पुदिना गुळांबा कपकेक
साहित्य: प्रत्येकी १/२ कप कस्टर्ड पावडर, शुद्ध तूप, ताजे ताक, गुळांबा, प्रत्येकी १/४ कप बारीक रवा, तांदळाचे पीठ, प्रत्येकी २ छोटे चमचे बेकिंग पावडर, पांढरे तीळ, प्रत्येकी १ छोटा चमचा खायचा सोडा / इनो, टरबूज, सूर्यफूल, भोपळा यांच्या बिया, २ छोटे चमचे टूटीफ्रूटी, १० पुदिना पाने.
कृती: एका भांड्यात कस्टर्ड पावडर, बेकिंग पावडर, तांदूळ पीठ व बारीक रवा चाळून एकत्र करा. त्यात टूटीफ्रूटी, पुदिन्याची पाने, तीळ, टरबूज, सूर्यफूल, भोपळ्याच्या बिया, गुळांबा, इनो आणि गरम तूप घालून एकजीव करा. त्यात लागेल तसे ताक घालून मिश्रण घट्टसर करा.केक टिनमध्ये तूप लावून त्यात हे मिश्रण घाला. वरून टूटीफ्रूटी आणि सर्व बिया घालून हा केक ओव्हनमध्ये १६० डिग्री तापमानावर २१ मिनिटे बेक करा.
टीप: केक अधिक गोड हवा असेल तर २ चमचे मध आणि गरम चॉकलेट सॉस घालून तो खावा. हा केक गॅसवरही करता येईल.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सायली वैद्य, मुंबई
