ब्लॅक मॅजिक केक
साहित्य: २ कप नाचणीचे पीठ, प्रत्येकी १/२ कप दही, दूध, १ कप गूळ पावडर, १/४ कप तेल, प्रत्येकी २ मोठे चमचे काळ्या तिळाची पावडर (तीळ भाजून पावडर करणे), बांबू कोळसा पावडर, प्रत्येकी १ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा.
केकची कृती: बारीक चाळणीने नाचणीचे पीठ, तीळ पावडर, बांबू कोळसा पावडर आणि बेकिंग पावडर चाळून घ्या. बाऊलमध्ये तेल, दही व गूळ पावडर एकत्र करून फेटून घ्या. त्यात चाळलेले पीठ थोडे थोडे घालून फेटून घ्या. त्यात व्हॅनिला इसेन्सचे थेंब घाला. हळूहळू दूध घालून चांगले फेटा. केक टिनला सर्व बाजूने तेल लावून त्यावर नाचणीचे पीठ भुरभुरा. त्यावर तयार बॅटर ओता आणि टॅप करा. १८० डिग्री प्रीहिटेड ओटीजीमध्ये केक ४० मिनिटे बेक करा.
आयसिंगची कृती: एका भांड्यात १/४ कप काजू आणि १ कप पेंड खजूर गरम पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवा. काजू आणि खजुरातील पाणी काढून हाय पॉवर ब्लेंडरमध्ये १/४ कप सोया दूध, १ छोटा चमचा कोको पावडर आणि एक चिमूट मीठ घालून मऊ आणि क्रिमी होईपर्यंत मिसळा. त्यात आवश्यकतेनुसार थोडे थोडे दूध घाला. तयार फ्रॉस्टिंग फ्रीजमध्ये थंड होऊ द्या. थंड फ्रॉस्टिंग पायपिंग बॅगमध्ये भरून केकवर आवडीप्रमाणे आयसिंग करा.
अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
असिफा जमादार, बेळगाव
