टरबुजाच्या सालीचे कटलेट
मॅरिनेशनचे साहित्य: २ छोटे चमचे भाजणीचे पीठ, २ छोटे चमचे नाचणीचे पीठ, २ छोटे चमचे गव्हाच्या चिकाची पावडर, १ मोठी वाटी टरबुजाच्या सालीचा कीस, प्रत्येकी २० ग्रॅम जवस, दुधी भोपळ्याचा कीस, खरबुजाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, सब्जा, काकडीच्या बिया, चिया सीड्स, चिंचेची पावडर, जांभूळ पावडर, ३ छोटे चमचे मिरची पावडर, १ छोटा चमचा हळद, थोडी कोथिंबीर, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, १ छोटा चमचा जिरेपूड, १ छोटा चमचा भाजलेले तीळ, चवीनुसार मीठ, तळणासाठी तेल.
कृती: सर्व बिया एकत्र करून हलक्या भाजून घ्या. त्या थंड झाल्यावर त्यात चिंचेची पावडर, जांभूळ पावडर घालून मिक्सरमधून बारीक करून घ्या. या वाटलेल्या मिश्रणात भाजणीचे पीठ, नाचणीचे पीठ, गव्हाच्या चिकाची पावडर घालून एकजीव करा. आता यात आले-लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, आवडीनुसार कोथिंबीर, टरबुजाच्या सालीचा कीस घालून सर्व जिन्नस एकत्र करून त्याचा घट्ट गोळा मळून घ्या. हा गोळा थोडा वेळ तसाच ठेवा. या गोळ्याचे छोटे-छोटे गोळे करून कटलेटचा आकार द्या. तिळामध्ये कटलेट घोळवून पॅनवर थोडेसे तेल घालून फ्राय करा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
पल्लवी खुताडे, नाशिक
