अक्षय्य तृतीया व अक्षय्य दान

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त! कारागीर या दिवशी शेतीच्या कामाची हत्यारे करावयाला प्रारंभ करतात. शेतकरी वर्ग या दिवसाला विशेष महत्त्व देतो. चातुर्मासासाठी लागणाऱ्या भाजीचे बी खेड्यापाड्यातील स्त्रिया या दिवसात परसातील वाफ्यात पेरतात. हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री, पायांत घालावयाचे जोडे दान करण्याची प्रथा आहे. ब्राह्मणाला या […]