Blog

बटाटयाची शेव

साहित्य : बटाटे, हिरव्या मिरच्या वाटलेल्या, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, तळण्यासाठी तेल, खाण्याचा पिवळा रंग. कृती : बटाटे स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये वाफवून गार करा. पुरणयंत्रातून वाटून घ्या. चवीनुसार हिरव्या मिरच्या वाटलेल्या, मिठ, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, खाण्याचा पिवळा रंग मिसळा, खूप मळा. शेवपात्रातून शेव पाडा. तळा. टिप : ही शेव फारच कुरकुरीत व चवदार होते.

रव्याची खीर

रव्याची खीर

साहित्य : बारीक रवा पाव वाटी, तूप १ चमचा, दूध २ वाटया पाणी अर्धी वाटी साखर ४ चमचे स्वादाकरता जायफळ-वेलची पूड केशर सुका मेवा मीठ कृती :  तुपात रवा मंद आचेवर भाजा. थोडासा गुलाबी रंग आला की त्यात मीठ व पाणी घालून शिजू द्या. त्यात साखर, सुका मेवा, जायफळ-वेलची पूड घाला. केशर घाला. यानंतर दूध […]

Nag panchami | Nag Panchami pooja

नागपंचमी

गणपती हा शंकराचा पुत्र. शंकरापासून गणपतीने दोन गोष्टी उचलल्या. पहिला भालप्रदेशावरील चंद्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागांबद्दल प्रेम, आस्था. शंकराप्रमाणेच गणपतीला भालचंद्र असे म्हणतात. गणपतीच्या सुप्रसिद्ध बारा नावांत तिसरे नाव भालचंद्र असे आहे. गणपतीने नाग हा आभूषण म्हणून धरण केला आहे. तर शंकराने हलाहल प्राशन केल्यानंतर त्याच्या कंठाचा म्हणजे गळयाचा दाह होऊ लागला. त्या दाहाने […]

श्रावणी बुधवार : बुध- बृहस्पती व्रत

श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतीची म्हणजे गुरुची पूजा केली जाते ह्या व्रतासाठी बुध आणि गुरुचे चित्र घेऊन किंवा बालस्ती रेखाटून त्याची पूजा करून शेवटी दही-भाताचा नैवेद्य दाखवावा. हे व्रत सात वर्षे केले जाते. ह्या व्रताची कथा अशी- एका राजाला सात सुना होत्या. त्याच्या दारात रोज एक मामा आणि भाचा भिक्षेसाठी येत. पण त्यापैकी […]

mangala gowri vratham story | mangala gowri vratha katha | mangalagaur pooja | mangala gowri festival

श्रावणी मंगळवार व मंगळागौरीची कथा

श्रावणी मंगळवार : श्रावणातील प्रत्येक श्रावणी मंगळवारी परिचितांपैकी कोणाकडे तरी मंगळागौर असतेच. नुकत्याच लग्न झालेल्या मुलीने हे व्रत करावयाचे असते. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी माहेरी आणि नंतरची चार किंवा सहा वर्षे सासरी मंगळागौर जागविली जाते. सोयीनुसार पाच किंवा सात वर्षे हे व्रत केले जाते. ह्या व्रतात सोळा प्रकारची पाने आणि सोळा दिवे पूजेसाठी लागतात. शिवाय पाटा-वरवंटा […]

श्रावणमास व शिवमुष्टी व्रत : श्रावणी सोमवार

१. शिवमुष्टी व्रत (शिवामूठ) : लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ,तीळ,मूग,जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम […]

Deep Pujan | Shubham Karoti Kalyanam | Deep Pooja

दीपपूजा

अमाव्रत : आषाढ महिन्याच्या अमावास्येला ‘हरिता’ किंवा ‘हरियाली अमा’ असे संबोधतात. व्रतकर्त्याने एकांत असलेल्या पाणथळ जागी जाऊन स्नान करावे. ब्राह्मणाला भोजन घालावे असे दोन प्रमुख विधी ह्या व्रतात सांगितले आहेत. ह्या व्रतकार्यामुळे ‘पितर’ प्रसन्न होतात- हेच त्याचे फल आहे. (ह्या दिवशी काही देवळांमध्ये पूजा बाधली जाते. तसेच स्त्रिया झोपाळ्यावर बसून आनंदाने गाणी म्हणतात.) सद्यःस्थिती : […]

लोकमान्य

गुरु म्हणजे मार्गदर्शक. कुठे जावे, काय करावे, याचा नीट उलगडा होण्यासाठी जो योग्य मार्ग दाखवितो तो गुरु. म्हणूनच लोकमान्य टिळकांना राष्ट्रगुरू असे यथार्थतेने म्हणता येते. पारतंत्र्याच्या काळात लोकमान्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच!’ असे तेजस्वी उद्गार काढले आणि या टिळकांच्या उद्गारांना मंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. राष्ट्रगुरु टिळकांनी भारतीयांना हा जणू […]

सावता माळी आणि बालरुपी पांडुरंग

माळियाचे वंशी, सांवता जन्मला । पावन तो केला । वंश त्याचा ॥ त्याजसवें हरी, खुरपूं लागे अंगी । धांवूनी त्याच्यामागें । काम करी ॥ पीतांबर कास, खोवोनी माघारी । सर्व काम करी । निज अंगे ॥ एका जनार्दनीं, सांवता तो धन्य । तयाचें महिमान । न कळे कांही ॥ सावता माळी हे ज्ञानदेव, नामदेव यांचे […]

संत नामदेव व ग्रंथसाहेब

शिंपियाचे कुळीं जन्म माझा झाला । परि हेतु गुंतला सदाशिवीं ॥ रात्रिमाजि शिवीं दिवसामाजि शिवीं । आराणूक जीवीं नाहीं माझ्या ॥ सुई आणि सातुळी कात्री गज दोरा । मांडिला पसारा सदाशिवीं ॥ नामा म्हणे शीवीं विठोबाचे अंगीं । त्याचेनि मी जगीं धन्य झालों ॥ संत नामदेवांचा जन्म शिंप्याच्या घरात झाला आणि आता तर नामदेव शिंपी […]