टोफू सोम ताम थाई सलाड
साहित्य: पाव तुकडा हिरवी पपई (सोलून लांब काप केलेली), १०० ग्रॅम टोफू, १ लसूण पाकळी, १ थाय बर्ड आय चिली (ही मिरची न मिळाल्यास लाल मिरची घेता येईल.), १ मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे.
ड्रेसिंगचे साहित्य: १ मोठा चमचा ब्राऊन शुगर / साखर, ११/२ मोठा चमचा फिश सॉस, चवीनुसार लिंबाचा रस, १/४ कप लांबट तुकडे केलेली फरसबी, १/४ कप कोथिंबीर, १/४ कप बेसिल पाने.
कृती: ड्रेसिंगसाठी एका लहान वाटीमध्ये बारीक चिरलेला लसूण, मिरची, ब्राऊन शुगर, फिश सॉस आणि लिंबाचा रस एकत्र करा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत हलवा. फरसबी उकळत्या पाण्यात १ ते २ मिनिटे वाफवून घ्या. एका बाऊलमध्ये शेंगदाणे, टोफू, पपई आणि फरसबी घ्या. त्यात ड्रेसिंग घालून अलगद एकजीव करा. त्यावर कोथिंबीर आणि बेसिलची पाने घालून सर्व्ह करा. ही एक पारंपरिक थाई रेसिपी आहे.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
अमिता गद्रे
