कोळंबी थालीपीठ
साहित्य: १ उकडलेला बटाटा, ३ मोठे चमचे तांदळाचे पीठ, २० कोळंबी, ५ मशरूम्स, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट, ३ मोठे चमचे ब्रेडक्रम्ब्स, १ मोठा चमचा धणे, १/२ मोठा चमचा जिरे, १ मोठा कांदा, १ मोठा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, १ मोठा चमचा लाल तिखट, १/२ मोठा चमचा हळद, तळणासाठी तेल.
कृती: कोळंबी स्वच्छ धुऊन त्याचे बारीक तुकडे करा. मशरूम स्वच्छ धुऊन त्याचे बारीक तुकडे करा. त्यात कुस्करलेला उकडलेला बटाटा, आले-लसूण पेस्ट, धणे, जिरे, कांदा, गरम मसाला, लाल तिखट, हळद, तांदळाचे पीठ आणि चवीनुसार मीठ घाला. शेवटी यात ब्रेडक्रम्ब्स घाला. साधारण चार मोठे गोळे करा. पोळपाटावर एक ओला रुमाल ठेवून त्यावर थालीपीठ थापावे. गॅसवर तवा तापत ठेवून त्यावर थोडे तेल घालावे. त्यावर थालीपीठ घालून झाकण ठेवा. थोड्या वेळाने झाकण काढून थालीपीठाची दुसरी बाजू परतून घ्या. तयार थालीपीठ सॉसबरोबर सर्व्ह करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
प्रशांत कुळकर्णी, मुंबई
