ज्वारी लवाश विथ नट्स अँड सीड्स हुमूस
लवाश साहित्य: प्रत्येकी १ वाटी ज्वारीचे पीठ, पाणी, प्रत्येकी १ छोटा चमचा तेल, काळे तीळ, चिली फ्लेक्स, चिमूटभर हळद, १/४ छोटा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ.
कृती: भांड्यात पाणी गरम करून त्यात ज्वारीचे पीठ वगळून इतर सर्व साहित्य घाला. पाणी उकळल्यावर
ज्वारीचे पीठ घालून उकड करा. उकड चांगली मळून पोळी लाटा. त्याच्या पट्ट्या कापून कुरकुरीत तळून घ्या.
हुमूस साहित्य: प्रत्येकी १ वाटी मिक्स सीड्स (सूर्यफूल, खरबूज, टरबूज, भोपळा), ड्रायफ्रूट्स (अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता), ३-४ लसूण पाकळ्या, २ मोठे चमचे ताहिनी पेस्ट, लिंबाचा रस, ५ मोठे चमचे ऑलिव्ह ऑइल, प्रत्येकी १/२ छोटा चमचा जिरे पावडर, चिली फ्लेक्स, ३-४ बर्फाचे तुकडे, चवीनुसार मीठ,
कृती: बिया व ड्रायफ्रूट्स गरम पाण्यात तासभर भिजवून ठेवा. पाणी निथळून त्या सगळ्यांची पेस्ट करा. त्यात लसूण, ताहिनी पेस्ट, ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, मीठ, जिरे पावडर, चिली फ्लेक्स घाला. बर्फाचे खडे टाकून पेस्ट करा. सजावटीसाठी चिली फ्लेक्स व ऑलिव्ह ऑइल टाकून सजवा. ज्वारी लवाशबरोबर हुमूस खायला द्या.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
नीता पाठारे, मुंबई
