पौष्टिक बिया आणि डाळवचे वेफर्स
साहित्य: १/२ कप फुटाणे डाळवचे पीठ, प्रत्येकी १ छोटा चमचा जिरे पावडर, सूर्यफूल व भोपळ्याच्या बिया, पांढरे तीळ, काळे तीळ, सब्जा व तेल, २ छोटे चमचे टोमॅटो पावडर, प्रत्येकी १/२ छोटा चमचा टरबूज व खरबूज बिया, बेकिंग पावडर, चवीनुसार सैंधव मीठ, आवश्यकतेनुसार पाणी.
कृती: मोठ्या वाडग्यात पाणी सोडून सगळे साहित्य एकत्र करा. त्यात तेल घाला. १-१ चमचा पाणी घालत पीठ एकत्र करत गोळा बनवून घ्या. बटर पेपरवर तयार पिठाचा गोळा ठेवा, वरून दुसरा बटर पेपर ठेवून पातळ पोळी लाटून घ्या. पिझ्झा कटरच्या मदतीने चौकोनी वेफर्स कापून घ्या. हे वेफर्स ओव्हनमध्ये १७० डिग्रीवर १५ मिनिटे बेक करा. थंड झाल्यावर पौष्टिक बियांचे वेफर्स चहाबरोबर सर्व्ह करा. हे वेफर्स बंद डब्यात साठवून ठेवा.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
जयश्री भवाळकर, मध्य प्रदेश
