मेणबत्ती दिवा

साहित्य: दोऱ्याचे मोठे प्लॅस्टिकचे रिळ (बंडल) एखादे छोटेसे झाकण लेस बटण अॅक्रिलिक रंग ब्रश टिकल्या कात्री कृती: प्लॅस्टिकच्या रिळाला अॅक्रिलिक रंगात रंगवा. (पूर्ण कलर वापरा. जरा चकाकी येईल.) पूर्णपणे ते वाळू द्या. वाळलेल्या रिळाच्या निमुळत्या भागावर एखादे छोटे झाकण चिकटवा व सांध्यावर लेस गुंडाळून बो बांधून चिकटवा. रंगीत बाजूच्या मोठ्या व्यासाच्या खालील बाजूस रंगीत टाकाऊ बटणे […]