राशीभविष्य - नोव्हेंबर २०१७
मेष
नोकरी-व्यवसायात ‘आपण बरे की आपले काम बरे’ हे तत्त्व अंगीकारा. वाढते खर्च व कौटुंबिक गैरसमज यामुळे मानसिक स्वास्थ मिळणे थोडे अवघड होईल. व्यवसायात भागीदारांशी मतभेद होण्याची शक्यता.
वृषभ
कार्यक्षेत्रात नवीन जबाबदा-या स्वीकारताना शारीरिक स्वास्थ्याच्या आणि आपल्या दैनंदिन वेळापत्रकाचाही विचार करा. लहानसहान कारणांवरुन वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आपल्या विवंचना विनाकारण कुणाकडे मांडू नका.
मिथुन
या महिन्यात आलेल्या संधीचे सोने करुन घ्या. यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. कौटुंबिक जीवनात सौख्याचे क्षण अनुभवाल. उत्तरार्धात विरोधकांच्या हालचाली वाढणार आहेत.
कर्क
महिन्याच्या सुरुवातीस मिळणारे यश आनंदात भर टाकणारे असेल. नवीन ओळखी आणि प्रतिष्ठित लोकांचा सहवास ह्यामुळे मन सुखावून जाईल. कलाकारांच्या कलागुणांचे कौतुक होईल. आर्थिक व्यवहारात सावध राहा.
सिंह
महिना संमिश्र ग्रहमानाचा आहे. आप्तेष्टांचा सल्ला उपयुक्त ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. भागीदारीचे व्यवहार प्रगतिपथावर राहतील. बोलण्यावर नियंत्रण आवश्यक.
कन्या
नवीन चालून आलेल्या संधींमुळे तुमच्या कर्तृत्वास वाव मिळणार आहे. तुमचा कर्तृत्वास वाव मिळणार आहे. तुमचा सल्ला विविध पातळयांवर मान्य केला जाईल. आपल्या प्राकृतिक स्वास्थ्याचा विचार करुन जवाबदा-या स्वीकारा.
तूळ
आर्थिक आवक व होणारा खर्च यांचा मेळ घालणे थोडे कठीण होणार आहे. आर्थिक नियोजन आवश्यक. विरोधकांवर मात करण्यासाठी नवे डावपेच आखावे लागतील. उत्तरार्धात व्यावसायिक कारणास्तव प्रवास होईल.
वृश्चिक
‘‘स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा,’ असेच ह्या महिन्याचे सांगणे आहे. कार्यक्षेत्रात अधिकाराच्या मर्यादा विस्तारतील. आप्तेष्टांतील गैरसमज वेळीच दूर करा. सट्टाबाजारात अडकू नका.
धनु
तुमच्या चांगुलपणाचा नेमका वेगळा अर्थ काढल्याने तुम्हाला थोडा मनस्ताप या महिन्यात सहन करावा लागणार, असे दिसते. महत्त्वाची कामे महिन्याच्या पूर्वार्धात मार्गी लावा. जमीन-जुमल्याच्या व्यवहारातून फायदा संभवतो.
मकर
सध्या प्रकृतीकडे केलेले दुर्लक्ष नंतर तापदायक ठरेल. काही जणांना परदेश प्रवास संभवतो. पैशांचे व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. महिलांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. धार्मिक कार्याकडे कल वाढेल.
कुंभ
सचोटी व धाडस यांचा योग्य समन्वय साधावा लागेल. नवीन झालेल्या ओळखीतून काही लाभ संभवतात. योग्य पावले उचलतील तर यशप्राप्ती होईल. समाजातील स्थान उंचावेल कौटुंबिक प्रश्नांकडे दुर्लक्ष नको. विरोधकांवर बारीक नजर ठेवा.
मीन
आपल्या निर्णयावर ठाम राहिलात तर ब-याच गोष्टी साध्य करु शकाल. विरोधकांना निष्प्रभ करण्यासाठी नव्या क्लृप्त्यांचा वापर करावा लागेल. स्वीकारलेल्या जबाबदा-या पार पाडताना आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.