लेकुरवाळ्या मिश्र भाज्या जानेवारी महिन्यातली माझ्यासाठी पर्वणी म्हणजे आवडत्या मिश्र भाज्या खायला मिळणे. त्यातली एक म्हणजे भोगीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर केली जाणारी वांगे, पापड्या, गाजर, ओले हरभरे, मटार, पावटे आणि बेताचा तिखट आणि मसाला घालून केलेली लेकुरवाळी‘भोगीची भाजी’. खानदेशात त्यात चाकवत आणि मेथी या पालेभाज्याही घालतात. विदर्भात त्यात बारकी बारकी बोरेही घालतात. ती भाजी आणि […]
