Today’s Date: January 30, 2026

Sign: Cancer

Lucky Number:

Lucky Colour: आकाशी

Daily Horoscope

आपल्या विचारात स्पष्टता ठेवा.

Weekly Horoscope (Jan 26 – Feb 1)

चंद्र प्रथम, चंद्र-केतु द्वितीय, चंद्र पराक्रम, रवि-मंगळ-बुध-शुक्र-प्लुटो सप्तम, बुध-राहू अष्टम, शनि-नेपच्युन नवम, हर्षल लाभ, चंद्र-गुरू व्ययस्थानी असे ग्रहमान असतील. नि:संकोच वृत्ती ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नैतिक आचरण चांगले ठेवा. तुम्ही महत्वाकांक्षी बनाल. थोर व वयोवृध्द व्यक्तींचा अपमान होऊ देऊ नका. मित्रांच्यावर तुमच्या विचारांचा प्रभाव राहील. व्यवहाराच्या कायदेशीर बाबीकडे लक्ष द्या. आर्थिक स्थिती बलवान करण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांच्या प्रगतीने उदास न होता स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या. व्यसनाच्या आहारी न जाता कामाकडे लक्ष द्या. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. नको त्या प्रलोभनांना व आश्वासांना भुलू नका.