Baby Teeth | Child Dentistry | Tooth Decay | Oral Hygiene | Dental Health | Kids Smile | Milk Teeth | Pediatric Dentist | Fluoride Treatment

दुधाचे दातही महत्ताचे ! | डॉ. श्वेता दुधाट | Baby Teeth Problems: What Every Parent Must Know | Dr. Shweta Dudhat

दुधाचे दातही महत्ताचे !

‘‘अगं सूनबाई, कशाला रजा घेऊन रियाला नेतेस दाताच्या डॉञ्चटरकडे ? रियाचे हे दात पडणारच आहेत, दुधाचे दात आहेत ना ते..?’’ थोड्याफार फरकाने असे संवाद आपण घराघरांत ऐकतो. लहान मुलांचे दात दुखत असतील तर कधी पेनकिलर द्या, नाहीतर लवंग दाबून ठेवा किंवा लवंगतेल लावा असे घरगुती उपाय करून आपण वेळ मारून नेतो. याचे कारण म्हणजे लहान मुलांचे दुधाचे दात पडून नवीन येतील ही आपली असणारी धारणा. पण असे करणे योग्य नव्हे. दुधाचे दात पडणार असले तरीही मुलांच्या वाढीमध्ये, मौखिक आरोग्यामध्ये ह्या दातांचा सक्रिय सहभाग असतो. अनेकदा पालकांचा असा समज असतो की, दुधाचे दात पडणारच आहेत तर मग किडलेल्या दुधाच्या दातांवर खर्चिक उपचार कशाला करायचे? मात्र हा समज पूर्णतः चुकीचा आहे. एकतर दात किडल्यामुळे मुलांना त्रास होत असतो. अशा वेळी त्यांच्यावर घरगुती उपायांचे प्रयोग करत राहण्यापेक्षा योग्य ते दंतवैद्यकीय उपचार करायला हवेत. दातदुखीमुळे मुले कमी खातात ज्याचा परिणाम त्यांच्या एकंदर आरोग्यावर होतो. तसेच खूप खराब झाल्यामुळे एखादा दुधाचा दात काढून टाकण्याची वेळ आली तर त्या जागेवर येणारा कायमचा दात जबड्यात कुठेही येण्याची शक्यता असते. म्हणूनच दुधाच्या दातांची योग्य ती काळजी घ्यायला हवी.

दुधाच्या दातांचे महत्त्व :

* मुलांच्या दोन्ही जबड्यांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी.

* मुलांच्या शद्ब्रद उच्चारांमध्ये स्पष्टता आणण्यासाठी.

* समोरच्या दाताने अन्न तोडणे, मागच्या दाढांनी अन्न चावणे ही प्रक्रिया शिकण्यासाठी दुधाच्या दातांचा उपयोग होतो.

दुधाच्या दातांबद्दल :

लहान मुलांच्या तोंडात वयाच्या सहा ते आठ महिन्यांपासून दुधाचे दात यायला सुरुवात होते. पटाशीचे दात (Incisors), सुळे (Canines)आणि दाढा (Molars) असे एकूण २० दात लहान मुलांच्या तोंडात असतात. दोन ते अडीच वर्षांपर्यंत हे दात येत राहतात. ह्यानंतर सहा ते सात वर्षांपर्यंत एक-एक करून हे दुधाचे दात पडून तिथे कायमचे दात येऊ लागतात. ही प्रक्रिया साधारण तेरा ते चौदा वर्षांपर्यंत चालू राहते.

सात ते चौदा ह्या वाढीच्या वयात प्रत्येक मुलाच्या तोंडात काही दात दुधाचे तर काही कायमचे अशी सरमिसळ असते. त्यामुळे अनेकदा नेमका दुधाचा दात कोणता आणि कायमचा दात कोणता असा संभ्रम पालक आणि मूल ह्या दोघांनाही होतो.

कायमचे दात येण्याची प्रक्रियाः

प्रत्येक मुलाच्या तोंडात छोटे-छोटे दात अगदी एका रांगेत बसवल्यासारखे दिसतात. मूल जसजसे मोठे होते तसे त्याच्या दातांमध्ये फटी पडायला लागतात. वयाच्या साडेतीन ते चार वर्षांपासून ह्या फटी वाढायला लागतात. ह्यावेळी शरीरातील सर्वच हाडांची उंची आणि रुंदी बदलत असते. चेहऱ्याच्या, जबड्याच्या हाडांमध्येही बदल घडत असतात. तोंडात असलेल्या २० दुधाच्या दातांच्या बरोबर खाली, कायमच्या दातांची वाढ चालू झालेली असते. हा नवीन दात, जुन्या क्वहणजे दुधाच्या दाताला मुळाच्या बाजूने ढकलायला सुरुवात करतो.त्यामुळे दुधाच्या दाताची मुळे कमकुवत होऊ लागतात. आता हे दात हलायला सुरुवात होते. ही प्रक्रिया काही आठवडे चालू असते, अन् एक दिवस दुधाच्या दाताचा अर्धवट झिजलेला तुकडा पडतो. त्याचवेळी कायमच्या दाताची पांढरी कणी हिरडीतून डोकावू लागते. ही सर्व नैसर्गिक प्रक्रिया आहे.

काही कारणाने या प्रक्रियेत अडथळे आले तर खालील समस्या उद्भवतात :

  • दुधाचे व कायमचे दोन्ही दात तोंडात दिसणे. पालक ह्यालाच डबल दात क्वहणतात.
  • दुधाचे दात पडायला होणारा विलंब.
  • कायमचे दात भलत्याच ठिकाणी येणे किंवा जबड्याच्या हाडात अडकून बसणे वगैरे.

नुकतीच चालायला आणि धावायला लागणारी मुले हमखास धडपडतात, तोंडावर आपटतात आणि त्यांच्या समोरच्या दातांना इजा होते, ते तुटतात. काळे होतात. रात्रीच्या वेळी तोंडात दुधाची बाटली घेऊन झोपणाऱ्या मुलांमध्ये तर हमखास समोरच्या दातांना कीड लागलेली दिसते.

दात किडण्याचे कारण:

जेवणानंतर किंवा काहीही खाल्ल्यावर खळखळून चूळ न भरल्यास अन्नकण दातांच्या पृष्ठभागावर व फटींमध्ये अडकून राहतात. तोंडात असलेल्या थुंकीमधील जिवाणू-विषाणू ह्या अन्नकणांवर प्रक्रिया करायला सुरुवात करतात. थोड्याच दिवसांमध्ये हे दात काळे पडायला सुरुवात होते. ह्या प्राथमिक स्थितीत ‘दुखणे’ नसल्यामुळे मुलांच्या तसेच पालकांच्या नजरेतूनही सुटते. काही दिवसांनी दात दुखणे, सूज येणे ह्या तक्रारी सुरू होतात.

ह्या बाबींकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे गरजेचे असते; अन्यथा पुढील समस्या उद्भवतात :

* दुखऱ्या दातांमुळे मुलांच्या आहारावर परिणाम होतो. मुले अन्न चावून खाण्याचा कंटाळा करतात, ज्यामुळे त्यांची वाढ खुंटते.

* किडलेल्या दातामध्ये पू होतो, ज्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते. पू पोटात जाऊन पोट बिघडते.

* दुखणाऱ्या दातांमुळे मुले दात घासण्यास (ब्रश करण्यास) चालढकल करतात, ज्यामुळे दातांतील कीड आणखी वाढते.

* किडञ्चया आणि तुटलेल्या दातांमध्ये अन्नकण अडकून हिरड्यादेखील खराब होतात.

* तुटलेल्या, काळसर दिसणाऱ्या समोरच्या दातांमुळे मुलांचा आत्म-विश्वास कमी होतो. अशा वेळी कोणतीही सबब न सांगता आपल्या मुलाला त्वरित दातांच्या डॉञ्चटरकडे न्यायला हवे.

मुलांमध्ये दिसणाऱ्या दातांच्या या समस्यांवर पुढील उपचार केले जातातः

* वरवरची कीड असेल तर ती साफ करून फिलिंग (सिमेंट अथवा तत्सम पदार्थांनी) केले जाते.

* दाताला कीड लागली असल्यास फ्लोराइड वॉर्निश केले जाते. क्रलोराइड वॉर्निशचा एक थर दुधाच्या तसेच कायमच्या दातांना मजबूत बनवायला मदत करतो. यामुळे दातांवरील इनॅमलचा भाग टणक होऊन कीड लागायचे प्रमाण मंदावते. दर तीन महिन्यातून एकदा, क्वहणजे वर्षातून तीन-चार वेळा हे वॉर्निश दातांवर लावणे फायद्याचे असते.

* कीड खोलवर गेली असेल तर रूट कॅनल करून दात वाचवता येतो.

* जास्त खराब झालेल्या दाताला काढून टाकायचा निर्णय घ्यावा लागतो.

* अवेळी काढलेल्या दातामुळे नवीन येणाऱ्या दातांची साखळी विस्कळीत होऊ नये क्वहणून त्याठिकाणी Space Maintainer लावावे लागते.

काही वर्षांपर्यंत हे सगळे उपचार आपल्या फॅमिली डेंटिस्टकडे व्हायचे, पण आजच्या स्पेशालिस्टच्या जमान्यात ‘बालदंतरोग चिकित्सक’ क्वहणजेच pediatric dentist कडे जाणे फायद्याचे ठरते. त्यांच्याकडे असलेली अद्ययावत उपकरणे, नवनवीन उपचार पद्धती मुलांच्या मनातील भीती काढून खेळीमेळीने केलेले उपचार मुलांना आणि पालकांनाही कमी त्रासदायक ठरतात.

लहान मुलांना भूल देऊन दातांवर उपचार करणे हा प्रकार हल्ली कमीच दिसतो. ह्यातील संभाव्य धोके लक्षात घेता पर्यायी उपचारपद्धती अधिक प्रमाणात वापरल्या जातात. उदाहरणार्थ Laughing gas किंवा N2o Nitrous Oxide किंवा तत्सम Sedative औषध. उपचाराच्या आधी अर्धा तास मुलांनी ही औषधे घेतली की त्यांची हालचाल मंदावते. त्यांचा आक्रमकपणा, आक्रस्ताळेपणा कमी होतो. अर्धवट गुंगीत असताना मुले टीव्ही, मोबाईल पाहत राहतात आणि डॉञ्चटरांना त्यांचे काम सुलभपणे, यशस्वीरीत्या करता येते.

Laughing gas चा मास्क तोंडावर लावल्यावरही मुले शांत होतात आणि डॉञ्चटरांना सहकार्य करतात. एकाच वेळी २-४ दातांचे काम आटोपता येते आणि वेळेचीही बचत होते.

हा एवढा मनःस्ताप सहन करण्यापेक्षा रोजच्या रोज दोन वेळा आपले दात स्वच्छ करणे, त्यांची नीट निगा राखणे, अधिक सोपे आहे.त्याखेरीज आणखीही काही खबरदारी घेणे गरजेचे असते. काही गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आणि काही गोष्टी आवर्जून करायच्या जसे,

आवर्जून करायच्या गोष्टी:

* सकस, पौष्टिक आहार घ्यावा.

* काही खाल्ल्यावर खळखळून चूळ भरावी. अन्यथा नुसता ब्रश (पेस्ट न लावता) केला तरी ते फायदेशीर ठरते.

* ब्रश हा नेहमी soft असावा आणि ब्रश करण्याची क्रिया हळुवारपणे, योग्य पद्धतीने करावी. (Round and round, up and down)

* मैदानी खेळात भाग घेणाऱ्या मुलांनी sport guard वापरावे.

* जिथे शञ्चय असेल तिथे दाताचे लसीकरण (Dental Vaccine) करून घ्यावे. ज्यामध्ये Fluoride Mouthwash, Fluoride Varnish, Pit & Fissure Sealant ह्यांचा समावेश असतो.

कटाक्षाने टाळायच्या गोष्टी :

* दोन जेवणांच्यामध्ये चिकट, गोड तसेच पिष्टमय पदार्थ टाळावेत.

*  दातांमध्ये अडकलेले अन्न-
पदार्थ काढण्यासाठी टूथपिक, पिन, तत्सम गोष्टींचा वापर करू नये.

* अंगठा किंवा बोटे चोखण्याच्या सवयीवर वेळीच निर्बंध घालावा.

* झोपायच्या आधी ब्रश न करता झोपू नये.

* दातदुखीवर घरगुती उपाय टाळावेत.

निसर्गाने आपल्याला दिलेल्या दातांची नीट काळजी घेऊया. नाहीतर हा दंतप्रपंच फोल ठरेल.

आनंदी राहा

हसत राहा

हसवत राहा.

टूथपेस्टमध्ये क्रलोराइड असणे आवश्यक आहे. तीन वर्षांखालील मुलांना १००० ppm fl. असलेली पेस्ट आणि त्यापेक्षा मोठ्यांसाठी १३५०-१५०० ppm fl. क्रलोराइड असणे फायद्याचे ठरते.

दात घासण्यासाठी शेंगदाण्याच्या आकाराची टूथपेस्ट मोठ्या व्यक्तींना पुरेशी असते. तर लहान मुलांसाठी अर्धा शेंगदाणाएवढी टूथपेस्ट पुरेशी ठरते.

ब्रश केल्यावर मुले नीट चूळ भरतात की नाही, ह्याकडे पालकांनी लक्ष द्यायला हवे. तसेच मुलांनी रात्री पालकांच्या उपस्थितीत ब्रश करावे.

लहान मुलांनी बेबी व ज्युनिअर ब्रश वापरणे योग्य असते. सहा वर्षांपर्यंतच्या मुलांनी बेबी ब्रश वापरून (पालकांच्या मदतीने) दात साफ करावेत. तोंडाच्या आकारापेक्षा मोठा ब्रश वापरू नये. ब्रश नेहमीच सॉक्रट असावा.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. श्वेता दुधाट

(लेखिका नामांकित व अनुभवी एण्डोडॉण्टिस्ट व कॉस्मेटिक डेंटल सर्जन आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.