berry cake | nachni coffee

बेरीचा कॉफी केक व नाचणीची कॉफी | मुग्धा भावे, नागपूर | Berry Coffee Cake and Nachni Coffee | Mugdha Bhave, Nagpur

बेरीचा कॉफी केक व नाचणीची कॉफी

साहित्य : /वाटी तुपाची बेरी (पांढरी), /वाटी नाचणी (नाचणी धुऊन, निथळून, खमंग भाजून घ्या. त्यानंतर त्याची पावडर करा.), १/वाटी बारीक रवा, /वाटी साखर, १/वाटी दही, अर्धा कप दूध, १ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स, /छोटा चमचा खाण्याचा सोडा, /वाटी गुळाचा पाक, १ चमचा नेसकॉफी, सजावटीसाठी बदामाचे काप.

कृती : तुपाची बेरी, रवा, नाचणीची भाजलेली पावडर, साखर, दही एकजीव करून दोन तास भिजत ठेवा. हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घ्या जेणेकरून एकजीव होईल. त्यात व्हॅनिला इसेन्स घाला. प्रेशर पॅनला तूप लावून त्यावर डबल बटरपेपर ठेवा. सपाट तवा प्रीहिट करून घ्या. मिक्सरमधील मिश्रण वाडग्यात काढा. त्यात एक चमचा नेसकॉफी घालून एकजीव करा. या मिश्रणात सोडा घाला आणि अर्धा कप गरम दूध घाला. सर्व मिश्रण हलक्या हाताने ढवळा व ताबडतोब पॅनमध्ये घाला. प्रीहिट केलेल्या तव्यावर हा पॅन ठेवून झाकण लावा. दोन-तीन मिनिटे हाय फ्लेमवर ठेवून पंधरा-वीस मिनिटे बेक करा. थोडा थंड झाल्यावर ताटात पालथा करून पुन्हा सरळ करा. त्यावर गुळाचा पाक पसरवा आणि बदामाच्या पातळ कापांनी सजावट करा.

नाचणीच्या कॉफीसाठी साहित्य व कृती: १ चमचा नाचणी पावडर,/चमचा इंस्टंट कॉफी, १/कप दुधात घालून त्यात १ चमचा गुळाचा पाक घालून कॉफी तयार करा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


मुग्धा भावे, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.