सुदृढ आरोग्य- संस्कृती

अलीकडेच युरोपीय देशांत फिरण्याचा योग आला. सुंदर हिरवी कुरणे व चंदेरी हिमाच्छादित डोंगरमाथे सर्वांनाच भुलवतात. पण त्याहूनही रम्य अशी काही दृश्ये माझ्या मनावर कोरली गेली. रुंद, सहा पदरी रस्ते, पादचाऱ्यांसाठी व सायकलींसाठी स्वतंत्र लेन, शिस्तबद्ध नीरव रहदारी, सार्वत्रिक स्वच्छता आणि त्याहून सुंदर म्हणजे निर्धास्तपणे कानाला संगीत लावून जॉगिंग करीत असलेल्या सर्वसाधारण महिला! सायकली चालवत रपेट […]