सीड्स अँड नट्स देसी मिठाई
साहित्य: १५ ते २० फणसाच्या आठळ्या, ३ मोठे चमचे कलिंगड बिया, १ मोठा चमचा सूर्यफूल बिया, ३ मोठे चमचे भोपळ्याच्या बिया, १ मोठा चमचा प्रत्येकी काळे व पांढरे तीळ, ३/४ कप खडीसाखरेची पूड,
१ मोठा चमचा प्रत्येकी बदाम, काजू व पिस्ता, १/४ कप दुधाची साय, १/२ कप चुरमुऱ्याची पावडर, दुधात भिजवलेले केशर-वेलची पूड, १/२ कप नासलेले दूध/पनीर.
सजावटीसाठी: काळे-पांढरे तीळ, चारोळ्या.
कृती: फणसाच्या आठळ्या आठ ते दहा शिट्या करून उकडून घ्या. त्याची साले काढून मिक्सरमधून वाटून घ्या. सर्व बिया व तीळ हलके शेकून त्याची जाडसर भरड करा. बदाम-काजूचे तुकडे गरम कढईत परतून घ्या. एका परातीत गाळून घेतलेले नासलेले दूध/पनीर घ्या, मळून मऊ करा. त्यात आठळ्याचा गर, बियांची भरड, साय, बदाम-काजू घालून एकजीव करून घ्या. त्यात खडीसाखरेची पूड आणि बाइंडिंगसाठी चुरमुऱ्याची पावडर घाला. केशर-वेलची घालून कणकेप्रमाणे गोळा बनवून घ्या. एका ट्रेला तूप लावून त्यावर मिश्रण थापून घ्या. त्यावर तीळ, चारोळ्या व इतर ड्रायफ्रूट्सने सजवा. अर्ध्या तासाने सेट झाल्यावर त्याच्या वड्या कापा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
विद्या ताम्हणकर, पुणे
