विधायक राजकारण आणि सारे आपण आपण भारतीय तसे राजकारणप्रिय आहोत. दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारणाची चर्चा अगदी घरोघर-गल्लोगल्ली रंगत असते. कुठलीही वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल्स किंवा अन्य समाजमाध्यमे बघा; साहित्य, संगीत, कला, क्रीडा, चित्रपट, पर्यटन, विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग,व्यापार, आंतरराष्ट्रीय संबंध वगैरे विषयदेखील तिथे अधूनमधून हाताळले जातात; पण सर्वाधिक जागा ही राजकारणानेच व्यापलेली असते. आपल्या या राजकारणातील स्वारस्याचे आणि चर्चेचे नेमके स्वरूप […]
Category: मराठी लेखणी
कवचकुंडले ही भीतीची | संजीव लाटकर | Armour of Fear | Sanjeev Latkar
कवचकुंडले ही भीती ची भीती या भावनेला हजारो वर्षांचा इतिहास आहे. एका अर्थाने भीती ही माणूस नावाचा प्राणी अस्तित्वात आल्यापासून त्याच्यामागे पडछायेसारखी वावरते आहे. प्राण्यांमध्ये आजही आदिम अवस्थेतील अस्तित्वाची भीती टिकून आहे. माणूस प्रगत झाला, आधुनिक तंत्रज्ञानाने संपन्न झाला, तरी भीती काही त्याची पाठ सोडायला तयार नाही. भीतीसारखी निरपेक्ष दुसरी भावना नसेल कदाचित. देश, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, वर्ण, वर्ग, […]
संवाद: पंधरावी विद्या आणि पासष्टावी कला! | मुग्धा गोडबोले | Dialogue: 15th Grade and 65th Art | Mugdha Godbole
संवाद: पंधरावी विद्या आणि पासष्टावी कला! भाषा ही भावना आणि विचार मांडण्यासाठीचे मूलभूत साधन आहे. जे सोपे असते, ते लोकप्रिय होते. लिहिण्यापेक्षा बोलणे सोपे आणि नैसर्गिकही. त्यामुळे अर्थातच, ‘बोलण्याचा’ प्रसार फारच झपाट्याने झाला असावा. पण बोलणे वाढले किंवा विस्तारले, ह्याचा अर्थ प्रत्येकाला ‘संवाद’ साधता येऊ लागला असे अजिबात नाही. किंबहुना ‘संवादाचा अभाव’ किंवा ‘lack of communication’ हा सध्याच्या जगातला जवळजवळ सगळ्यात […]
श्रीकृष्णनीती | जयराज साळगावकर | Shri Krishna Policy | Jayraj Salgaokar
श्रीकृष्ण नीती भारतवर्षाचे सर्वात लोकप्रिय आराध्य दैवत म्हणजे पुरुषोत्तम श्रीकृष्ण. उदा. दक्षिणेतील तिरुपती बालाजी, उडिपीचा श्रीकृष्ण, पुरीचा जगन्नाथ, द्वारकेचा द्वारकाधीश, गुजरातचा डाकोरनाथ, पंढरपूरचा श्रीविठ्ठल, वृंदावनचा बांके बिहारीजी, जगन्नाथ मंदिर अहमदाबाद, मथुरेची कृष्णजन्मभूमी, वाराणसीचे (भग्नावस्थेतील) श्रीकृष्ण मंदिर, केरळमधील गुरुवायुर व श्रीपद्मनाभ, नाथद्वाराचा श्रीनाथजी, गोव्यातील श्रीदामोदर मंदिर अशी काही श्रीकृष्णाची सर्वात मोठी तीर्थक्षेत्रे भारतात आहेत. तसेच हिंदूंचा सर्वात महत्त्वाचा […]
गॅस सिलेंडर लीक होतोय?| गुगल गृहिणी | Leakage from the Gas Cylinder? | Google Housewife
गॅस सिलेंडर लीक होतोय? गॅस सिलेंडर लावताना तुम्हाला कधी वायू गळतीची (गॅस लीकेज) दुर्गंधी येते का? वायू गळतीचा वास येत असल्यास नेमके काय करायचे, हे बहुतांश जणांना कळत नाही. गॅस एजन्सीशी संपर्क साधला तरी ही एजन्सी लगेचच त्यांच्या माणसाला पाठवेल याची शाश्वती नसते. मग नेमके करायचे काय, हा मोठा गहन प्रश्न उभा राहतो आणि या प्रश्नाचे उत्तर […]
शेवग्याच्या शेंगांचे महत्त्व | डॉ. वर्षा जोशी | Importance of Drumstick | Dr. Varsha Joshi
शेवग्या च्या शेंगां चे महत्त्व पाल्याप्रमाणे शेवग्याच्या शेंगां-मध्येही अनेक पोषणमूल्ये असतात. त्यामुळे शेवग्याच्या शेंगांचाही आहारात नियमित समावेश करायला हवा. शेवग्याच्या एक कपभर शेंगां मध्ये आपल्याला दिवसभरात लागणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वाच्या जवळजवळ दीडपट ‘क’ जीवनसत्त्व असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. ‘क’ जीवनसत्त्व उच्च अँटीऑक्सिडंट आहे. त्याशिवायही इतर आणखी अँटीऑक्सिडंट्स शेंगांमध्ये असतात. त्यामुळे शरीरातील विघातक घटक (टॉक्सिक) काढून टाकण्यासाठी, […]
इच्छापत्राची अटळता | रवींद्र कुलकर्णी | The inevitability of a will | Ravindra Kulkarni
इच्छापत्रा ची अटळता राज कपूर यांच्या ‘श्री ४२०’ या चित्रपटात मुकेश आणि लता यांनी गायलेले एक गाणे आहे, ‘मैं ना रहूंगी, तुम ना रहोगे, फिर भी रहेंगी निशानियाँ…’ किती चपखल आहेत या गीताचे बोल.आपण हे जग सोडून गेल्यानंतर आपल्यामागे काय होते, हे कोणालाच ठाऊक नाही.आपल्या मृत्यूनंतर मागे राहणाऱ्या कुटुंबीयांसाठी ही घटना अतिशय दुःखद असते आणि […]
अल्झायमर: आजार की विसरभोळेपणा? | डॉ. राहुल चकोर | Alzheimer’s: Illness or Forgetfulness | Dr. Rahul Chakor
अल्झायमर: आजार की विसरभोळेपणा अल्झायमर डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश हा साध्या विसरभोळेपणाचा प्रकार नक्कीच नाही. वयोमानानुसार येणारा हा आजार असून हा आजार सुरू झाल्यावर पुढील ५ ते १५ वर्षांमध्ये तो बळावत जातो. त्यामुळे अनेक मानसिक कार्यक्षमतांचा ऱ्हास होतो आणि त्याचा शेवट मृत्यूमध्ये होतो. मेंदूच्या व्याधींमध्ये (डिमेन्शिया) हा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा आजार असून त्याचे प्रमाण ५० ते […]
अद्भुत ‘शेवगा’| डॉ.वर्षा जोशी | The wonderful ‘Shevaga’ | Dr. Varsha Joshi
अद्भुत शेवगा साधारणपणे शेवग्याच्या शेंगा आपल्याकडे आमटीत, सांबारात आणि पिठल्यात घातल्या जातात.दक्षिण भारतात आणि कोकणात शेवग्याच्या पाल्याचाही भाजीसाठी उपयोग केला जातो.शेवग्याच्या झाडाचा प्रत्येक भाग हा पोषणमूल्यांनी परिपूर्ण असतो आणि म्हणूनच या झाडाला अद्भुत गुणांनी युक्त झाड असे म्हटले जाते. शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात ‘अ’, ‘क’, ‘ब १’, ‘ब २’, ‘ब ३’, ‘ब ६’ व फोलेट ही जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, […]
सल्ल्यांचे हल्लेः स्वरूप व उपाय | ज्ञानेश्वर मुळे | Advice Attacks: Nature and Remedies | Dnyaneshwar Mulay
सल्ल्यांचे(सल्ला) हल्लेः स्वरूप व उपाय माणसाची काही प्रमुख लक्षणे आहेत. तो सामाजिक प्राणी आहे. त्याचा मेंदू प्रगल्भ आहे. त्याने संस्कृती आणि सभ्यता यांच्याबरोबरच विविध क्षेत्रांत आपले योगदान दिले आहे. माणूस हा पृथ्वीतलावरचा सर्वश्रेष्ठ प्राणी ठरला. इतका की मनुष्य विश्व आणि प्राणीविश्व आपण वेगवेगळे मानायला सुरुवात केली. असो.., याबरोबरच ‘सल्ला’ नावाचे एक पिल्लूही जन्मले. प्राणीविश्वातले सगळे शिक्षण […]