September 20, 2024

सिंहासनाधिष्ठित हिंदुपदपातशहा छत्रपती शिवाजी महाराज

आज ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी! ३४४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुप्रभाती श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे राजसिंहासन भूषविले. शिवाजी महाराज केवळ राजसिंहासनावरच विराजमान झाले असे नव्हे, तर त्या महन्मंगल परमपावन भाग्यक्षणी ते मराठी माणसाच्या हृद्यसिंहासनावरही अनंत काळासाठी स्थानापन्न झाले आणि लोकमानसावर अखंड अविच्छिन्न अधिराज्य गाजविणाऱ्या या वीराग्रणी पुरुषश्रेष्ठाच्या नावाचे नुसते स्मरणही पुढील पिढ्यांपिढ्यांच्या मनात शौर्याची उत्तुंग कारंजी […]