रक्षाबंधन

रक्षाबंधन (राखीपौर्णिमा) : श्रावण पौर्णिमेला नारळीपौर्णिमेच्या उत्सवाएवढेच आणखी एका सणामुळे महत्त्व आहे. ते म्हणजे रक्षाबंधन, राखीपौर्णिमा । रक्षाबंधनासाठी सूर्योदयापासून सहा घटिकांहून अधिक व्यापिनी आणि भद्रारहित अशी श्रावण पौर्णिमा असावी असा शास्त्रार्थ आहे. पौर्णिमेची वृद्धी असेल म्हणजे दोन दिवस पौर्णिमा असेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्यावेळी सहा घटिकांपेक्षा कमी वेळ ही पौर्णिमा असेल आणि आदल्या दिवशी भद्रारहित […]

योग जीवनाचे सार

पतंजली ऋषींनी प्राचीन काळात का बरे योगासूत्रे लिहिली असतील? तेव्हा तर आजच्या सारखे ताणतणाव नव्हते, चिंता-घोर लागून माणसांची मने पोखरली गेली नव्हती. लोकसंख्येचा स्फोट झालेला नव्हता, माणूस आत्महत्या करीत नव्हता, रस्त्यांवर वाहनांचे अपघात होत नव्हते, माणूस पशू बनला नव्हता, निसर्गाचा ऱ्हास सुरु झाला नव्हता आणि प्रदूषण तर नव्हतेच नव्हते. मग का पतंजली ऋषींनी सखोल योगाभ्यास […]

झूलन यात्रा

उत्तर प्रदेशात झूलन यात्रा हा उत्सव म्हणून साजरा होतो. हा उत्सव श्रावण शुक्ल दशमी ते पौर्णिमा असा दीर्घकाळ चालतो. कशी साजरी केली जाते झूलन यात्रा: ह्यावेळी राधा-कृष्णांच्या मूर्ती झोपाळ्यावर ठेवून त्याला झोके दिले जातात. त्यावेळी जमलेल्या स्त्रिया एकत्रितपणे कृष्णगीते म्हणतात. ह्या निमित्ताने श्रीमंत मंडळींच्या घरी कृष्णचरित्रपर नाट्यप्रसंगही आयोजिले जातात. सद्यःस्थिती : आपल्या कौतुकाच्या देवांचे कोडकौतुक […]

दूर्वाष्टमी व्रत

श्रावण शुक्ल अष्टमी ह्या दिवशी करावयाचे दूर्वांशी संबंधित असे हे दूर्वाष्टमी व्रत आहे. ह्या व्रतामध्ये दूर्वांना विशेष महत्त्व दिलेले आहे. व्रतकर्त्याने दूर्वा, गौरी, शिव आणि गणपती ह्यांची पूजा करावी. पूजा झाल्यावर आठ गाठी मारलेला दोरा व्रतकर्त्या स्त्रीने आपल्या डाव्या हाताच्या मनगटाला बांधावा. शेवटी ‘त्वं दूर्वेS मृतनामासि पूजितासि सुरासुरै : । सौभाग्यसनतिं दत्वा सर्वकार्यकारी भव ।। […]

दूर्वागणपती व कपर्दी विनायक व्रत

दूर्वागणपती व कपर्दी विनायक व्रत दूर्वागणपती व्रत: दूर्वागणपती व्रतासाठी श्रावणातील शुक्ल पक्षाची चतुर्थी माध्यान्हव्यापिनी असणे आवश्यक असते. तशी ती नसल्यास जर दोन्ही दिवशी असेल तर पहिल्या दिवशीची ‘पूर्वविद्धा ‘ चतुर्थी ह्या व्रतासाठी ग्राह्य मानली जाते. व्रतकर्त्याने शुचिर्भूत होऊन सर्वतोभद्र मंडल रेखाटावे. नंतर त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्णपात्रात दूर्वा पसरवून त्या दूर्वांवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी. […]

श्रावण | Shravan | Shravan Month | Shravan 2020

श्रावण महिना – श्रावणमास

ह्या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा तिच्या आधी किंवा नंतर श्रवण नक्षत्र असते, म्हणून ह्याला ‘श्रावण’ ह्या नावाने ओळखले जाते. श्रावण हा सणांच्या व्रत-वैकल्यांच्या दृष्टीने चातुर्मासातील सर्वात महत्त्वाचा महिना म्हणावा लागेल. ह्याचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे श्रावणातील प्रत्येक दिवशी तसेच प्रत्येक तिथीला कोणते ना कोणते तरी व्रत केले जाते. इतर महिन्यातील व्रत-वैकल्ये ही बहुतेक तिथीनुसार आलेली आहेत. […]

आदित्य पूजन

आदित्य पूजन : श्रावणातील  प्रत्येक रविवारी आदित्याची पूजा करुन त्याला खिरीचा नैवेद्य दाखवावा. केवळ श्रावणातील रविवारीच नव्हे, तर वर्षभरातील सर्व रविवारी सूर्यपूजा करावी. नैवेद्य दाखविणे शक्य नसेल तर हरकत नाही. परंतु कुंकुम, अक्षता, फुले वाहून अर्घ्य द्यावे. तेही शक्य नसेल तर नुसता भक्तिपूर्वक नमस्कार करावा. दुपारी बारा वाजण्याच्या आधी गायत्रीमंत्राचा यथाशक्ती जप करावा.   श्रावणी […]

ऋतुचक्र व आरोग्य

” स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य व्याधि परिमोक्षः । ” या तत्त्वावर आधारलेला आयुर्वेद हा रोगपरिमार्जनार्थ चिकित्सा सांगताना रोग होऊच नयेत यासाठी शरीर-मनाच्या आरोग्यरक्षणासाठी दिनचर्या, ऋतुचर्या आदी नियमांचे वर्णन करून जातो. आज समाजात वेगाने पसरत जाणाऱ्या रोगांच्या पार्श्वभूमीवर ऋतुचर्या(ऋतुचक्र व आरोग्य) पालनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ऋतुचर्या म्हणजे ऋतूनुसार पाळावयाचे आहार-विहारविषयक विशिष्ट नियम. ऋतूनुसार बदलणाऱ्या हवामानामुळे सृष्टीतील […]

हिरव्या पालेभाज्यांचे आहारातील महत्त्व

हिरव्या पालेभाज्या – आरोग्य सुधारण्यासाठी वापरता येऊ शकणाऱ्या पदार्थांमध्ये अग्रगण्य अशा हिरव्या पालेभाज्या आहेत. रोजच्या आहारामध्ये वापरता येऊ शकणाऱ्या व भरपूर जीवनसत्त्वांचा स्त्रोत म्हणजे हिरव्या पालेभाज्या. या पालेभाज्या आबालवृद्धांसाठी हितकारक व आरोग्यवर्धक ठरतात. सर्वसाधारणपणे हिरव्या पालेभाज्या या कमी कॅलरीज असलेल्या, पण त्यांच्यामध्ये प्रोटीन, तंतुमय पदार्थ, ‘ क ‘ जीवनसत्त्व, फोलिक अॅसिड, कॅल्शियम इ. जीवनसत्त्वे मुबलक […]

Homemade Oreo Cookies

To make Homemade Oreo cookies (To make 16 cookies) – Ingredients: For the cookies 90 gms whole wheat flour (chakki atta) 45 gms cocoa powder 100 gms butter 125 gms raw sugar 1 Egg For The Frosting: 100 gms cashew nuts ½ -1tsp sugar 1 tsp vegetable or coconut oil. Method for the frosting: Grind […]