फ्रेंच प्रॉन्स अँड सिट्रस सलाड
संत्री, सीफूड आणि व्हिनेगरचे ड्रेसिंग असे सलाड फ्रान्समध्ये अनेकदा दुपारच्या जेवणाला खातात. आपण सीफूडबरोबर सहसा फळे खात नाही, पण हे सलाड खूप स्वादिष्ट लागते.
साहित्य: १०० ग्रॅम शिजलेली कोळंबी, एका लहान संत्राच्या पाकळ्या, १ वाटी लेट्यूसची पाने, २ चमचे ऑलिव्हज, ३० ग्रॅम फेटा चीज, १ मोठा चमचा ऑलिव्ह तेल, १ मोठा चमचा बाल्सेमिक व्हिनेगर, चवीनुसार मीठ आणि मिरीपूड.
कृती: कोळंबी परतून घ्या. त्यात संत्र्याच्या पाकळ्या, फेटा चीझचे तुकडे घाला. ड्रेसिंगसाठी तेल, व्हिनेगर, मीठ आणि मिरपूड एकत्रित करा. एका बाऊलमध्ये सर्व साहित्य घ्या. त्यावर ड्रेसिंग घालून अलगद एकजीव करा आणि सर्व्ह करा.
टीप: या सलाडमध्ये कोळंबी-ऐवजी टोफू घालू शकतो.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अमिता गद्रे
