September 15, 2024
राजगीरीच्या पिठाच्या पुऱ्या | कालनिर्णय पाकनिर्णय २०१७

राजगिरा पिठाच्या पुऱ्या

साहित्य: पाव किलो राजगिरीचे पीठ २ मोठे बटाटे (उकडलेले) ४-५ हिरव्या मिरच्या मीठ पाणी कृती: तयार राजगिरीच्या पिठात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, २  उकडलेले बटाटे व चवीपुरते मीठ घालून मिश्रण एकजीव करावे. मळताना थोडा पाण्याचा हात लावून पीठ मळावे. नेहमीच्या पुऱ्यांप्रमाणे या पिठाच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. बटाट्याच्या भाजीबरोबर अथवा गोड दह्याबरोबर या पुऱ्या खाण्यास द्याव्यात. […]