मी - एक नापास आजोबा - पु. ल. देशपांडे

मी – एक नापास आजोबा

” सध्या तुम्ही काय करता? ” या प्रश्नाचं ” दोन नातवांशी खेळत असतो ” याच्याइतकं सत्याच्या जवळ जाणारं दुसरं उत्तर माझ्यापाशी नाही. नातवंडांची तलफ कशी येते हे आजोबा- आजीच जाणतात. नातवंडं हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे. गुडघ्यांच्या संधीवातावर अचपळ नातवामागून धावणं हा रामबाण उपाय आहे. आणि एरवी खांदेदुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच […]