खजूर-गूळ राजगिरा प्लम केक
साहित्य: १० स्ट्रॉबेरी, प्रत्येकी १/४ कप शेंगदाणा तेल, गूळ, पाणी, प्रत्येकी १/२ कप दूध, ड्रायफ्रूट तुकडे, १० काळे खजूर, २०० ग्रॅम राजगिरा पीठ, प्रत्येकी १/२ छोटा चमचा बेकिंग पावडर, खायचा सोडा, वेलची पूड, चवीनुसार मीठ.
कृती: स्ट्रॉबेरीचे तुकडे करून त्यात पाणी घालून ज्यूस करून घ्या व त्यात ड्रायफ्रूटचे तुकडे चार तास भिजत घाला.केकच्या भांड्याला तेलाचा हात लावून त्यावर राजगिरा पीठ भुरभुरा.खजुराच्या बिया काढून घ्या.त्यात गूळ आणि १/४ कप दूध घालून बारीक करून घ्या.त्यात चिमूटभर मीठ, वेलची पूड आणि शेंगदाणा तेल घालून एकजीव करून घ्या.चाळणीने राजगिरा पीठ, सोडा आणि बेकिंग पावडर चाळून तयार मिश्रणात घाला.त्यात भिजवलेले ड्रायफ्रूट्स घाला.उरलेले पाव कप दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्या.तयार केक टिनमध्ये मिश्रण ओतून चाळीस मिनिटे २०० डिग्रीवर बेक करा.टूथपिक घालून मिश्रण चिकटत नाही ना ते पाहा.तयार केक ओव्हनमध्येच कनेक्शन बंद करून पंधरा मिनिटे ठेवा.गार झाल्यावर टिनमधून बाहेर काढा‧
टीप: तेलाऐवजी ५० ग्रॅम बटर घेता येईल.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
मीनल सरदेशपांडे, रत्नागिरी
