नट्स अँड सीड्स खजूर रोल
साहित्य: १/२ किलो काळा खजूर, प्रत्येकी २ चमचे बदाम, काजू, पिस्ता, शेंगदाणे, बेदाणे, प्रत्येकी २ चमचे सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया, मगज बिया, जवस, तीळ, खसखस, चमचाभर साजूक तूप.
कृती: बदाम, काजू, पिस्ता, शेंगदाणे, बेदाणे मंद आचेवर भाजून घ्या. शेंगदाण्याची साले काढून सर्व जिन्नस एकत्र जाडसर भरडा. सूर्यफूल बिया, भोपळ्याच्या बिया, मगज, जवस, तीळ वेगवेगळे भाजून घ्या. कढईत तूप गरम करून त्यात बिया काढलेले खजूर घालून पाच मिनिटे मंद आचेवर परतून घ्या. त्यामध्ये सर्व बिया आणि सुका मेवा घाला. सर्व जिन्नस चांगले एकजीव करून त्याचा गोळा तयार करा. हा गोळा तूप लावलेल्या ताटात काढून घ्या. हाताने रोल बनवा, रोल तयार झाल्यावर त्याला सर्व बाजूंनी खसखस लावा. रोल थंड झाल्यावर सुरीने गोल काप कापून घ्या.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कोमल कोठारी, सिन्नर