September 12, 2024

Weekly Horoscope – August 2017 (Marathi)

साप्ताहिक राशीभविष्य – २७ ऑगस्ट २०१७ – २ सप्टेंबर २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

हर्षल प्रथम, मंगळ-शुक्र चतुर्थ, रवि-मंगळ- बुध-राहु पंचम, गुरु षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र-शनि अष्टम, चंद्र-प्लुटो नवम, नेपच्युन-केतु लाभस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आहाराविहाराची बंधने पाळणे अत्यावश्यक ठरेल. उष्णतेच्या त्रासापासून सावध राहा. कुटुंब प्रमुख असल्यास कुटुंबाची सर्व जबाबदारी तुमच्यावर असेल कुटुंबातील व्यक्तीच्या मनाचा विचार करा प्रेमात गुरफटलेल्यांनी बेसावध राहू नये. गुप्त प्रेम संबंध टाळा. प्रेम प्रकरणात वाहवत जाऊ नका. वैवाहिक जीवनातील कर्तव्य पूर्ण करा. मनात निराशेस थारा देऊ नका. वैवाहिक सौख्य वृध्दिंगत करण्यासाठी घरातील वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या तुमच्या क्रांतिकारक विचारांना कृतीत आणा. खोटे दस्तावेज तयार करु नका.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

मंगळ-शुक्र पराक्रम, रवि-मंगळ- बुध-राहु चतुर्थ, गुरु पंचम, चंद्र षष्ठ, चंद्र-शनि सप्तम, चंद्र-प्लुटो अष्टम, नेपच्युन-केतु दशम, हर्षल व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आरोग्यासंबंधी स्वतःशी तडजोड करणे योग्य ठरेल ज्यायोगे प्रकृती स्वास्थ्य सांभाळता येईल आपल्या कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण करून आपले कर्तव्य पार पाडा. घरातील वातावरण न बिघडविता सामंजस्याने मार्ग काढा. विद्यार्थ्यांनी मनावर संयम ठेवावा मनाला सतत चांगले शिक्षण द्या. स्वत:हून ठरवून घेतलेले शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा. कामाचा व्याप वाढुन विविध जबाबदाऱ्या अंगावर पडतील. कोणालाही आश्वासन देऊ नका. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायातील धर सोड वृत्ती टाळावयास हवी.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

मंगळ-शुक्र द्वितीय, रवि-मंगळ- बुध-राहु पराक्रम, गुरु चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र-शनि षष्ठ, चंद्र-प्लुटो सप्तम, नेपच्युन-केतु नवम, हर्षल लाभस्थानातुन भ्रमण करणार आहेत. भोजनामध्ये चटपटीत पदार्थाच्या सेवनाची सवय कमी करावयास हवी सात्विक आहारावर भर द्या संततीच्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवनातील आपल्या जबाबदाऱ्या पुर्ण करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना सुयश प्राप्त होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आपल्या अभ्यासशैलीत आवश्यक तो सुधार करा कागदपत्रे वाचल्याशिवाय त्यावर सही करु नका. या आठवडयात शत्रु आपल्या समोर टिकाव धरु शकणार नाही. यश मिळविण्यासाठी कोणतीही पळवाट घेणे टाळा. उतावळेपणाने निर्णय घेऊ नका.

 

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क

मंगळ-शुक्र प्रथम, रवि-मंगळ- बुध-राहु द्वितीय, गुरु पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र-शनि पंचम, चंद्र-प्लुटो षष्ठ, नेपच्युन-केतु अष्टम, हर्षल दशमस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आरोग्याबाबत जागरुकता हवी. कोणत्याही गुढ विषयावर खोलवर विचार करु नका अशा वृत्तीने नैराश्य येण्याची शक्यता वाढते.
कौटुंबिक वातावरण बिघडू देऊ नका. मुलांकडे सातत्याने लक्ष ठेवावे लागेल. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकू नका. कुटुंबासाठी खर्च केल्यास कौटुंबिक गैरसमज दूर होण्यास मदत होईल. खर्च नियंत्रित करावा. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. कामाचा उरक वाढवावा लागेल. मनातील संकल्प चिकाटीने पूर्ण करा. व्यवसायातील सातत्य टिकवा व्यापारात वृध्दीसाठी जाहीरातीचा उपयोग करा

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                     सिंह

राशीस्थानी रवि-मंगळ- बुध-राहु, गुरु द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र-शनि चतुर्थ, चंद्र-प्लुटो पंचम, नेपच्युन-केतु सप्तम, हर्षल नवम, मंगळ-शुक्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. शुध्द व सात्विक आहार नियमीत घ्यावयास हवा. प्रकृती स्वास्थ्यासाठी सकाळी फिरायला जा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. मनाजोगता पैसा मिळून धनसंचय करता येईल. घरामध्ये इतरांनी आपले ऐकलेच पाहिजे असा आग्रह टाळा. भावडांशी काही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. नातेवाईकाना ढवळाढवळ करुन देऊ नका. प्रेम बंधनात असल्यास एकमेकांची मने जाणून घेण्याचा प्रयत्न करा. एक दुसऱ्यामधील असलेले मतभेद विसरणे अगत्याचे आहे. वैवाहिक सौख्याबद्दल आलेल्या अडचणींवर सामोपचाराने मार्ग काढा

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत गुरु, चंद्र द्वितीय, चंद्र-शनि पराक्रम, चंद्र-प्लुटो चतुर्थ, नेपच्युन-केतु षष्ठ, हर्षल अष्टम, मंगळ-शुक्र एकादश, रवि-मंगळ- बुध-राहु व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. स्वत:च्या तब्बेतीची जोपासना करा. आपली अतंर्गत घुसमट न होण्यासाठी आपले मत दुसऱ्या कोणाकडे तरी मोकळे करा. अर्थनियोजनाचे आराखडे यशस्वी होतील. काटकसरीचे धोरण ठेवा. घरातील वातावरण चांगले राहील. आपल्या जबाबदारीत वाढ संभवते. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या आयु्ष्यात ध्येय व उद्देश ठरवायला शिकवा. अचूक निर्णयक्षमतेचा विकास करण्यावर भर द्यावयास हवा. आपल्या अभ्यासात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करावयास हवा. कोणाकडून अधिकची अपेक्षा करु नये.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

चंद्र प्रथम, चंद्र-शनि द्वितीय, चंद्र-प्लुटो पराक्रम, पंचमात नेपच्युन-केतु, सप्तमात हर्षल, मंगळ-शुक्र दशमात, लाभात रवि-मंगळ- बुध-राहु, गुरु व्ययस्थानात असे ग्रहमान असतील. रेंगाळलेले काम पूर्ण करण्यांची संधी मिळेल. कामाचा चांगला मोबदला मिळेल.व्यवसायिकांना एखादे महत्वाचे काम विशिष्ट मंजूरीसाठी अडून राहिले असेल तर ती मिळू शकेल. आर्थिक क्षेत्रात धाडस टाळावे. व्यापारात आर्थिक व्यवहार करताना मन स्थिर ठेवा. कोणापुढे पैशासाठी हात पसरु नका. प्रिय व्यक्ती अडचणीत असल्यास त्यांना आपल्या मदतीचा हात पुढे करा. योग्य प्रसंगी भेटवस्तु देणे हितावह ठरेल. अडलेला व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. आपले कार्यक्रम ठरवून तुम्ही स्वत:ला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करा.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

चंद्र-शनि प्रथम, चंद्र-प्लुटो द्वितीय, चतुर्थात नेपच्युन-केतु, षष्ठात हर्षल, नवमात मंगळ-शुक्र, रवि-मंगळ- बुध-राहु दशमात, लाभात गुरु, व्ययात चंद्र असे ग्रहमान असतील. नोकरीत नविन उपक्रम हाती येतील. सरकारदरबारी असणारी कामे पूर्ण करण्यात समाधानकारक यश मिळेल. मनातील संकल्प चिकाटीने पूर्ण करा. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायातील सातत्य टिकवा घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. आपल्या जबाबदारीत वाढ संभवते. आईवडीलांच्या आरोग्यासाठी प्राधान्य द्या. अत्यावश्यक वस्तुंची खरेदी जेव्हा गरज भासेल तेव्हाच करा. कोणताही व्यवहार उधार-उसनवारीवर करु नका. कर्ज घेणे टाळावयास हवे. इतरांचे सल्ले मर्यादेपर्यंत स्वीकारावेत.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

आपल्या राशीत चंद्र-प्लुटो, पराक्रमात नेपच्युन-केतु, पंचमात हर्षल, अष्टमात मंगळ-शुक्र, नवमात रवि-मंगळ- बुध-राहु, गुरु दशम, चंद्र लाभात, चंद्र-शनि व्ययात अशी ग्रहांची रचना असेल. नोकरी क्षेत्रात जबाबदारीपासून अलिप्त राहू नका. प्रगतीचा वेग नियोजन कौशल्यामुळे आपणास ठेवता येईल. व्यवसायात सातत्य हवे. दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करु नये. प्रेम प्रकरणात पुढे जाताना एक दुसऱ्यावरील दृढ विश्र्वास महत्वाचा असतो. आपसातील तणाव टाळण्याचा प्रयत्न करणे दोघांच्या हिताचे आहे. वैवाहिक सौख्याबद्दल आलेल्या अडचणींवर सामोपचाराने मार्ग काढा सहजीवनाचे महत्त्व जीवनसाथीस पटवून द्या. घरामध्ये वातावरण आनंदी व उत्साही असेल. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                       मकर

द्वितीयात नेपच्युन-केतु, चतुर्थात हर्षल, सप्तमात मंगळ-शुक्र, अष्टमात रवि-मंगळ- बुध-राहु, नवमात गुरु, दशमात चंद्र, लाभात चंद्र-शनि, व्ययस्थानात चंद्र-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. अकारण चिंता करण्याचे टाळा अशा वृत्तीने प्रकृत्ती स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकेल. घरातील वातावरण सौम्य ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावयास हवे. घरातील प्रश्न सर्वांच्या सहकार्य व विचाराने सोडवा. छंदासाठी जास्त वेळ न देता अभ्यासात लक्ष द्या. मनाची धरसोड वृत्ती नको अशा वृत्तीने अभ्यासात बाधा येईल. सहकाऱ्यांना विश्वासात घ्या म्हणजे बऱ्याच गोष्टी शक्य होतील. मित्र-सहकारी व आप्तस्वकीयांचे उत्तम सहकार्य राहील. जुनी वसुली करताना हितसंबंध बिघडणार नाहीत याची दक्षता घ्या.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी नेपच्युन-केतु, पराक्रमात हर्षल, षष्ठात मंगळ-शुक्र, सप्तमात रवि-मंगळ- बुध-राहु, अष्टमात गुरु, नवमात चंद्र, दशमात चंद्र-शनि, लाभस्थानी चंद्र-प्लुटो असे ग्रहमान असतील. कामात तुमच्यावर अधिक जबाबदारी येईल. थोडयाशा कष्टाने आपण ती जबाबदारी पाडू शकता. मेहनतीने सर्व काही प्राप्त होईल. प्रेम सबंधात जोडिदारांकडुन जास्त अपेक्षा करु नका. प्रेमातील जोडिदाराला समजुन घेणे गरजेचे आहे. एकमेकांमधील गैरसमज टाळा. वैवाहिक जीवनात आलेल्या व्यत्ययास दुर करा. विद्यार्थ्यानी रुक्षपणा झटकून टाकावा. उज्वल यशाची खात्री करुन घेण्यासाठी जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करुन घ्यावे. स्पर्धा, साहस, प्रलोभने यांपासून दूर रहावे. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. गोड बोलून कार्यभाग साधा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

Pisces | Kalnirnay Horoscope
                        मीन 

द्वितीयात हर्षल, पंचमात मंगळ-शुक्र, षष्ठात रवि-मंगळ- बुध-राहु, सप्तमात गुरु, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र-शनि, दशमात चंद्र-प्लुटो, व्ययात केतु-नेपच्युन असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. शुध्द सात्विक व चौरस आहार ही निरोगी जीवनाची किल्ली आहे. नियमित साधा समतोल आहार यामुळे बऱ्याच अंशी शरीर निरोगी राखता येते. घरातील कौटुंबिक मतभेद सोडविण्याची जबाबदारी तुमच्याकडे येईल. सहजीवन म्हणजे तडजोड हे लक्षात ठेवा. प्रिय व्यक्तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात भावनेचा उद्रेक झाल्यास समजूत काढणे कठीण जाईल वैवाहिक जीवनसाथी भावूक, संवेदनाशील व अचानकपणे विचारात बदल येणारा असेल. त्यांच्या भावना समजावून घ्या.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

साप्ताहिक राशीभविष्य – २० ऑगस्ट २०१७ – २६ ऑगस्ट २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

हर्षल प्रथम, शुक्र पराक्रम, चंद्र-मंगळ- शुक्र चतुर्थ, चंद्र-रवि- बुध-राहु पंचम, चंद्र-गुरु षष्ठ, चंद्र सप्तम, शनि अष्टम, प्लुटो नवम, नेपच्युन-केतु लाभस्थानातुन भ्रमण करणार आहेत. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. आपल्या जबाबदारीत वाढ संभवते. अभ्यासातील सातत्य व चिकाटी कायम असू द्या अशा वृत्तीने परीक्षेत उत्तम यश मिळविता येईल. कामचुकारपणा करु नका. संपुर्ण विचाराशिवाय आपले मत व्यक्त करु नका. जबाबदारीची कामे करताना संबधीत व्यक्तींना विश्वासात घेणे गरजेचे आहे. तुम्ही अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. कायदा व नियंमाचे काटेकोरपणे पालन करा. वैयक्तिक बाबतीत कोणाशीही चर्चा करु नका.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

शुक्र द्वितीय, चंद्र-मंगळ- शुक्र पराक्रम, चंद्र-रवि- बुध-राहु चतुर्थ, चंद्र-गुरु पंचम, चंद्र षष्ठ, शनि सप्तम, प्लुटो अष्टम, नेपच्युन-केतु दशम, हर्षल व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आपली मते कुटुंबावर लादू नका. कौटुंबिक कर्तव्य पुर्ण करा. कुटुंबात सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. अनेकांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यानी आपल्या शिक्षणासाठी नवे वेळापत्रक तयार करावे. विद्यार्थ्यानी काही तरी नवे शिकण्याचा प्रयत्न करावा. नात्यातील प्रेमळ धागा जपा. परस्परांच्या स्वातंत्र्याचा योग्य मान राखा. जीवनसाथीचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या. अवास्तव इच्छा जोडीदाराबद्दल बाळगू नका. दुसऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या बातम्या तपासून खात्री करुन घ्यावी. विलासी वृत्तीला थारा देऊ नका.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

शुक्र प्रथम, चंद्र-मंगळ- शुक्र द्वितीय, चंद्र-रवि- बुध-राहु पराक्रम, चंद्र-गुरु चतुर्थ, चंद्र पंचम, शनि षष्ठ, प्लुटो सप्तम, नेपच्युन-केतु नवम, हर्षल लाभस्थानातुन भ्रमण करणार आहेत. कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण करा. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. जमल्यास त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक धोरणात परिस्थितीनुरूप बदल करा. जमिनीच्या व्यवहारात लाभ होतील. पैसे उसने देताना योग्य विचार करा. शैक्षणिक क्षेत्रात जास्त लक्ष ठेवा. शांत चित्ताने निर्णय घ्या. आपल्या मनावर श्रेष्ठ व्यक्तींचा प्रभाव ठेवा. पात्रतेप्रमाणे रोजगाराची संधी लाभेल. तुम्हाला गुंतागुंतीची कामे करावी लागतील. व्यवसायातील स्पर्धकांवर बारीक लक्ष ठेवा.

 

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क

चंद्र-मंगळ- शुक्र प्रथम, चंद्र-रवि- बुध-राहु द्वितीय, चंद्र-गुरु पराक्रम, चंद्र चतुर्थ, शनि पंचम, प्लुटो षष्ठ, नेपच्युन-केतु अष्टम, हर्षल दशम, शुक्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. कुटुंबातील व्यक्तींना वेळ द्या. आपल्या मुलांविषयी त्यांच्या भवितव्याची काळजी घ्यावी लागेल. त्यांच्या भवितव्याचे योग्य नियोजन करा. अनावश्यक खर्च नियंत्रित करा. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन अर्थ व्यवहार करू नका. मनातील नोकरी बदलाचे विचार बदलावयास हवे. नोकरीत केलेले श्रम भविष्यकाळात फायदेशीर ठरतील. उद्योगधंद्यातील आपले स्थान बळकट करण्याचे प्रयत्न करा. कोणत्याही परिस्थित रागावर नियंत्रण ठेवायला शिका. मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल व मानसिक उत्साह वाढेल.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                     सिंह

राशीस्थानी चंद्र-रवि- बुध-राहु, चंद्र-गुरु द्वितीय, चंद्र पराक्रम, शनि चतुर्थ, प्लुटो पंचम, नेपच्युन-केतु सप्तम, हर्षल नवम, शुक्र लाभ, चंद्र-मंगळ- शुक्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. प्रकृती स्वास्थ्य व्यवस्थित राखण्यासाठी वेळोवेळी शारीरिक तपासण्या करणे फायदेशीर असते. स्वास्थ्य बिघडेपर्यंत जागरण करु नका. बुध्दीकौशल्याने कामे यशस्वी करुन आर्थिक लाभ करण्याचा प्रयत्न करावयास हवा. पैशांची गुंतवणूक विचारपूर्वक करा. कुटुंबातील जबाबदारीचे पालन करा. कुटुंबातील वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्या कोणालाही घेऊ देऊ नका. वरिष्ठांशी जुळवून घेण्याची प्रयत्न करा. महत्वाची कागदपत्रे हरवणार नाहीत यांची दक्षता घ्या.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत चंद्र-गुरु, चंद्र द्वितीय, शनि पराक्रम, प्लुटो चतुर्थ, नेपच्युन-केतु षष्ठ, हर्षल अष्टम, शुक्र दशम, चंद्र-मंगळ- शुक्र एकादश, चंद्र-रवि-बुध-राहु व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. स्वत:चे मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न त्रासदायक ठरेल. जुन्या प्रकृतीच्या त्रासावर कायमस्वरुपी इलाज करणे गरजेचे आहे. मानसिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न करा. गोड बोलून घरातील सर्वाची मने जिंका. सरकारी कामात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. नोकरीच्या क्षेत्रात वादाचे विषय टाळा. व्यवसायात मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. अनपेक्षित प्रवास घडतील. मित्रमंडळीचा गैरसमज होईल असे विचार करु नका. खरेदी-विक्रीच्या मोहात पडू नका.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

चंद्र प्रथम, शनि द्वितीय, प्लुटो पराक्रम, पंचमात नेपच्युन-केतु, सप्तमात हर्षल, नवमात शुक्र, चंद्र-मंगळ- शुक्र दशमात, लाभात चंद्र-रवि- बुध-राहु, चंद्र-गुरु व्ययस्थानात असे ग्रहमान असतील. नोकरीत वरिष्ठ तुमच्या चांगल्या कामाची दखल घेतील. कायमची नोकरी मिळू शकेल. उद्योगधंद्यात भागीदार काळजीपूर्वक निवडावयास हवा. भागिदारीत विशेष लाभ दर्शवित नाहीत. पैशाच्या बाबतीत कोणावरही भरवसा ठेवू नका. प्रवासात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. देण्या-घेण्याच्या व्यवहारात मतभेद टाळा. प्रेमाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. योग्य प्रसंगी भेटवस्तु देणे हितावह ठरेल. पती-पत्नीनी एकमेकांशी सांमजस्याने वागावे. एक दुसऱ्याचे संबंध सांभाळणे उचीत होईल. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे
तुम्हाला आदर मिळेल.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

शनि प्रथम, प्लुटो द्वितीय, चतुर्थात नेपच्युन-केतु, षष्ठात हर्षल, अष्टमात शुक्र, नवमात चंद्र-मंगळ- शुक्र, चंद्र-रवि- बुध-राहु दशमात, लाभात चंद्र- गुरु, व्ययात चंद्र असे ग्रहमान असतील. क्षमतेपेक्षा अधिक काम करु नका. प्रकृतीसाठी ते हानीकारक ठरेल. खाण्यापिण्याच्या अतिरेकी सवयीवर बंधन ठेवावे लागेल. कुटुंबातील गोष्टीना जरुरीनुसार प्राध्यान्य देणे गरजेचे आहे. घरच्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे हिताचे ठरेल. आपल्या बौद्धिक सामर्थ्याचा तोल ढळू देऊ नका. आपली इच्छाशक्ती प्रबळ ठेवा. आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने चालू राहणार नाहीत याची काळजी घ्या. संधीचा योजनाबद्ध पद्धतीने लाभ घ्या. विरोधकांना संधी मिळणार नाही याची दक्षता घ्या.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

आपल्या राशीत प्लुटो, पराक्रमात नेपच्युन-केतु, पंचमात हर्षल, सप्तमात शुक्र, अष्टमात चंद्र-मंगळ- शुक्र, नवमात चंद्र-रवि- बुध-राहु, चंद्र-गुरु दशम, चंद्र लाभात, शनि व्ययात अशी ग्रहांची रचना असेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या चांगल्या कामाची दखल घेतील. व्यवसायात चातुर्याचा वापर करा. कामाच्या क्षेत्रातील सर्व व्यवहार कायदेशीर व लेखी करुन घेणे गरजेचे आहे. आर्थिक गुंतवणूकीसाठी जाणकार तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. खर्चावर नियंत्रण न ठेवल्यास खर्च वाढेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास वादाचे प्रसंग टळतील. घर बदलण्याचे विचार सध्या टाळावयास हवेत. प्रेमाचा रस्ता मैत्रीतुन जातो. सहजीवनाचे महत्त्व जीवनसाथीस पटवून द्या. परस्परात संवाद राखणे हे यशस्वी विवाहाला आवश्यक असते.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                       मकर

द्वितीयात नेपच्युन-केतु, चतुर्थात हर्षल, षष्ठात शुक्र, सप्तमात चंद्र-मंगळ- शुक्र, अष्टमात चंद्र-रवि- बुध-राहु, नवमात चंद्र-गुरु, दशमात चंद्र, लाभात शनि, व्ययस्थानात प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. आरोग्याविषयक काही त्रास झाल्यास लगेच डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रकृती स्वास्थ्याबद्दल हलगर्जीपणा करु नये. तुमच्या मनात कुटुंबाबद्दल चिंता राहील. वादविवाद कलह यापासून लांब रहा. संततीच्या चुकाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. विद्यार्थी वर्गाला अभ्यास करण्यासाठी उत्तम वातावरण राहील. परिक्षेत उत्तम यश व कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळेल. प्रेमिकांनी विवाहाचा प्रस्ताव पालकांच्यापुढे मांडला तर त्याला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवनात वादविवाद टाळा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी नेपच्युन-केतु, पराक्रमात हर्षल, पंचमात शुक्र, षष्ठात चंद्र-मंगळ- शुक्र, सप्तमात चंद्र-रवि- बुध-राहु, अष्टमात चंद्र-गुरु, नवमात चंद्र, दशमात शनि, लाभस्थानी प्लुटो असे ग्रहमान असतील. कामकाजात एक प्रकारचा प्रभाव राहील. काही नवे उपक्रमांचे नियोजन करता येईल. रेंगाळलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. इतरांसाठी कठीण असणारे विषय तुम्ही सहजरित्या सोडवाल. व्यवसायात भागीदारावर अवलंबुन राहु नये. गुंतवणुकीचा सर्व बाजुंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आपल्या भिडस्त स्वभावाला थोडी मूरड घाला. मित्रांच्या आश्वासनावर अवलंबून राहू नका. तुमची कल्पना इतरांना पटवण्यासाठी जिद ठेवा. वडीलधाऱ्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करु नये.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

Pisces | Kalnirnay Horoscope
                        मीन 

द्वितीयात हर्षल, चतुर्थात शुक्र, पंचमात चंद्र-मंगळ- शुक्र, षष्ठात चंद्र-रवि- बुध-राहु, सप्तमात चंद्र-गुरु, अष्टमात चंद्र, नवमात शनि, दशमात प्लुटो, व्ययात केतु-नेपच्युन असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. नियमित संतुलित मिताहार घेतल्यास प्रकृती स्वास्थ्य उत्तम राखता येईल. आपणास शाकाहार फायदेशीर ठरेल. कौटुंबिक पातळीवरील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न केल्यास वातावरण उत्तम राहील. सर्वाना समान न्याय लावा. गोड बोलून घरातील सर्वाची मने जिकंण्याचा प्रयत्न करा. तुमचा वचक व दरारा असेल. प्रेमातील नात्यात कोणीही चुकू शकतो म्हूणन आपल्या जोडिदराच्या चुका सौम्य शब्दात दाखवा. एकमेकांबद्दल विश्वासार्हता वाढवणे जरुरुीचे आहे. जीवनात सुखद अनुभव घेण्यासाठी सामंजस्य ठेवा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

साप्ताहिक राशीभविष्य – १३ ऑगस्ट २०१७ – १९ ऑगस्ट २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

चंद्र-हर्षल प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र-शुक्र पराक्रम, रवि-मंगळ चतुर्थ, रवि-बुध-राहु पंचम, गुरु षष्ठ, शनि अष्टम, प्लुटो नवम, नेपच्युन-केतु लाभ, चंद्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आनंदी वृत्ती हा आरोग्याचा आधार आहे हे ध्यानात ठेवा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. आर्थिक स्थितीत सुधार होईल. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे काळाची गरज आहे. बौध्दिक गोष्टींना चालना मिळेल. प्रेम प्रकरणांच्या जास्त आहारी जाऊ नये. एकांगी प्रेमाचे स्वप्नरंजन नको. वास्तवाचे भान ठेवा. वैवाहिक जीवनात निर्माण होणाऱ्या समस्या कशा दूर करता येतील यावर लक्ष ठेवणे जरुरीचे आहे.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

चंद्र प्रथम, चंद्र-शुक्र द्वितीय, रवि-मंगळ पराक्रम, रवि-बुध-राहु चतुर्थ, गुरु पंचम, शनि सप्तम, प्लुटो अष्टम, नेपच्युन-केतु दशम, चंद्र लाभ, चंद्र-हर्षल व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. कुटुंबात सर्वाचे समाधान करण्याकडे कल राहील. सर्वाना मदतीचा हात द्याल. कुटुंबाचे आर्थिक स्वास्थ उत्तम राखाल. विद्यार्जनात एकाग्रता वाढवावी लागेल. अभ्यासातील खाचखळगे ओळखा. अभ्यासात कौशल्यतेचा वापर करा. प्रेमांच्या माणसांशी तुटक वागू नका. प्रेम संबंधात कोणीही चुकू शकतो. वैवाहिक संबंधात जीवनसाथीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करु नका .जीवनसाथी विषयी विश्वास उत्पन्न करा. तुम्ही आपले विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कोणत्याही गोष्टीवर थेट भाष्य करणे टाळा.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

चंद्र-शुक्र प्रथम, रवि-मंगळ द्वितीय, रवि-बुध-राहु पराक्रम, गुरु चतुर्थ, शनि षष्ठ, प्लुटो सप्तम, नेपच्युन-केतु नवम, चंद्र दशम, चंद्र-हर्षल लाभ, चंद्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. कामानिमित्त घरापासुन दूर जावे लागण्याचे संकेत आहेत. प्रवासात आपल्या सामानाची योग्य ती काळजी घ्या. शेजाऱ्यांना मदत करताना काळजी घेणे गरजेचे आहे. आर्थिक व्यवहार करताना कोणतीही जोखीम स्विकारु नका. हातातील पैशाचा काटकसरीने वापर करा. विद्यार्थ्यानी आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत. अपयशाकडे सकारात्मक दृष्टिने पहा. प्रेमात नको ते धाडस करु नका. एक दुसऱ्याचा विश्वास संपन्न करा. वैवाहिक जीवनातील कर्तव्य पूर्ण करा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क

रवि-मंगळ प्रथम, रवि-बुध-राहु द्वितीय, गुरु पराक्रम, शनि पंचम, प्लुटो षष्ठ, नेपच्युन-केतु अष्टम, चंद्र नवम, चंद्र-हर्षल दशम, चंद्र लाभ, चंद्र-शुक्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आरोग्यविषयक तपासण्यात टाळाटाळ करु नये. खाण्यापिण्याच्या अतिरेकी सवयीवर बंधन ठेवावे लागेल. कुटुंबियांना आपलेसे करुन पुढे वाटचाल करा .तरुण सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावयास लागेल . कुटुंबियासमवेत लांबचे प्रवास संभवतात . प्रेम संबंधात एकमेकांवर विश्वास ठेवा. प्रेमाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. वैवाहिक जीवनातील कर्तव्य पूर्ण करा. मनात निराशेस थारा देऊ नका. महत्वाची कागदपत्रे सापडल्याने अडलेली कामे मार्गी लागतील. आश्वासनात खैरात करु नका.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                     सिंह

राशीस्थानी रवि-बुध-राहु, गुरु द्वितीय, शनि चतुर्थ, प्लुटो पंचम, नेपच्युन-केतु सप्तम, चंद्र अष्टम, चंद्र-हर्षल नवम, चंद्र दशम, चंद्र-शुक्र लाभ, रवि-मंगळ व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. कामाची दगदग फार होणार असल्याने प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. बाहेरील खाण्यापेक्षा घरगुती जेवण व फलाहारावर भर द्या. आपले ते खरे करण्याचा अट्टाहास करु नयेत. नोकरी आणि व्यवसाय दोन्हीतही चांगली अर्थप्राप्ती होईल. कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. वडिल माणसांच्या तब्येतीची काळजी घ्या. वादविवाद कलह यापासून लांब रहा त्यामुळे घरात मतभेद कमी होतील. सार्वजनिक ठिकाणी वाद वाढणार नाही याची काळजी घ्यावी. तुमचा भिडस्तपणा तुमची चिडचिड वाढवेल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत गुरु, शनि पराक्रम, प्लुटो चतुर्थ, नेपच्युन-केतु षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र-हर्षल अष्टम, चंद्र-शुक्र दशम, रवि-मंगळ एकादश, रवि-बुध-राहु व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. वैद्यकीय खर्च वाढणार नाही यांची काळजी घ्यावी. खाण्यापिण्यात निष्काळजीपणा करु नका. विद्यार्थी वर्गाने प्रयत्नांना देव मानावे. विद्यार्थ्यानी वेळेचा सदुपयोग करावा. प्रेमसबंधातील आपुलकी वाढविण्यासाठी त्यांना फिरायला न्या. जोडिदारांकडुन जास्त अपेक्षा करु नका. पती-पत्नींनी आपल्या वागण्यात पारदर्शकता ठेवल्यास गैरसमज होणार नाहीत. प्रवासात त्रास होणार असल्यामुळे ते शक्यतोवर टाळावेत. उतावळेपणे किंवा बेफिकीरपणे वागू नका. आपल्या विकासाची दीर्घकालीन योजना तुम्ही आखली पाहिजेत. नियम व कायदा यांचे पालन करा.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

शनि द्वितीय, प्लुटो पराक्रम, पंचमात नेपच्युन-केतु, चंद्र षष्ठात, सप्तमात चंद्र-हर्षल, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र-शुक्र, रवि-मंगळ दशमात, लाभात रवि-बुध-राहु, गुरु व्ययस्थानात असे ग्रहमान असतील. किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष करु नये. प्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे ठरेल. आहार-विहाराचे नियम पाळा. तुम्ही स्वत:हून ठरवून घेतलेले शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा. प्रशिक्षणासाठी किंवा अन्य कारणासाठी परदेशगमन घडेल. कौटुंबिक पातळीवर काही तडजोडी कराव्या लागतील. महत्वाच्या संबंधित व्यवहारात नातेवाईकांना मध्यस्थी करु देऊ नका. संततीच्या अडचणीकडे लक्ष द्यावे लागेल. जीवनात कोणत्याही शाँर्टकट पध्दतीचा अवलंब सध्या तरी करु नका. स्वप्न सत्यात उतरलेले तुम्ही पाहाल.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

शनि प्रथम, प्लुटो द्वितीय, चतुर्थात नेपच्युन-केतु, चंद्र पंचम, षष्ठात चंद्र-हर्षल, सप्तमात चंद्र, अष्टमात चंद्र-शुक्र, नवमात रवि-मंगळ, रवि-बुध-राहु दशमात, लाभात गुरु असे ग्रहमान असतील. आरोग्याच्या तक्रारींचा घाबरुन न जाता मुकाबला करा . आपले जेवण खान व्यवस्थित ठेवा. आर्थिक लाभासाठी केलेले प्रयत्न चुकीच्या दिशेने करु नका. लोभामुळे आर्थिक संकट ओढवून घेऊ नका. मनातील बदलणारे विचार अभ्यासात व्यत्यय आणू शकतील. अभ्यासात लक्ष विचलीत होऊ देऊ नका. जुन्या ओळखीचा फायदा करुन घेता येईल. देवदर्शनासाठी प्रवास कराल. दान अवश्य करा. तुम्ही योग्य ध्येय गाठण्याकडे लक्ष द्या व काम करा.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

आपल्या राशीत प्लुटो, पराक्रमात नेपच्युन-केतु, चतुर्थात चंद्र, पंचमात चंद्र-हर्षल, षष्ठात चंद्र, सप्तमात चंद्र-शुक्र, अष्टमात रवि-मंगळ, नवमात रवि-बुध-राहु, गुरु दशम, शनि व्ययात अशी ग्रहांची रचना असेल. कोणाच्याही प्रभावा खालील येऊन अर्थ व्यवहार करू नका. अर्थप्राप्तीच्या नव्या योजना आखा. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. घरासंबंधीच्या समस्या नातेवाईकांच्या मदतीने सोडवाल. प्रेम संबंधात एक दुसऱ्याचे सहकार्य महत्वाचे असेल. आपल्या जोडिदारास दाखविलेल्या स्वप्नांची पूर्तता करा . वैवाहिक जीवनसाथी बुध्दीमान, हजरजबाबी व चौकस बुध्दीचा असेल. त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. त्यांना मानसन्मान द्या. आपल्या संभाषणाबाबत तसेच बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                       मकर

द्वितीयात नेपच्युन-केतु, पराक्रमात चंद्र, चतुर्थात चंद्र-हर्षल, पंचमात चंद्र, षष्ठात चंद्र-शुक्र, सप्तमात रवि-मंगळ, अष्टमात रवि-बुध-राहु, नवमात गुरु, लाभात शनि, व्ययस्थानात प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. आहार विहारांची बंधने पाळणे गरजेचे आहे. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा . विद्यार्थ्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील. विद्यार्थी वर्गाला नियमितपणावर भर द्यावा लागेल. आपली मते कुटुंबावर लादू नका. कौटुंबिक कर्तव्य पुर्ण करा. संततीची विशेष काळजी घ्या. त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका. त्या सोडविण्याचा प्रयत्न करा. एखाद्या जुन्या मित्र मैत्रिणीची भेट घडवून निर्भेळ आनंद मिळेल. वाहन जपून चालवा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी नेपच्युन-केतु, चंद्र द्वितीय, पराक्रमात चंद्र-हर्षल, चतुर्थात चंद्र, पंचमात चंद्र-शुक्र, षष्ठात रवि-मंगळ, सप्तमात रवि-बुध-राहु, अष्टमात गुरु, दशमात शनि, लाभस्थानी प्लुटो असे ग्रहमान असतील. आहार नियंत्रण करणे सक्तीचे होईल . स्वतःस जास्त दगदग करुन घेऊ नका. तुम्हाला नोकरीत बदली हवी असेल तर प्रयत्न करावयास हरकत नाही. मोठया कामाची आँफर येईल. धंदा व्यवसायाच्या विस्तारांसाठी प्रयत्नशील रहाल. सर्व व्यवहार मुत्सद्दीपणे पार पाडाल. आर्थिकदृष्टया कोणत्या ना कोणत्या प्रकारे आवक राहील. आपला आर्थिक दर्जा उंचावेल. शक्यतो नवीन करार करु नयेत. आश्वासन देता घेताना क्षमतेचे भान आवश्यक आहे.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

Pisces | Kalnirnay Horoscope
                        मीन 

चंद्र प्रथम, द्वितीयात चंद्र-हर्षल, पराक्रमात चंद्र, चतुर्थात चंद्र-शुक्र, पंचमात रवि-मंगळ, षष्ठात रवि-बुध-राहु, सप्तमात गुरु, नवमात शनि, दशमात प्लुटो, व्ययात केतु-नेपच्युन असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. रोज सकाळी खुल्या हवेत नियमित फिरणे हितावह होईल. स्वतःचे आरोग्य सांभाळणे आपल्या हाती आहे. घरातील वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या. काही गोष्टीत मौन पाळणे श्रेयस्कर ठरेल. गोड बोलून घरातील सर्वाची मने जिकंण्याचा प्रयत्न करा. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल. अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

साप्ताहिक राशीभविष्य – ६ ऑगस्ट २०१७ – १२ ऑगस्ट २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

हर्षल प्रथम, शुक्र पराक्रम, रवि-मंगळ चतुर्थ, बुध-राहु पंचम, गुरु षष्ठ, शनि अष्टम, चंद्र-प्लुटो नवम, चंद्र दशम, चंद्र-नेपच्युन- केतु लाभ, चंद्रव्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आरोग्याच्या दृष्टिने विचार करता शरीर प्रकृतीची काळजी घ्या. आरोग्यासाठीच्या तपासण्या वेळेवर कराव्यात. परिवारातील सदस्य विविध विचार व प्रवृत्तीचे असतील. त्यांच्याशी समजूतदारपणाचे धोरण आखावयास हवे. विद्यार्थ्यी वर्गाने चंचलता सोडून संयमी वृत्तीने अभ्यास करावयास हवा. महत्वाकांक्षा योग्य ठिकाणी वापरली पाहिजे. प्रेमात गुरफटलेल्यांनी बेसावध राहू नये. प्रेमिकांनी एकमेकांचीr मने सांभाळणे गरजेचे आहे. पती पत्नीनी किरकोळ गोष्टीवरुन वाद घालणे टाळावे. शांत राहून परिस्थिती काबूत ठेवण्याचा प्रयत्न करा.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

शुक्र द्वितीय, रवि-मंगळ पराक्रम, बुध-राहु चतुर्थ, गुरु पंचम, शनि सप्तम, चंद्र-प्लुटो अष्टम, चंद्र नवम, चंद्र-नेपच्युन- केतु दशम, चंद्र लाभ, हर्षल व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आरोग्याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे. मानसिक त्रास करुन घेऊ नका. नातेवाईक विक्षिप्त स्वभावाचे असून त्यांच्याशी वादाचे प्रसंग येतील. कुटुंबात तुमचे वर्चस्व राहील. विद्यार्थ्याना अभ्यासात लक्ष द्यावे लागेल. आपल्या बौद्धिक सामर्थ्याचा तोल ढळू देऊ नका. नोकरीत कामाचा व्याप वाढला तरी वर्चस्व राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रेमाने वागा. त्यांच्या भावनांचा विचार करावयास हवा. वैयक्तिक जीवनात सांभाळून वागावे म्हणजे नंतर पश्चात्ताप करायला लागणार नाही.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

शुक्र प्रथम, रवि-मंगळ द्वितीय, बुध-राहु पराक्रम, गुरु चतुर्थ, शनि षष्ठ, चंद्र-प्लुटो सप्तम, चंद्र अष्टम, चंद्र-नेपच्युन- केतु नवम, चंद्र दशम, हर्षल लाभस्थानातुन भ्रमण करणार आहेत. जबाबदारीमुळे तणाव जाणवेल. अतिविचार करुन मनस्ताप टाळा. किरकोळ दुखण्याकडे दुर्लक्ष करु नये. व्यापारात आर्थिक व्यवहार करताना मनस्थिर ठेवा. पैसे वसूलीवर भर द्या. विद्यार्थ्यानी अपयशाची कसर भरुन काढण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी. स्वत:चे लक्ष विचलित होऊ देऊ नका. प्रेम संबंधात एक दुसऱ्याचे सहकार्य महत्वाचे होईल. जोडीदाराबरोबर अबोला टाळावा. पती-पत्नीनी प्रयत्नपूर्वक एकमेकांच्या आवडी निवडी जपाव्यात. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका नाहीतर दगाफटका होईल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क

रवि-मंगळ प्रथम, बुध-राहु द्वितीय, गुरु पराक्रम, शनि पंचम, चंद्र-प्लुटो षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र-नेपच्युन- केतु अष्टम, चंद्र नवम, हर्षल दशम, शुक्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आहार-विहाराचे नियम पाळा. मनावर दडपण येणार नाही याची दक्षता घ्या, अन्यथा मानसिक त्रास संभवतो. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. महत्वाच्या संबंधित व्यवहारात नातेवाईकांना मध्यस्थी करु देऊ नका. नोकरीमध्ये गोधंळाची परिस्थिती निर्माण होईल. नोकरीतील बदल त्रासदायक ठरेल. कामाच्या क्षेत्रातील सर्व व्यवहार कायदेशीर व लेखी करुन घेणे गरजेचे आहे. आपल्या स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कर्तृत्वावर विश्वास ठेवून वागा.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                     सिंह

राशीस्थानी बुध-राहु, गुरु द्वितीय, शनि चतुर्थ, चंद्र-प्लुटो पंचम, चंद्र षष्ठ, चंद्र-नेपच्युन- केतु सप्तम, चंद्र अष्टम, हर्षल नवम, शुक्र लाभ, रवि-मंगळ व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आपला अहंभाव बाजूला ठेवा. आजारांना वेळेतच आटोक्यात आणा. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. गुंतवणूक करताना स्वतःची विवेकबुध्दी वापरा कर्ज इच्छुक व्यक्तींनी जास्त प्रयत्न करावेत. कुटुंबात मिळते-जुळते धोरण ठेवल्यास यश मिळेल. कौटुंबिक समस्या आल्यास त्यातून मार्ग काढाल. प्रेम संबंधात भावनांचा अतिरेक होता कामा नये. वेळ काढून संवाद चालू ठेवणे महत्त्वाचे आहे वैवाहिक सौख्याबद्दल आलेल्या अडचणींवर सामोपचाराने मार्ग काढा़

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत गुरु, शनि पराक्रम, चंद्र-प्लुटो चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र-नेपच्युन- केतु षष्ठ, चंद्र सप्तम, हर्षल अष्टम, शुक्र दशम, रवि-मंगळ एकादश, बुध-राहु व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आरोग्यासाठी विश्रांती आवश्यक ठरेल. अधूनमधून प्रकृतीच्या आवश्यक त्या तपासण्या करुन घेणे हितावह आहे. कुटुंबात सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे हे लक्षात असू द्या. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकू नये. कामाच्या निमित्ताने छोटी परदेशवारी होऊ शकेल. मोठया कामाची जबाबदारी स्विकारावी लागेल. इतरांना न जमणारे व्यवसाय तुम्ही करु शकाल. नियोजन करुन मोठे प्रकल्प हाताळल्यास त्यात यश मिळेल. सामाजिक कार्यामध्ये अनुकूल सहयोग मिळेल व सन्मान वाढेल.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

शनि द्वितीय, चंद्र-प्लुटो पराक्रम, चंद्र चतुर्थ, पंचमात चंद्र-नेपच्युन- केतु, चंद्र षष्ठात, सप्तमात हर्षल, नवमात शुक्र, रवि-मंगळ दशमात, लाभात बुध-राहु, गुरु व्ययस्थानात असे ग्रहमान असतील. तणाव घालवण्यासाठी योगासने व प्राणायाम करावा. आपल्या शक्तीच्या बाहेर उलाढाल्या करु नका. आपल्या अभ्यासशैलीत आवश्यक तो सुधार कराअचूक निर्णयक्षमतेचा विकास करण्यावर भर द्या प्रेमामध्ये पत्रव्यवहार किंवा एस म एस अतिशय जपून करा. भावनिक गुंतागुंत करु नका. जोडीदाराबरोबर अबोला टाळावा. पती-पत्नीनी प्रयत्नपूर्वक एकमेकांच्या आवडी निवडी जपाव्यात. नवीन लोकांना भेटायची तयारी ठेवा. महत्वाच्या बातम्या मिळण्यामुळे परिस्थिती सुखद राहील.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

शनि प्रथम, चंद्र-प्लुटो द्वितीय, चंद्र पराक्रमात, चतुर्थात चंद्र-नेपच्युन- केतु, चंद्र पंचम, षष्ठात हर्षल, अष्टमात शुक्र, नवमात रवि-मंगळ, बुध-राहु दशमात, लाभात गुरु असे ग्रहमान असतील. स्वभावात चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त मौन पाळा, संयम ठेवा. प्रकृती बिघडेपर्यंत जागरण करु नका. विद्यार्थ्यी वर्गाने चांगला अभ्यास केल्यास प्रगतीचा मार्ग अधिक सुखकर होऊ शकतो. आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करा. नव्या ओळखीतून प्रेम प्रकरणाला चालना मिळेल. दिलेला शब्द पाळण्याचे कसोशीने प्रयत्न करा. वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रेमाने वागा. किरकोळ गोष्टीवरुन वाद घालणे टाळावे. अपरिचितांच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा याचे भान ठेवा.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

आपल्या राशीत चंद्र-प्लुटो, द्वितीयात चंद्र, पराक्रमात चंद्र-नेपच्युन- केतु, चतुर्थात चंद्र, पंचमात हर्षल, सप्तमात शुक्र, अष्टमात रवि-मंगळ, नवमात बुध-राहु, गुरु दशम, शनि व्ययात अशी ग्रहांची रचना असेल. तुमची कामाची तडफदार कृति वरिष्ठांना खुश करेल. नवीन योजना समोर येतील. धंद्यातील
चढ उतारावर चातुर्याने मात कराल. प्रगतीचा वेग नियोजन कौशल्यामुळे आपणास ठेवता येईल. प्रेमकरताना योग्य व्यक्तिची निवड करा. एक दुसऱ्याचा विश्वास संपन्न करा. सहजीवनाचे महत्त्व जीवनसाथीस पटवून द्या. जोडीदाराशी कोणत्याही खाजगी गोष्टी लपवू नका. वाहन जपून चालवा व कायद्याचे स्मरण ठेवा. विरोधकांना न दुखवता त्यांचे कर्तव्य त्यांना सांगावे लागेल.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                       मकर

चंद्र प्रथम, द्वितीयात चंद्र-नेपच्युन- केतु, पराक्रमात चंद्र, चतुर्थात हर्षल, षष्ठात शुक्र, सप्तमात रवि-मंगळ, अष्टमात बुध-राहु, नवमात गुरु, लाभात शनि, व्ययस्थानात चंद्र-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. बाहेरील पदार्थ कटाक्षाने टाळावेत. आहाराचे नियमन करणे जरुरीचे आहे. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. आपल्या जबाबदारीत वाढ संभवते. जुने मित्र भेटतील. मनातील नाराजी साथीदारासमोर मांडू नका. प्रेमांच्या माणसांशी तुटक वागू नका. जोडिदाराची काळजी घ्या व त्यांच्या मर्जीप्रमाणे वागून मार्ग काढा. वैवाहिक जीवनातील कर्तव्य पूर्ण करा. दुसऱ्यांना दोष न देता स्वत:चा आलेख उंचावण्याचा प्रयत्न करा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी चंद्र-नेपच्युन- केतु, चंद्र द्वितीय, पराक्रमात हर्षल, पंचमात शुक्र, षष्ठात रवि-मंगळ, सप्तमात बुध-राहु, अष्टमात गुरु, दशमात शनि, लाभस्थानी चंद्र-प्लुटो, व्ययात चंद्र असे ग्रहमान असतील. नोकरीमध्ये अग्रेसर राहाता येईल. जबाबदारीची कामे करताना संबधीत व्यक्तींना विश्वासात घेणे गरजेचे आहे. व्यवसायातील दगदग कमी करावयास हवी. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. या आठवडयात शक्यतो कोणत्याही प्रकारचे लेखी करार किंवा व्यवहार करु नयेत. कोणालाही जामिन राहु नये. विद्यार्थ्यानी प्रतिकूल परिस्थितीत न डगमगता नेटाने अभ्यास करावा. अधिक कष्ट सोसण्याची तयारी ठेवावी. कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापुर्वी त्या क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घेणे हितकारक ठरेल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

Pisces | Kalnirnay Horoscope
                        मीन 

चंद्र प्रथम, द्वितीयात हर्षल, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि-मंगळ, षष्ठात बुध-राहु, सप्तमात गुरु, नवमात शनि, दशमात चंद्र-प्लुटो, लाभात चंद्र, व्ययात चंद्र-केतु- नेपच्युन असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी नियमित योगसाधना केल्यास त्याचे उत्तम लाभ होतील. प्रिय व्यक्तीच्या लहानसहान अपेक्षांचा अंदाज घ्या. प्रिय व्यक्तीच्या कामाचे कौतुक करा. आपला अहंभाव बाजूला ठेवा. वैवाहिक जीवनात एकमताने काम करा. कर्तव्यपालनासाठी कौटुंबिक पातळीवर काही तडजोडी कराव्या लागतील. आईच्या बुध्दीचातुर्याने कुटुंबातील अडचणीच्या प्रसंगावर तुम्ही मात कराल. सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करा. जे मनाला पटणार नाही ते स्पष्ट बोलून दाखवा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

साप्ताहिक राशीभविष्य – ३० जुलै २०१७ – ५ ऑगस्ट २०१७

मेष | साप्ताहिक राशीभविष्य
                       मेष

हर्षल प्रथम, शुक्र पराक्रम, रवि-मंगळ चतुर्थ, बुध-राहु पंचम, गुरु षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र-शनि अष्टम, चंद्र-प्लुटो नवम, नेपच्युन-केतु लाभ स्थानातुन भ्रमण करणार आहेत. आपला अहंभाव बाजूला ठेवा. आपल्या कौटुंबिक कर्तव्यास प्राधान्य देण्यात तत्पर राहताना आरोग्याची योग्य काळजी घ्या ़ घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. विद्यार्थ्याना मेहनत करावी लागेल. कमजोर विषयांवर अधिक मेहनत घ्यावी लागेल. बोलण्यापेक्षा अभ्यासातील कृतीकडे अधिक लक्ष द्या. प्रेमातील सावधानता लाभदायक ठरेल. प्रेम संबंधात कोणीही चुकू शकतो म्हूणन आपल्या जोडिदराच्या चुका सौम्य शब्दात दाखवा. जीवनसाथीविषयी विश्वास उत्पन्न करा. त्यांच्या भावनांची कदर करा.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली  

वृषभ
                     वृषभ

शुक्र द्वितीय, रवि-मंगळ पराक्रम, बुध-राहु चतुर्थ, गुरु पंचम, चंद्र षष्ठ, चंद्र-शनि सप्तम, चंद्र-प्लुटो अष्टम, नेपच्युन-केतु दशम, हर्षल व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. कुटुंबाची सर्व जबाबदारी तुमच्यावर असेल. नाती टिकवण्यासाठी बोलण्यावर वचक ठेवा. आपल्या कुशाग्र बुध्दीचा योग्य वापर केल्यास नेत्रदीपक यश परीक्षेत मिळेल. स्वत:चा अभ्यास स्वत: करण्यावर भर द्यावा. प्रेमाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. एकमेकांच्या विचारांना योग्य संधी द्या. वैवाहिक जीवनात रस उत्पन्न करा. अहंकारास फार महत्त्व देऊ नका. जीवनसाथीच्याही भावनांचा आदर केला पाहिजे. जीवनशैलीत कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. दुसऱ्यांवर विश्वासून कृती, साहस टाळा.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

मिथुन | साप्ताहिक राशिभविष्य
                   मिथुन

शुक्र प्रथम, रवि-मंगळ द्वितीय, बुध-राहु पराक्रम, गुरु चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र-शनि षष्ठ, चंद्र-प्लुटो सप्तम, नेपच्युन-केतु नवम, हर्षल लाभस्थानातुन भ्रमण करणार आहेत. शारीरिक वेदनांपासून स्वत:चा बचाव करा. सकाळचा नियमित व्यायाम व चालणे महत्वाचे आहे.़ पैशाचे फार मोठे व्यवहार करण्याची घाई करु नये. तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. बचत करण्याकडे लक्ष द्या. नोकरीमध्ये तुमच्या कामाचे महत्व वाढल्याने तुम्हाला विशेष सवलती बहाल केल्या जातील. नवे व्यवसायात अकारण धाडसी निर्णय घेऊ नका. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. गुप्त शत्रुंपासून आपल्याला सतत सावधानता पाळवी लागणार आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर ठाम विश्वास ठेवा.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कर्क | साप्ताहिक राशिभविष्य
                     कर्क

रवि-मंगळ प्रथम, बुध-राहु द्वितीय, गुरु पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र-शनि पंचम, चंद्र-प्लुटो षष्ठ, नेपच्युन-केतु अष्टम, हर्षल दशम, शुक्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. मानसिकता सकारात्मक ठेवल्यास चिंता कमी होतील. तणाव घालवण्यासाठी योगासने व प्राणायाम करावा. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नातेवाईक स्वार्थी व मतलबी वृत्तीचे असतील. आपली मते कुटुंबावर लादू नका. कौटुंबिक कर्तव्य पुर्ण करा. आर्थिक व्यवहार सांभाळून करावयास हवेत. अर्थप्राप्तीच्या नव्या योजना आखा. नोकरीत बदल करताना काळजी घ्या. नोकरी किंवा व्यवसायात अवाजवी साहस टाळा. वरिष्ठांची मर्जी संपादन करु शकाल. शासकीय कामे या सप्ताहात उरकून घ्यावीत.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

सिंह | साप्ताहिक राशिभविष्य
                     सिंह

राशीस्थानी बुध-राहु, गुरु द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र-शनि चतुर्थ, चंद्र-प्लुटो पंचम, नेपच्युन-केतु सप्तम, हर्षल नवम, शुक्र लाभ, रवि-मंगळ व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा स्थूलपणा वाढत जाईल. त्याच्या दुष्परिणामाला सामोरे जावे लागेल. आपल्या शक्तीच्या बाहेर उलाढाल्या करु नका. घरातील वातावरण आनंदीत ठेवा. मनात सकारात्मक भावना ठेवा. कौटुंबिक जबाबदारीचे काटेकोर पालन करा. तरुणांनी प्रेमप्रकरणे सावधपणे टाळावीत. परस्परांच्या स्वातंत्र्याचा योग्य मान राखा. वैवाहिक जीवनातील कर्तव्य पूर्ण करा. थोडीशी तडजोड केल्यास वैवाहिक जोडिदार चांगला मिळेल. शेजाऱ्यांकडून अपेक्षित मदत मिळेल. मनोधैर्य टिकवून ठेवा म्हणजे मार्ग काढू शकाल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कन्या | साप्ताहिक राशिभविष्य
                   कन्या

आपल्या राशीत गुरु, चंद्र द्वितीय, चंद्र-शनि पराक्रम, चंद्र-प्लुटो चतुर्थ, नेपच्युन-केतु षष्ठ, हर्षल अष्टम, शुक्र दशम, रवि-मंगळ एकादश, बुध-राहु व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. शारीरिक दगदग वाढेल. गरज वाटल्यास डाँक्टर बदलण्यास मागे पुढे पाहू नये. आपल्या कौटुंबिक कर्तव्यासाठी खर्चाची तयारी ठेवा. घरातील ज्येष्ठांचा सल्ला हितकारक ठरेल. प्रेमाच्या माणसांशी तुटक वागू नका. प्रेमसंबंधात वाढ करण्याचा प्रयत्न करा. विवाहोच्छुकांना अपेक्षेनुसार जोडिदार मिळेल. जीवनसाथीचा विश्वास संपादन करा.़ वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. शक्यतो कायद्याचे उलंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. काळानुसार बदलायला हवंच. स्वत:च्या कर्तृत्वावर अधिक विश्वास ठेवा.

 मासिक राशीभविष्य  जाणून घ्या आपली कुंडली 

तूळ | साप्ताहिक राशिभविष्य
                       तूळ

चंद्र प्रथम, चंद्र-शनि द्वितीय, चंद्र-प्लुटो पराक्रम, पंचमात नेपच्युन-केतु, सप्तमात हर्षल, नवमात शुक्र, रवि-मंगळ दशमात, लाभात बुध-राहु, गुरु व्ययस्थानात असे ग्रहमान असतील. सकस व सात्विक आहारावर भर द्या त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविता येईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. विद्यार्थ्यांनी कोणतेही ठोकताळे न वापरता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आवडीची पुस्तके वाचून वाचनाची आवड जोपासावी. प्रिय व्यक्तीच्या मनाचा वेध घ्या. जीवलग व्यक्तीवर जास्त अपेक्षांचे ओझे ठेवू नका. वैवाहिक संबंधात जीवनसाथीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करु नका. आलेल्या व्यत्ययास दुर करा. सरकारी कामे किंवा राजकीय क्षेत्रातील कामे अतिशय सावधपणे हाताळावीत.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

वृश्चिक | साप्ताहिक राशिभविष्य
                   वृश्चिक

चंद्र-शनि प्रथम, चंद्र-प्लुटो द्वितीय, चतुर्थात नेपच्युन-केतु, षष्ठात हर्षल, अष्टमात शुक्र, नवमात रवि-मंगळ, बुध-राहु दशमात, लाभात गुरु, चंद्र व्ययस्थानात असे ग्रहमान असतील. प्रकृती स्वास्थ्याविषयी विनाकारण चिंता करीत बसू नका त्यामुळे उदासीनता व नैराश्य येऊ शकेल. आरोग्यासाठी योग्य व नियमित व्यायाम आवश्यक आहे. धनार्जनाच्या असलेल्या योजना मार्गी लागून त्यात सफलता मिळेल. खर्चापेक्षा बचतीकडे कल वाढवावा लागेल. घरातील सर्वाची मने जिकंण्याचा प्रयत्न करा. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थी वर्गाला चांगले व मोठे यश मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तुम्ही कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करु नका.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

धनु | साप्ताहिक राशीभविष्य
                       धनु

आपल्या राशीत चंद्र-प्लुटो, पराक्रमात नेपच्युन-केतु, पंचमात हर्षल, सप्तमात शुक्र, अष्टमात रवि-मंगळ, नवमात बुध-राहु, गुरु दशम, चंद्र लाभात, चंद्र-शनि व्ययात अशी ग्रहांची रचना असेल. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे खर्च वाढणार नाही याची काळजी घ्यावी. बुध्दीचातुर्याची अर्थाजनाला जोड द्या. प्रेम संबंधात एकमेकांवर विश्वास ठेवा. आपल्या प्रियजनांच्या मनातील विश्वास डळमळीत होणार नाही याची दक्षता घ्या. वैवाहिक जीवनात वादविवाद टाळा. जोडीदारास मानसन्मान द्या. दुसऱ्यांना फार सभ्यता दाखविण्याच्या भानगडीत पडू नये. नोकरीसाठीच्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायात चातुर्याचा वापर करा. हितचिंतकांच्या सल्ल्यांनी चांगले निर्णय घ्या. आपल्या विचारात स्पष्टता ठेवा.

 मासिक राशीभविष्य    जाणून घ्या आपली कुंडली 

मकर | साप्ताहिक राशिभविष्य
                       मकर

द्वितीयात नेपच्युन-केतु, चतुर्थात हर्षल, षष्ठात शुक्र, सप्तमात रवि-मंगळ, अष्टमात बुध-राहु, नवमात गुरु, दशमात चंद्र, लाभात चंद्र-शनि, व्ययस्थानात चंद्र-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. सुर्य नमस्काराच्या सर्वांग सुंदर व्यायामाने आरोग्य चांगले राहू शकते. कौटुंबिक वाद वाढवु नका. आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा. व्यापारात आर्थिक व्यवहार करताना मनस्थिर ठेवा. घरातील स्री सदस्यांचा सल्ला आर्थिक लाभाचा आहे. प्रेम बंधनात असल्यास एकमेकांची मने जाणून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेमात नको ते धाडस करु नका. वैवाहिक सौख्याबद्दल आलेल्या अडचणींवर सामोपचाराने मार्ग काढा ़ दुसऱ्या व्यक्तीची प्रशंसा त्यांच्या समोर करणे टाळावयास हवे.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

कुंभ | साप्ताहिक राशिभविष्य
                     कुंभ

राशीस्थानी नेपच्युन-केतु, पराक्रमात हर्षल, पंचमात शुक्र, षष्ठात रवि-मंगळ, सप्तमात बुध-राहु, अष्टमात गुरु, नवमात चंद्र, दशमात चंद्र-शनि, लाभस्थानी चंद्र-प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. प्रकृतीवर कामाचा व कार्यालयीन ताण तणावाचा भार पडणार नाही याची दक्षता घ्यावी. तुमच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. नोकरदारांना कामात सुखद स्थिती अनुभवास मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराचे मन जिंकणे ही तारेवरची कसरत ठरेल ़ जोडीदाराशी सौम्य शब्दात बोलणे अधिक योग्य ठरेल. जीवनसाथीचा विश्वास संपादन करा]़ जागेच्या व्यवहारात नुकसान होण्याची चिन्ह असल्याने आपण ते टाळण्याचा प्रयत्न करावा. जनहितासाठी केलेल्या कामाचे कौतुक होईल.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली 

Pisces | Kalnirnay Horoscope
                        मीन 

द्वितीयात हर्षल, चतुर्थात शुक्र, पंचमात रवि-मंगळ, षष्ठात बुध-राहु, सप्तमात गुरु, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र-शनि, दशमात चंद्र-प्लुटो, व्ययात केतु-नेपच्युन असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. शाकाहार नेहमीच फायदेशीर ठरेल. घाई घाईने जेवण करणे टाळा. प्रेमात विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता घ्या. समोरील व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार करा. वैवाहिक संबंधात जीवनसाथीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करु नका. आलेल्या व्यत्ययास दुर करा. शत्रु आपल्यासमोर टिकाव धरु शकणार नाहीत. घरातील पाळीव प्राण्यांच्या आरोग्यास जपा. मातुल घराण्याबरोबर होणारे वादाचे विषय टाळावेत. भावनांवर नियंत्रण ठेवा व अनावश्यक तणाव बाळगू नका.

 मासिक राशीभविष्य   जाणून घ्या आपली कुंडली