Samarth Smaran 5

समर्थांचा शिष्यपरिवार (समर्थ स्मरण :५)

उपलब्ध माहिती, कागदपत्रे यांच्या साहाय्याने समर्थभक्त कै. शंकर श्रीकृष्ण तथा नानासाहेब देव यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, समर्थ एकूण १०२९ गावी गेले होते. ज्या काळी वाहनांची, रस्त्यांची सोय नव्हती, त्या काळी समर्थांनी केलेले हे भ्रमण आहे. लोक काशी-रामेश्वराच्या तीर्थयात्रेला निघतांना घरच्यांचा निर्वाणीचा निरोप घेत. तीर्थयात्रेवरून जिवंत परत येणे हे त्या काळी जवळजवळ अशक्यच मानले […]

आई | समर्थ रामदास स्वामी | रामदास स्वामी | Samarth Ramdas

आईचा लाघवी लेक (समर्थ स्मरण : ४)

आई परिभ्रमण चालू असतांना अंबाजोगाई येथे समर्थ एका देवळात कीर्तन करीत होते. त्यांच्या कीर्तनाला योगायोगाने जांब गावचे एक वृद्ध गृहस्थही आले होते. समर्थांची कीर्ती, त्यांची वाणी, रूप हे सारे पाहून त्या गृहस्थांना वीस-बावीस वर्षांपूर्वी बोहल्यावरून पळून गेलेल्या ठोसरांच्या नारायणाची आठवण झाली. थोडी शंका येऊन त्यांनी कीर्तन संपल्यावर समर्थांना सरळ ‘ मूळ कुठले?’ म्हणून विचारले. समर्थांनी […]

समर्थांची परंपरा (समर्थ स्मरण : ३)

प्रत्येक संताची म्हणून एक परंपरा असते. ही परंपरा त्या संताच्या उदयापूर्वीपासून चालत आलेली असते आणि त्यांच्यापुढेही ती चालू राहणारी असते. हा संत त्या परंपरेमधील एक दुवा असतो. दुवा खरा, पण तो फार महत्त्वाचा ठरतो. कारण त्याच्यामुळेच त्याच्याआधी त्या परंपरेत कोण कोण होऊन गेले ते जसे समजू शकते, तसेच त्याचे शिष्य, प्रशिष्य कोण हेही आपल्याला जाणवू […]

धर्म जागृती आणि देशभक्ती (समर्थ स्मरण : २)

समर्थांनी प्रभुरामचंद्र आणि महाबली हनुमान यांचा आदर्श लोकांसमोर ठेवला त्याच्यी सर्व कारणे आपल्याला या घडीला समजू शकली नाहीत. या  काळात राम आणि हनुमंताचा आदर्श हा आवश्यक होता एवढे आपण ठामपणे म्हणू शकतो,कारण रामाने देवांना रावणाच्या कैदेतून मुक्त केले. कर्तव्यपालनासाठी सर्व प्रकारच्या ऐहिक सुखांकडे पाठ फिरवून हा मर्यादापुरुषोत्तम विविध प्रकारचे कष्ट आनंदाने सोसत राहिला. समर्थांच्या काळात विलासी […]

समर्थ स्मरण १ आनंदाचा कंद , देवाचिये द्वारी

धर्मजागृतीतून स्वराज्य स्थापना (समर्थ स्मरण : १)

श्रीसमर्थ रामदासस्वामी हे आपल्या सगळ्या संतपरंपरेत त्यांच्या वेगळेपणामुळे उठून दिसतात. ज्या काळात महाराष्ट्र मोगलांच्या आक्रमणामुळे हतबल झाला होता. जनसामान्यांमध्ये लोकजागृतीची जाणीव करून देणे अत्यावश्यक होते, त्या काळात श्रीसमर्थांनी देश आणि धर्म याबद्दलचा अभिमान लोकमानसात चेतवला. वन्ही तो चेतवावा रे । चेतविताच चेततो । । हे आपलेच म्हणणे समर्थांनी प्रत्यक्ष कृतीने खरे करून दाखविले. समर्थांच्या आधीच्या […]