पोडी, उरुगै आणि थोक्कू महाराष्ट्राप्रमाणेच तामिळनाडू-मध्येही ताटातील प्रत्येक पदार्थाचे स्थान ठरलेले आहे. ‘इलै सापडू’ हे पारंपरिक जेवण केळीच्या पानावर वाढण्यात येते. या पारंपरिक जेवणात सांबार, रसम, पोरियल, कूटु, वडई, पायसम, थयिर पचडी, ऊरुगै या पदार्थांचा समावेश असतो. दक्षिण तामिळनाडूतील तंजावर व कुंभकोणम या भागांमध्ये लोणचे आणि रायते केळीच्या पानाच्या रुंद भागात, वरच्या बाजूला वाढले जाते. […]