fbpx
Salad Recipe | Winter Salad

स्ट्रॉबेरी, पनीर आणि अक्रोडचे सॅलड | शेफ उमेश तांबे | Strawberry, Panner and Walnut Salad | Chef Umesh Tambe

स्ट्रॉबेरी, पनीर आणि अक्रोडचे सॅलड

साहित्य: १२५ ग्रॅम अक्रोड, २०० ग्रॅम मिक्स सॅलड ग्रीन्स, २५० ग्रॅम पनीर, १५० ग्रॅम स्ट्रॉबेरी, सॅलड ड्रेसिंग, कांद्याची २ पाती, २ छोटे चमचे स्पायसी मस्टर्ड पेस्ट, २ मोठे चमचे स्ट्रॉबेरी व्हिनेगर, १ मोठा चमचा बॉलसॅमिक (Balsamic) व्हिनेगर, २ मोठे चमचे मध, २ मोठे चमचे ताजा संत्र्याचा रस, १२५ मिली एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल.

कृती: प्रथम ओव्हन १८० अंश सेल्सिअसला प्रीहीट करून घ्या.बेकिंग शीटवर अक्रोड ठेवून ते कुरकुरीत होईपर्यंत ५ मिनिटांकरिता बेक करून तुकडे करा.

ड्रेसिंग तयार करण्यासाठीः कांद्याची पात बारीक चिरून घ्या.एका बाऊलमध्ये कांद्याची पात, स्पायसी मस्टर्ड पेस्ट, स्ट्रॉबेरी व्हिनेगर आणि बॉलसॅमिक  व्हिनेगर एकत्र करून घ्या.त्यात मध, संत्र्याचा रस व ऑलिव्ह ऑइल घालून सॅलड एकत्र करून घ्या.पनीरचे तुकडे करून घ्या, स्ट्रॉबेरी नीट धुऊन एका स्ट्रॉबेरीचे दोन असे प्रत्येकी काप करा.एका सॅलड बाऊलमध्ये मिक्स सॅलड ग्रीन्स व अर्धे ड्रेसिंग एकत्र करून घ्या.त्यात पनीर, स्ट्रॉबेरी व अक्रोड घाला.त्यावर उरलेले ड्रेसिंग घालून एकत्र करून घ्या व सॅलड सर्व्ह करा.


शेफ उमेश तांबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.