Horoscope (Marathi)- December 2017

राशीभविष्य - डिसेंबर २०१७

मेष

अपेक्षाभंगाने मनाला जास्त त्रास होतो, हे तुम्ही जाणताच. सहकारी तसेच कुटुंबीयांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. उत्तरार्धात कार्यक्षेत्रात एखादी समस्या निर्माण होईल. आर्थिक व्यवहार करण्याअगोदर तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

 


वृषभ

नोकरी-व्यवसायात विचारविनिमयातून घेतलेला अंतिम निर्णय योग्य ठरेल. कौटुंबिक खर्च वाढतील. सामाजिक कार्यात मानापमानाचे प्रसंग युक्तीने हाताळा. गुप्तशत्रूंच्या वाढत्या कारवायांकडे दुर्लक्ष नको. कुणाच्या दिलेल्या आश्र्वासनावर विसंबून राहू नका.


मिथुन

सामाजिक बांधिलकी ठेवून करीत असलेल्या कामांना योग्य प्रतिसाद मिळेल. कौटुंबिक पातळीवरील बदल विचारपूर्वक करा. कार्यक्षेत्रात नवीन योजना अमलात आणण्यास योग्य काळ. विवाहाची बोलणी यशस्वी होतील.


कर्क

‘नकारात्मक विचार मनातून काढा’ असेच ह्या महिन्याचे तुम्हाला सांगणे आहे. विरोधकांवर लक्ष इवा. प्रयत्नांची दिशा नक्की करुनच पाऊले उचला. उत्तरार्धात घरात शुभवार्ता कानी येईल.


सिंह

या महिन्यात कौटुंबिक पातळीवर कर्तव्यपूर्तीचा आनंद घेऊ शकाल. काही नवीन जबाबदा-या अंगावर पडतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. मुलांच गरजांचा आलेख मात्र उंचावणारा असेल.


कन्या

महिन्याच्या पूर्वार्धात अनपेक्षित असे काही कटू निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. त्याचा परिणाम आर्थिक पातळीवरही होणार आहे. अतिश्रमामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता.


तूळ

‘अहंकाराचा वारा न लागो….’ इतरांशी वागताना काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. अन्यथा तुमच्याबद्दल नाहक गैरसमज होतील. सहका-यांबरोबरचे वाद टाळा. सरकारी कामात प्रगती होईल.


वृश्चिक

ग्रहमान अनुकूल नसल्यामुळे या महिन्यात पावलोपावली तुमची कसोटी लागणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना थोरामोठयांचा सल्ला घेणे आवश्यक, उद्योग-व्यवसायात मोठे साहस आणि स्पर्धा टाळा. प्रकृतीच्या कुरबुरींकडे अजिबात दुर्लक्ष नको.


धनु

कार्यक्षेत्रातील सहका-यांबरोबरचे वाद उग्ररुप धारण करण्यापूर्वीच मिटवा. ‘हम करेसो कायदा’ असे वागणे हितावह नाही. कौटुंबिक वातावरण प्रसन्न, आनंदी राहील याची दक्षता घ्या.


मकर

‘सुसरबाई तुझी पाठ मऊ’ ह्यानुसार तुम्हाला ह्या महिन्यात आपला कार्यभाग साधावा लागेल. सरकारी नियमांचे उल्लंघन नको. अल्पपरिचित व्यक्तींशी आर्थिक व्यवहार शक्यतो टाळा. उत्तरार्धात काही धनप्राप्तीचे योग संभवतात.


कुंभ

भावनेच्या आहारी न जाता कर्तव्यपालनाकडे लक्ष द्या. कुणाच्याही गोड बोलण्यावर विश्र्वास ठेवू नका. अपेक्षित आर्थिक मदतीने नव्या योजनांना गती मिळेल. कौटुंबिक जीवनात स्वास्थ-समाधान लाभेल.


मीन

उद्योग-व्यवसायात विकासाची दीर्घकालीन योजना कार्यान्वित करण्यास योग्य काळ आहे. कार्यक्षेत्रात उत्साही वातावरण, गतिमानता यांचा अनुभव घ्याल. आर्थिक पातळी उंचावेल. उत्तरार्धात कुटुंबात काही नाराजी जाणवेल.