September 10, 2024

Horoscope (Marathi)- October 2022

राशीभविष्य – सप्टेंबर २०२२

मेष

कार्यक्षेत्रातील नियोजित कामांना गती मिळेल. कुटुंबात सहकार्याची भूमिका घ्या. मित्रपरिवारात आपलेच म्हणणे खरे करण्याचा अट्टाहास करू नका. आर्थिक उधारी-उसनवारी करणे टाळा. प्रवासात पथ्यपाणी सांभाळा. अति लाभाची गुंतवणूक करू नका.


वृषभ

पूर्वार्धात छोट्या कामाला मोठी ताकद खर्ची घालावी लागेल. परंतु यश पदरी पडेल. आर्थिक लाभ चांगला असेल. उत्तरार्धात आप्तेष्टांसोबतचे संवाद काळजीपूर्वक करा. वादातीत विषयावर सर्वांगीण विचार करूनच आपले मत मांडा


मिथुन

सध्या तुम्ही विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे. तुम्हाला जे पटणार नाही त्या बाबतीत तुमची भूमिका ठामपणे मांडा, परंतु गोड बोलून. उत्तरार्धात अनुकूलता वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वी होईल


कर्क

मानसिक ताणतणावाचे परिणाम प्रकृतीवर होऊ देऊ नका. एकाग्रता वाढवा. कार्यक्षेत्रातील आपल्या मर्यादा जाणून वागा. प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे फळ मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींनी आवडीच्या कामात मन रमवावे


सिंह

महिन्याच्या पूर्वार्धात तुमच्या अंगी असलेले कर्तृत्वगुण दाखवायला अनुकूल असे ग्रहमान आहे. सरकारी कामकाजात अपेक्षित प्रगती साधू शकाल. तातडीच्या निकालासाठी आग्रही राहू नका. थोडी वाट पाहा. 


कन्या

आपल्या वागण्या-बोलण्याने कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. अल्पपरिचित व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तुमच्या यशाची कमान चढती असेल. आर्थिक लाभाची बचतीत गुंतवणूक करा.


तूळ

महत्त्वाची कामे वरिष्ठांच्या सल्ल्याने मार्गी लावा. आर्थिक व्यवहारात लेखी करार आवश्यक आहे. अव्यवहार्य धाडस करू नका. प्रवासात अनावश्यक खर्च करावा लागेल. आहारावर नियंत्रण आवश्यक.


वृश्चिक

आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडेलच असे नाही हे ध्यानी ठेवून मार्गक्रमण केलेत तर मार्ग सुखकर होतील. वाढीव खर्चावर अंकुश आणा. आरोग्याविषयी बेपर्वाई नको. उत्तरार्धात कुटुंबात काही आनंदाचे क्षण अनुभवता येतील.


धनु

आपली नेमकी अडचण जाणून घेतल्यास यश लवकर पदरी पडेल. आप्तेष्टांचे मन सांभाळा. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. खर्चाचा नेमका अंदाज घेऊन प्रवासाचे नियोजन करा. नोकरदारांनी आपल्या कामातील अचूकता जोपासावी


मकर

मनाजोगती कामे करायला मिळाल्याने तुम्ही या महिन्यात सुखावून जाणार आहात. पूर्वार्धात धनप्राप्ती चांगली होईल. काहींना बढती-बदलीचे योग संभवतात. प्राकृतिक स्वास्थ्यासाठी आहार-विहाराचे वेळापत्रक चुकवू नका


कुंभ

प्रत्येक वेळी तुमच्या अपेक्षेनुसारच कामे होतील असे नाही. उत्तरार्धात परिस्थितीत अनुकूल बदल होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो हे लक्षात ठेवा. विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्याल.


मीन

ताणतणाव हे प्रत्येकाला असतात. तुमच्या विवंचनांची चर्चा इतरांकडे करू नका. भागीदारीत आर्थिक व्यवहारातील पारदर्शकता आवश्यक. महिलांनी घडून गेलेल्या घटनांवर विचार करणे टाळावे.