Kalnirnay Monthly Horoscope Marathi Online | Month December 2018
Thursday, 22 April 2021 22-Apr-2021

Horoscope (Marathi)- April 2021

राशीभविष्य - एप्रिल २०२१

मेष

शक्ती आणि वेळ खर्च पडण्याची शक्यता आहे. थोडे सबुरीने घ्या. उत्तरार्धात थोडी परिस्थिती बदलेल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे क्षण अनुभवता येतील. आपल्या परिवारात विश्वासू व्यक्ती कोण याचा अंदाज घ्या.


वृषभ

‘कार्यक्षेत्रात मनाविरुद्ध घडलेल्या एखाद्या छोट्याशा घटनेने नाराज होऊ नका. कामकाजात मनाजोगती प्रगती होईल. सरकारदरबारी रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्तरार्धात जबाबदारीचे भान ठेवून कर्तव्यपूर्तीसाठी दक्ष राहा.


मिथुन

नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. आपल्या तत्त्वाशी व कामाशी एकनिष्ठ राहा. सामाजिक जीवनात नावलौकिक होईल. काहींच्या घरी शुभकार्ये ठरतील. घरातील मतभेद उग्ररूप घेण्याअगोदरच मिटवा.


कर्क

नाहक एखाद्या प्रकरणात विरोधक तुम्हाला अडकविण्याचा प्रयत्न करतील. सावध राहा. प्रसंगा-वधानाने कामे मार्गी लावावी लागतील. खर्च वाढतील परंतु त्यांची पूर्तता होईल. उत्तरार्धात अनेक पातळीवर सकारात्मक बाबी घडतील. इच्छापूर्ती होईल.


सिंह

भांडणात आपली शक्ती नाहक खर्ची पडून मनस्तापही होतो. उत्तरार्धात आत्मविश्वास बळावेल. वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन लाभेल. दिलेला शब्द पाळण्यात अडचणी येत असतील तर त्वरित तशी कल्पना द्या.


कन्या

अहभाव हा त्रासदायकच ठरतो. येणाच्या प्रतिकूल प्रसंगास आत्मविश्वासाने सामोरे जा. सध्या आपल्या जवळच्या माणसांकडून वेगळे अनुभव तुम्हाला येण्याची शक्यता आहे. शब्द सांभाळून वापरा. प्रवासाचे योग संभवतात. विचारपूर्वक निर्णय घ्या.


तूळ

आपल्या मित्रपरिवारातील नेमके विरोधक कोण हे जाणून वागण्याचा काळ आहे. आपले यश साजरे करून, इतरांची नाराजी ओढवून घेऊ नका. उत्तरार्धात खर्चात वाढ संभवते. दूरच्या प्रवासाचे प्रस्ताव समोर येतील. प्रकृतीची पथ्ये सांभाळा.


वृश्चिक

समोरच्या व्यक्तीची अचूक पारख करण्याचे तंत्र आत्मसात करा. मैत्रीत पैशाचे व्यवहार टाळा. आर्थिक व्यवहारात लिखापढी आवश्यक. वाढत्या कौटुंबिक खर्चामुळे आर्थिक नियोजनास प्राधान्य द्या.


धनु

महिन्याच्या सुरुवातीस काही धाडसी निर्णय घ्यावे लागतील. घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. जमीनजुमल्याचे व्यवहार शक्यतो टाळा. प्रवासात थोडा त्रास संभवतो. कुटुंबातील नाराजीची कारणे दूर करण्याला अग्रक्रम द्या.


मकर

आप्तेष्टांकडून तुमच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक होईल. आर्थिक बाजू चांगली असेल. पूर्वार्धात अपेक्षित गोष्टी घडल्याने कार्यउत्साहही वाढेल. कुटुंबात मात्र एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर एकमत होणार नाही असे दिसते.


कुंभ

तुमचा स्वभाव नेमका न कळल्याने समोरचा त्याचा गैरफायदा उठविण्याचा प्रयत्न करेल. आर्थिक पातळीवर चढउतार होतील. कर्ज देणे-घेणे टाळा. जे शेतीकामात असतील त्यांनी अधिक सावधगिरी बाळगा. उत्तरार्ध अनुकूल आहे.


मीन

तुम्ही शारीरिक व्याधींनी बऱ्याचदा त्रासलेले असता. या महिन्यात आरोग्याविषयी तुम्ही थोडे अधिक सतर्क राहा. आहारावर नियंत्रण ठेवा. काहींना डोळ्यांचे त्रास संभवतात. पूर्वार्धात अपेक्षित कामे पार पडतील. नवीन करार नको.