September 12, 2024

लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन कसे करावे? दीपावलीच्या ह्या दुसऱ्या दिवशीदेखील पहाटे लवकर उठून तेल-उटण्याने अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. सकाळी देवपूजा, दुपारी पितरांचे श्राद्धविधी करुन प्रदोषकाळी पुन्हा स्नान करुन शुचिर्भूत व्हावे. नंतर पूजायोग्यस्थळी चौरंगावर अथवा पाटावर कुंकुम अक्षतांच्या साहाय्याने आठ पाकळ्यांचे कमळ काढून त्यावर लक्ष्मी, विष्णू, कुबेर ह्यांची पूजा करावी. त्या तिघांचीही मनोमन सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. नंतर त्यांना लवंग, वेलची, […]

दिवाळीचे महत्त्व

आपण तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाशमार्गावरचे पथिक आहोत. सर्व प्रकारचा अंधार मागे टाकून उच्चल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगणारे आपण फार मोठी परंपरा आणि मोलाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या भारत देशाचे नागरिक आहोत. आपली दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे, हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी […]