गंधर्वनाम संवत्सरे - पु. ल. देशपांडे

गंधर्वनाम संवत्सरे …

या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्यांच्या लेखी काहीही असलं तरीमराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे बालगंधर्वनामे संवत्सरच आहे. बालगंधर्व नावाचा या महाराष्ट्राच्या नाट्यकला क्षेत्रात जो एक चमत्कार घडला, त्या विस्मयकारक नटवराच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे. जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत उत्तम दर्जाचं कार्य करणाऱ्यांना श्रेष्ठत्व मिळतं, लोकप्रियता मिळतं. पण विभूतिमत्त्व लाभतंच असं नाही. ही कुणी कोणाला उचलून […]