, पंचमात नेपच्युन-केतु, रवि-शुक्र षष्ठ, रवि-मंगळ- बुध-हर्षल सप्तमात, मंगळ अष्टमात, चंद्र-राहु लाभात, व्ययात चंद्र-गुरू अशी ग्रहांची ठेवण असेल. एखादया व्यक्तीचे अनुकरण करून आपली खाण्याची पद्धती बदलू नका. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करून घ्या. आपल्या आरोग्यावर ताण वाढेल असे काम टाळा. आर्थिक अडचणीमुळे मानसिक ताण तणाव वाढेल. उधार उसनवारीचे व्यवहार तुम्हाला हितकारक ठरणार नाही. खर्चाच्या अनेक वाटांवर नियंत्रण आणावे लागेल. कौटुंबिक जीवनात मतभेद जरी तीव्र झाले तरी टोकाची भूमिका न घेता विसरा व क्षमा करा. कुटुंबातील गोष्टीना जरूरीनुसार प्राध्यान्य देणे जरुरीचे आहे.

जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

चंद्र प्रथम, द्वितीयात शनि- प्लुटो, चतुर्थात नेपच्युन-केतु, पंचमात रवि-शुक्र, षष्ठात रवि-मंगळ- बुध-हर्षल, सप्तमात मंगळ, चंद्र- राहू दशमात, लाभात चद्र-गुरु, व्ययात चंद्र असे ग्रहमान असतील. मानसिकता सकारात्मक ठेवल्यास चिंता कमी होतील. उदासीनता घालवण्यासाठी योगासने व प्राणायाम करावा. वैद्यकीय खर्च वाढणार नाही यांची काळजी घ्यावी. खाण्यापिण्यात हयगय करु नका. समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी चांगली संधी चालून येईल. अर्थाजनांतील गोंधळाची स्थिती विचारपूर्वक हाताळा. स्वत: च्या फायद्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबू नका. येणाऱ्या पैशासाठी पाठपुरावा करा. ज्येष्ठ व्यक्तीचा मान राखा. आपल्या बुद्धीचातुर्याने घरातील वादविवाद सोडवा. घरातील पाळीव प्राण्याच्या आरोग्याची काळजी घ्या.

जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                      धनु

आपल्या राशीत शनि- प्लुटो, पराक्रमात नेपच्युन-केतु, चतुर्थात रवि-शुक्र, पंचमात रवि-मंगळ- बुध- हर्षल, षष्ठात मंगळ, नवमात चंद्र-राहु, चंद्र- गुरु दशमात, चंद्र लाभात, चंद्र व्ययात अशी ग्रहांची रचना असेल. मानसिक संतुलनासाठी नित्यनियमाने योग साधना करावयास हवी. कोणत्याही दुर्घटनेपासून सावधानता बाळगा. धंदा व्यवसायात मोठी जबाबदारी पेलावी लागेल. सर्व व्यवहार मुत्सद्दीपणे पार पाडाल. कामाच्या ठिकाणी मान सन्मान लाभेल. नोकरदारांना वरचा दर्जा लाभेल. पात्रतेप्रमाणे रोजगाराची संधी लाभेल. स्वत:जवळील कौशल्य वापरा. प्रेम प्रकरणांच्या जास्त आहारी जाऊ नये. प्रेमांच्या माणसांशी तुटक वागू नका. वैवाहिक जीवनात बरीच तडजोड करावी लागेल. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                     मकर

आपल्या राशीत शनि- प्लुटो, पराक्रमात नेपच्युन-केतु, चतुर्थात रवि-शुक्र, पंचमात रवि-मंगळ- बुध- हर्षल, षष्ठात मंगळ, नवमात चंद्र-राहु, चंद्र- गुरु दशमात, चंद्र लाभात, चंद्र व्ययात अशी ग्रहांची रचना असेल. मानसिक संतुलनासाठी नित्यनियमाने योग साधना करावयास हवी. कोणत्याही दुर्घटनेपासुन सावधानता बाळगा. धंदा व्यवसायात मोठी जबाबदारी पेलावी लागेल. सर्व व्यवहार मुत्सद्दीपणे पार पाडाल. कामाचे ठिकाणी मान सन्मान लाभेल. नोकरदारांना वरचा दर्जा लाभेल. पात्रतेप्रमाणे रोजगाराची संधी लाभेल. स्वत:जवळील कौशल्य वापरा. प्रेम प्रकरणांच्या जास्त आहारी जाऊ नये. प्रेमांच्या माणसांशी तुटक वागू नका. वैवाहिक जीवनात बरीच तडजोड करावी लागेल. जीवनसाथीच्या रोग्यांची काळजी घ्यावी.

जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी नेपच्युन-केतु, द्वितीयात रवि- शुक्र, पराक्रमात रवि-मंगळ-बुध-हर्षल, चतुर्थात मंगळ, सप्तमात चंद्र-राहु, अष्टमात चंद्र-गुरू, नवमात चंद्र, दशमात चंद्र, लाभस्थानी शनि- प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. कुटुंबातील व्यक्तींच्या मनाचा विचार करा. त्यांच्या अचानकपणे बदलणाऱ्या स्वभावाचे कारण शोधा. हट्टी स्वभावाच्या व्यक्तींना समजून घ्या. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी नवे वेळापत्रक तयार करावे. विद्यार्थ्यांनी काही तरी नवे शिकण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक अभ्यासात आपले मन रमविण्याचा प्रयत्न करावा. मित्रांना मदत करताना तुम्ही अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या. नोकरीत वरिष्ठ तुमच्या चांगल्या कामाची दखल घेतील. महत्वाच्या कामात वडिलांचा सल्ला उपयुक्त ठरेल.

मीन
                      मीन

आपल्या राशीत रवि-शुक्र, द्वितीयात रवि-मंगळ-बुध-हर्षल, पराक्रमात मंगळ, षष्ठात चंद्र-राहु, सप्तमात चंद्र- गुरु, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र, दशमात शनि-प्लुटो, व्ययात नेपच्युन-केतु असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. मानसिक त्रासास सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याने मनावर नियंत्रण ठेवा. साधा पौष्टिक, चौरस आहार व नियमीत व्यायामाने निरोगीपणा राखण्यास मदत करेल. आर्थिक लाभ तुमच्या नियोजनामुळे उंचावू शकेल. आर्थिक गुंतवणूक करताना पूर्ण विचार करणे जरूरी आहे. कोणताही आर्थिक निर्णय ठामपणे घ्यावा. सरकारी कामांना उत्तम गती मिळण्याचे संकेत आहेत. विरोधकांच्या आरोपाकडे व टीकेकडे लक्ष देण्यात वेळ न घालवता कामावर लक्ष केंद्रित करा.

साप्ताहिक राशीभविष्य – २ एप्रिल ते ९ एप्रिल २०१७

मेष | साप्ताहिक राशिभविष्य
                      मेष

मंगळ-बुध-हर्षल प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र-राहु पंचम, गुरु षष्ठ, शनि-प्लुटो नवम, नेपच्युन-केतु लाभ, रवि-शुक्र-हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. सर्व प्रकाराच्या सकारात्मक  गोष्टी घडून आनंद मिळेल. रागावर वेळीच नियंत्रण ठेवावे. पथ्यपाणी नीट सांभाळल्यास आरोग्यस्वास्थ टिकेल. घरात शांतीपूर्ण वातावरण राहिल. घरात मंगलकार्याचा छान योग जुळेल.प्रेमात नको ते धाडस करु नका. वैवाहिक जीवनात विचारांची पारदर्शकता राहिल्यास वाद कमी होतील. अभ्याससहजासहजी होणार नाही,विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक तो केला पाहिजे.इतरांच्या मनात प्रेरणेची ऊर्जा निर्माण करण्यात पुढाकार घ्या.

जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                      वृषभ

चंद्र प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र-राहु चतुर्थ, गुरु पंचम, शनि-प्लुटो अष्टम, नेपच्युन-केतु दशम, रवि-शुक्र- हर्षल लाभ, मंगळ-बुध- हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. विद्यार्थ्यांची अभ्यासात जबरदस्त प्रगती होईल. विद्यार्थी स्वत : ठरवून घेतलेले उद्दिष्ट पूर्ण करु शकतील. नोकरीमध्ये तुमच्या कामात कोणत्याही कारणाने दुर्लक्ष झाल्यास वरिष्ठांना राग येईल. नोकरदार वर्गानी आपल्या अपेक्षा अनावश्यक वाढवू नये. नवीन उद्योग सुरु करण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करा. धंदा, व्यवसायात गुंतागुंतीच्या कामाचा संबंध येईल. कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागेल. घर बदलण्याचे विचार मुळीच करु नयेत. आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

      जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

 चंद्र प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र-राहु पराक्रम, गुरु चतुर्थ, शनि-प्लुटो सप्तम, नेपच्युन- केतु नवम, रवि-शुक्र-हर्षल दशम, मंगळ- बुध-हर्षल लाभ, चंद्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. नोकरीमध्ये छुप्या स्पर्धकांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल. धंद्यात अचानक होणाऱ्या बदलांची दखल घ्या. व्यवसायातल्या जोडिदारावर अतिरिक्त विश्वास ठेऊ नका. सरकारी कामे यशस्वी होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी जोरात सुरु करावी. विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये. बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा, ताण विसरा. लोकांना बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त भर द्या. शुभकार्य तुमच्या हातून पूर्ण होईल. गोड आश्वासन देणाऱ्यांपासून सावध राहा.

जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                      कर्क

चंद्र प्रथम, चंद्र-राहु द्वितीय, गुरु पराक्रम, शनि- प्लुटो षष्ठ, नेपच्युन-केतु अष्टम, रवि-शुक्र-हर्षल नवम, मंगळ-बुध-हर्षल दशम, चंद्र लाभ, चंद्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. अनारोग्य ओढावल्यास योग्य वेळीच तपासणी व औषधोपचार करावेत. पथ्य व योगाभ्यास याकडे लक्ष द्या. मानसिक समतोल ढळू देऊ नका. काही घरगुती समस्यांमुळे मन थोडे गोंधळात राहील तेंव्हा जास्त काळजी करु नका. वडिलमाणसांच्या तब्येतीची काळजी घ्या. प्रेमात गुरफटलेल्यांनी बेसावध राहू नये. जोडिदाराला समजून घेणे गरजेचे आहे. पती- पत्नींनी आपल्या वागण्यात पारदर्शकता ठेवावी म्हणजे गैरसमज होणार नाहीत. आपली जबाबदारी ओळखून वागण्याचा काळ आहे  

जाणून घ्या आपली कुंडली 

             

 

 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                       सिंह

राशीस्थानी चंद्र-राहु, गुरु द्वितीय, शनि- प्लुटो पंचम, नेपच्युन-केतु सप्तम, रवि-शुक्र-हर्षल अष्टम, मंगळ- बुध-हर्षल नवम, चंद्र दशम, चंद्र लाभ, चंद्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. प्रकृतीच्या बाबत चालढकलपणा योग्य ठरणार नाही. जुनी दुखणी वर डोके काढण्याची शक्यता असते तेव्हा जपा. थांबलेला व उधार दिलेला पैसा मिळेल. मोठया आर्थिक व्यवहारात तज्ञांचा सल्ला फायदेशीर तरेल. हातातील पैशाचा काटकसरीने वापर करा. प्रेमात विश्चासाला तडा जाणार नाही याची दक्षता घ्या. प्रेमात सावधानता बाळगणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात एकमेकांच्या इच्छा व मनोकामना पूर्ण करण्याकडे कल ठेवा. आपली ताकद आणि मर्यादा ओळखून वागा.

 

जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                    कन्या

आपल्या राशीत गुरु, शनि-प्लुटो चतुर्थ, नेपच्युन-केतु षष्ठ, रवि-शुक्र- हर्षल सप्तम, मंगळ- बुध- हर्षल अष्टम, चंद्र नवम, चंद्र दशम, चंद्र लाभ, चंद्र-राहु व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. अति आत्मविश्वासामुळे काही अपघाती प्रसंग ओढवून घेऊ नये. आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी. थोडयाफार अडचणी येतील पण आपण त्यावर उत्तम मात करु शकाल. प्रेम संबंधात कोणीही चुकू शकतो अशावेळी त्यांच्या चुका सौम्य शब्दात दाखवा. एकमेकांबद्दल विश्वासार्हता वाढवणे जरूरीचे आहे. पती-पत्नीनी एक दुसऱ्याच्या आवडी निवडीकडे लक्ष द्यावयास हवे. जोडीदाराबरोबर अबोला टाळावा. जोडीदाराचा हट्टीपणा, लहरीपणा याला वेळोवेळी तोंड द्यावे लागेल. आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.

जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                   तूळ

पराक्रमात शनि- प्लुटो, पंचमात नेपच्युन-केतु, रवि- शुक्र-हर्षल षष्ठ, मंगळ- बुध-हर्षल सप्तमात, चंद्र अष्टमात, चंद्र नवमात, चंद्र दशमात, चंद्र- राहू लागात, व्ययात गुरु अशी ग्रहांची ठेवण असेल. आपल्याला प्रकृतीच्या छोटया-मोठया तक्रारीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या शक्तीच्या बाहेर उलाढाल्या करणे टाळावयास हवे. आरोग्यासाठी बाहेरील पदार्थ वर्ज्य करा. विद्यार्थ्यांना  प्रत्येक विषयात भरपूर तयारी करावयास हवी. विद्यायोग तुमच्या परिश्रमावर अवलंबून राहिल. नोकरदारांना वरचा दर्जा लाभेल. रोजगाराची नवीन संधी सहजगत्या उपलब्ध होईल. नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. धंद्यात काही निर्णय घेताना जाणकार व्यक्तींच्या सल्ल्यानेच चला. एखादा छोटा उद्योगही आपण भरभराटीला आणू शकता.

जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

द्वितीयात शनि- प्लुटो, चतुर्थात नेपच्युन-केतु, पंचमात रवि-शुक्र-हर्षल, षष्ठात मंगळ-बुध- हर्षल, सप्तमात चंद्र, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र, चंद्र-राहु दशमात, लाभात गुरु असे ग्रहमान असतील. आरोग्याच्या संवर्धनासाठी व्यायामाला खास प्राधान्य द्या. आहार-विहाराचे नियम पाळा. ताण तणावांना दूर ठेवा. चिंता करणे सोडा. कुटुंबात भांडणापासून लांब राहा. संततीचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करा. वेळच्या वेळी आणि शिस्तबद्ध अभ्यास केल्यास नवीन अभ्यासक्रमात त्याचा चांगला फायदा होईल. वाचन आणि लेखन यावर आधीपासून मेहनत घ्यावी. नोकरीत नवीन साहस आपण होऊन अंगावर घेऊ नका पण जबाबदारी आल्यास ती नाकारुही नका. नव्या व्यवसायासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

जाणून घ्या आपली कुंडली 

 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                        धनु

आपल्या राशीत शनि-प्लुटो, पराक्रमात नेपच्युन- केतु, चतुर्थात रवि-शुक्र-हर्षल, पंचमात मंगळ-बुध- हर्षल, षष्ठात चंद्र, सप्तमात चंद्र, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र-राहु, गुरु दशमात अशी ग्रहांची रचना असेल. आर्थिकदृष्टया कोणत्या ना कोणत्या प्रकारे आर्थिक आवक राहील. कोणाला दिलेले पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. प्रसंगी थोरामोठयांची मदत घ्यावी, वाद वाढवू नयेत. दुसऱ्यांच्या आश्वासनावर विसंबून महत्वाचे निर्णय घेऊ नका. कायदेशीर बाबींकडे लक्ष देऊन कामे करणे हितावह ठरेल. नोकरीत बढती मिळण्याचा किंवा बदली चांगल्या ठिकाणी मिळण्याचा योग आहे. वरिष्ठ नवीन जबाबदारी अंगावर टाकतील. उद्योगधंदाच्या ठिकाणी कामे मनासारखी होतील.

जाणून घ्या आपली कुंडली 

 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                      मकर

द्वितीयात नेपच्युन- केतु, पराक्रमात रवि- शुक्र- हर्षल, चतुर्थात मंगळ-बुध- हर्षल, पंचमात चंद्र, षष्ठात चंद्र, सप्तमात चंद्र, अष्टमात चंद्र-राहु, नवमात गुरु, व्ययस्थानात शनि-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. ताण तणावाला दोन हात लांब ठेवणे हितकर होईल. आरोग्य राखण्यासाठी कामामधून वेळ काढा व व्याधी निवारण करा. लोभामुळे आर्थिक संकट ओढवून घेऊ नका. आर्थिक व्यवहार मध्यस्थांच्या हाती देऊ नयेत. कौटुंबिक तणाव निवळण्यासाठी स्वत : च्या वागण्या- बोलण्यात तारतम्य ठेवावे. जाणकारांच्या सल्ल्यानेच वास्तुचे व्यवहार फायदेशीर होतील. नकारात्मक विचारांना दूर सारा. थोर व्यक्तींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्या. कागदपत्रे वाचल्याशिवाय त्यावर सही करु नका.

जाणून घ्या आपली कुंडली 

 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                    कुंभ

 राशीस्थानी नेपच्युन-केतु, द्वितीयात रवि- शुक्र-हर्षल, पराक्रमात मंगळ- बुध-हर्षल, चतुर्थात चंद्र, पंचमात चंद्र, षष्ठात चंद्र, सप्तमात चंद्र- राहू, अष्टमात गुरु, लाभस्थानी शनि-प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. घरातील मोठया व्यक्तीला विचारल्याशिवाय एकदम कुठले धाडस करु नये. मुलांना स्वत: वर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवा. मुलांची जिज्ञासू व शोधकवृत्ती वाढवा. अभ्यासात कंटाळा आळस करून अभ्यासातील सातत्य बिघडवू नये. शिक्षणातील चंचलता कमी करावी. इतरांशी सल्ला मसलत केली तरी स्वत:चे निर्णय स्वत:च घ्यावेत. आवाक्याबाहेरची कामे प्रयत्नाने उरकून घ्यावीत. वाद- विवाद करण्यात वेळ वाया घालवू नये. मित्रांपासून सावध रहा.

जाणून घ्या आपली कुंडली 

 

मीन
                     मीन

आपल्या राशीत रवि-शुक्र-हर्षल, द्वितीयात मंगळ-बुध-हर्षल, पराक्रमात चंद्र, चतुर्थात चंद्र, पंचमात चंद्र, षष्ठात चंद्र- राहू, सप्तमात गुरु, दशमात शनि-प्लुटो, व्ययात नेपच्युन-केतु असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. प्रकृतीच्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करु नका. खाण्यापिण्याच्या अतिरेकाने आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावयास हवी. कुटुंबातील एकोपा जपण्याकडे लक्ष द्या. घरात व बाहेर दोन्ही आघाडयांवर धैर्याने तोंड द्यावे लागेल. रागावर नियंत्रण ठेवल्यास अडथळे कमी होतील. शत्रू आपल्यासमोर टिकाव धरू शकणार नाहीत. घरातील पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालविताना फार सावधानता बाळगा. आता मागे वळून पाहू नका. भूतकाळाचा विचार करु नका.

जाणून घ्या आपली कुंडली