कालनिर्णय दिवाळी अंक २०२५
गुलदस्त्यात ठेवण्यात आलेला १९४६ साली झालेला भारतीय नौदलातील उठाव, मुद्रण क्षेत्रात औंध संस्थानाने निर्माण केलेली ओळख, युनिव्हर्स हा फॉर्म डिझाइन करणारे ॲड्रियन फ्रुटिगर यांच्या कारकिर्दीचा आढावा, मुद्रण तंत्रात नवनवे बदल करणाऱ्या निर्णयसागर प्रेसचा इतिहास, ‘द इकॉनॉमिक्स’ या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध पेपराचे संस्थापक संपादक जेम्स विल्सन यांची कारकिर्द, वन्यप्राणी आणि पाखरांचे गोड रम्य आणि अद्भुत कामविश्व, तमाशा या लोककलेला अजरामर करणाऱ्या कलावंत विठाबाई नारायणगावकर यांचा तमाशासम्राज्ञीपर्यंतचा प्रवास, वाढते स्थलांतरित आणि राजकीय अस्थिरतेमुळे युरोपमध्ये निर्माण झालेली गंभीर परिस्थिती, थरारपट चित्रकर्ता अशी ओळख असलेले दिग्दर्शक डेविड फिंचर यांचा सिनेप्रवास, पत्रकार अनिकेत जोशी यांचा राजकीय पत्रकारितेचा अनुभव, गेल्या दहा वर्षांत मुंबईत सुरू असलेली विकासकामे याआधीच्या ४० वर्षांत का झाली नाही या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा घेतलेला आढावा, तरुण वयात शास्त्रीय संगीत क्षेत्रात आपले नाव गाजवणाऱ्या स्निती मिश्रा यांचा प्रवास, एखादा व्यवसाय उभारताना येणारी आव्हाने,१९६० च्या दशकात भारतीय जाहिरात विश्वात क्रांती घडवणारे तरुण जाहिरातदार केर्सी कात्रक यांच्या आठवणींना उजाळा, दीपक करंजीकर यांनी इराणी बॉसच्या आठवणींना दिलेला उजाळा, कथा, कविता, पाकनिर्णय २०२६ स्पर्धेतील १८ उत्तेजनार्थ पाककृती, व्यंगचित्रे, राशिभविष्य आणि विनोदी किस्से असा वाचनीय मजकूर वाचकांना यंदाच्या कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०२५ मध्ये वाचता येईल.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.




Reviews
There are no reviews yet.