Thyroid Disease | Thyroid Disorder

थायरॉइडचा विकार समजून घेताना… | डॉ. विनायक सावर्डेकर | Understanding thyroid disorders | Dr. Vinayak Savardekar

थायरॉइडचा विकार समजून घेताना...

थायरॉइड ही लहान, फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आपल्या मानेच्या पुढील भागात स्थित असते. आकाराने लहान असली तरी थायरॉइड हीग्रंथी शरीरातील अनेक आवश्यक कार्यांचे नियमन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, जसे की चयापचय, ऊर्जा पातळी आणि अगदीमनःस्थितीदेखील. जेव्हा थायरॉइड ही ग्रंथी योग्य प्रकारे कार्य करत नाही, तेव्हा थायरॉइड विकार म्हणून उद्भवू शकतो.

थायरॉइड विकार म्हणजे काय?

जेव्हा थायरॉइड ग्रंथी खूप जास्त किंवा खूप कमी थायरॉइड संप्रेरक(हार्मोन्स, T3,T4) तयार करते तेव्हा थायरॉइड विकार उद्भवतो. हे(थायरॉइड) संप्रेरक (हार्मोन्स) संदेशवाहकांसारखे असतात, जे आपल्या शरीरातील क्रियेला किती जलद किंवा संथ चालावे हे सांगत असतात.जेव्हा थायरॉइड असंतुलित असतो, तेव्हा आपल्या वजनापासून ते हृदयाच्या गतीपर्यंत आणि ऊर्जा पातळीपासून ते मनःस्थितीपर्यंत सर्व क्रियांवरत्याचा परिणाम होऊ शकतो.

थायरॉइड या विकाराची एक समस्या ही आहे की, हा आजार झालेल्या एक तृतीयांश व्यक्तींना हा आजार झाल्याची कल्पनाच नसते. हाआजार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये दहा पट अधिक प्रमाणात आढळतो. गरोदर स्त्रियांमध्ये आणि प्रसूतीनंतर पहिल्या तीन महिन्यांच्याकालावधीत थायरॉइडची समस्या ४४.३ टक्के स्त्रियांमध्ये आढळते.

थायरॉइड विकाराचे तीन मुख्य प्रकार

. हायपोथायरॉइडिझम (अल्पक्रियाशील थायरॉइड:

शरीरातील संप्रेरक T3  आणि T4 याची मात्रा कमी होते. तर TSH ची मात्रा वाढते तेव्हा हायपोथायरॉइडिझमची स्थिती उद्भवते.हायपोथायरॉइडिझममध्ये थायरॉइड पुरेशा प्रमाणात संप्रेरक तयार करत नाही. त्यामुळे शरीरातील क्रिया मंदावतात.

लक्षणे : थकवा, वजनवाढ, चेहरा व पायांना सूज येणे, सकाळी उठल्यावर आळस येणे, चक्कर येणे, जास्त झोप येणे अथवा जास्त थंडीवाजणे, उष्णतेतही थंड वाटणे, कोरडी त्वचा, केस गळणे आणि बद्धकोष्ठता ही या आजाराची सामान्य लक्षणे आहेत. तर काही रुग्णांमध्येउदासीनता किंवा एकाग्रता साधण्यास अडचण ही लक्षणेही दिसून येतात.

कारणे : या आजाराचे सर्वसामान्य कारण हाशिमोटो हा स्वयंप्रतिकार (ऑटोइम्यून) स्थितीचा आजार आहे, ज्यात शरीर थायरॉइड ग्रंथीवरहल्ला करते. इतर कारणांमध्ये आयोडीनची कमतरता, काही औषधे आणि हायपरथायरॉइडिझमसाठी पूर्वी केलेले उपचार यांचा समावेश होतो.

जन्मजात  हायपोथायरॉइडिझमः हा जन्माच्या वेळी आढळणारा सर्वसामान्य थायरॉइड विकार आहे. मेंदूच्या विकास आणि वाढीसाठीअत्यावश्यक असणारे थॉयरॉइड संप्रेरक थायरॉइडची ग्रंथी पुरेशा प्रमाणात तयार करत नाही, तेव्हा हा आजार उद्भवतो. नवजात बाळांमध्ये ही समस्यातेव्हा निर्माण होते जेव्हा त्यांना त्वचा आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागांचा पिवळसरपणा (कावीळ) होते. यकृत बिलिरुबिन नावाच्या घटकावर(यकृतामध्ये तयार होणाऱ्या पाचक रसाचा एक घटक) प्रक्रिया करू शकत नाही तेव्हा ही समस्या निर्माण होते. नवजात बालकांमध्ये ही समस्या निर्माणहोते तेव्हा त्यांच्यामध्ये तोंडाच्या आकाराच्या तुलनेत बाळाची जीभ असामान्यरीत्या मोठी असणे, अंडरअॅक्टिव्ह थायरॉइडमुळे बाळाला सामान्यरीत्याश्वास घेण्यात अडचण येणे, बाळाचे असह्य, उग्र किंवा कठोर रडणे, तसेच बाळाच्या बेंबीच्या भागात सूज येऊन हर्निया होणे ही लक्षणे आढळून येतात.तर तीन महिने ते एक वर्षापर्यंतच्या अर्भकांमध्ये ही समस्या दिसून येते तेव्हा बाळाला योग्यरीत्या दूध ओढण्यास किंवा खाण्यात अडचण येणे ज्यामुळेवजन कमी होते, तसेच मलावरोध म्हणजेच या वयातील मुलांना होणारा मल कडक होणे व पोट साफ न होणे आदी लक्षणे दिसतात.

. हायपरथायरॉइडिझम  (अधिक क्रियाशील थायरॉइड):

शरीरातील संप्रेरक T3  आणि T4 याची मात्रा वाढते. तर TSH ची कमी होते तेव्हा हायपरथायरॉइडिझमची  स्थिती उद्भवते.हायपरथायरॉइडिझममध्ये थायरॉइड खूप जास्त संप्रेरक तयार करते, ज्यामुळे शरीरातील क्रिया अधिक गतिमान होतात.

लक्षणे : अधिक खाल्ल्यानंतरही वजन कमी होणे, गरम किंवा घामट वाटणे, हृदयाच्या गतीत वाढ होणे, चिंता किंवा चिडचिड वाटणे, हातथरथरणे, उठताना वा बसताना त्रास होणे आणि झोपण्यास अडचण ही हायपरथायरॉइडिझमची लक्षणे आहेत.

कारणे : याचे सर्वसामान्य कारण ग्रेव्हस रोग आहे. ही आणखी एक ऑटोइम्यून स्थिती आहे,
ज्यामध्ये शरीर थायरॉइडला खूप जास्त संप्रेरक तयार करण्यास प्रवृत्त करते. इतर कारणांमध्ये थायरॉइड ग्रंथीतील गाठी (थायरॉइड नोड्यूल्स) आणि थायरॉइड ग्रंथीच्या दाहाचा समावेश होतो.

. गलगंड (Goitre) :

तिसरा प्रकार म्हणजे थायरॉइड ग्रंथीला सूज येणे. याला गलगंड म्हणतात. हा आजार औषधांनी बरा झाला नाही, तर शस्त्रक्रिया करावीलागते. या आजारात बऱ्याच वेळा संप्रेरके सर्वसाधारण असतात.

थायरॉइडचे निदान :

जर तुम्हाला थायरॉइड विकाराची लक्षणे जाणवत असतील, तर थायरॉइड संप्रेरक स्तर तपासण्यासाठी रक्तचाचणी करण्यास डॉक्टरसांगतात. ऑटोइम्यून थायरॉइड स्थिती दर्शविणाऱ्या प्रतिपिंडेही (अँटीबॉडीज) डॉक्टर तपासू शकतात. काही प्रकरणांमध्ये, थायरॉइड ग्रंथीचाअल्ट्रासाऊंड आवश्यक असतो.

उपचार पद्धती :

थायरॉइड विकारांचे उपचार रुग्णाला हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम आहे यावर अवलंबून असतात.

हायपोथायरॉइडिझमवरील उपचार : सर्वात सामान्य उपचार म्हणजे दररोज थायरॉइड संप्रेरके बदलण्याची गोळी घेणे. ही गोळी रुग्णाच्याशरीराला कमी प्रमाणात तयार होणारे थायरॉइड संप्रेरक पुरवते ज्यामुळे रुग्णाच्या संप्रेरकाचा स्तर सामान्य होतो.

हायपरथायरॉइडिझमसाठी उपचार : या उपचारांमध्ये थायरॉइड संप्रेरकाचे उत्पादन कमी करणारी औषधे, किरणोत्सर्गी आयोडिन (ज्यामुळेथायरॉइडचा आकार हळूहळू कमी होतो) सुचवली जातात. आवश्यकता असल्यास थायरॉइड ग्रंथीचा एक भाग किंवा संपूर्ण ग्रंथी काढूनटाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. काही रुग्णांमध्ये हृदयाची गती जलद होते. अशा लक्षणांचे
व्यवस्थापन करण्यासाठी बीटा-ब्लॉकर्स ही औषधेदेखील दिली जाऊ शकतात.

थायरॉइड विकारांसह वजन कमी करण्याचे मार्ग :

* रुग्णाने आपली औषधे समजून घ्यायला हवी.

* पुरेसे पाणी आणि फायबर यांचे सेवन करणे.

* पुरेशी झोप घेणे.

* दररोज किमान ६० मिनिटे व्यायाम करणे.

* गॉइट्रोजेनिक (गुठळ्या तयार करणारी) अन्नपदार्थांचे सेवन मर्यादित करणे.

* प्रक्रिया केलेल्या अन्नाचे प्रमाण मर्यादित करणे.

* ग्लूटेन-फ्री आहार घ्यावा.

थायरॉइडमध्ये काय खावे?

जर तुम्हाला थायरॉइड असेल तर अंडी, नट, पूर्ण धान्य (whole grains) खाऊ शकता, पण त्यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करायला हवे.अंड्यामध्ये असणारे सेलेनियम थायरॉइड नियंत्रित करण्यास मदत करते. काजू खाल्ल्याने संप्रेरक संतुलन सुधारण्यास मदत होते. जरअशक्तपणा वाटत असेल तर त्याने संपूर्ण धान्यापासून बनवलेले पदार्थ खावेत.

थायरॉइडमध्ये काय टाळावे?

सोयाबीन किंवा डाळींमध्ये भरपूर प्रथिने असतात. थायरॉइडमध्ये प्रथिनांचे सेवन मर्यादित प्रमाणात असायला हवे. तुम्हाला हा आजारअसल्यास प्रक्रिया केलेले अन्न खाणे महागात पडू शकते. यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी आणखी वाढू शकते. या आजारात कॉफी, चॉकलेट, ब्रोकोली आणि फुलकोबी खाणे टाळले पाहिजे. या पदार्थांमध्ये थायरॉइडला उत्तेजित करणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे हा आजार वाढू शकतो.

थायरॉइड आनुवंशिक आहे की नाही?

थायरॉइड रोग हा आनुवंशिक असू शकतो, म्हणजेच तो जनुकांद्वारे पालकांकडून मुलांकडे जाऊ शकतो. थायरॉइड ग्रंथी शरीरातथायरॉइड संप्रेरकाची निर्मिती (हॉर्मोन) करते आणि या संप्रेरकाचे असंतुलन हे थायरॉइड रोगाचे मुख्य कारण असते. थंडी सहन न होणे, नैराश्य, थकवा आणि वजन वाढणे आदी थॉयराइड समस्येची लक्षणे आहेत.

संशोधनातून असे आढळून आले आहे, की थायरॉइड  संप्रेरकाचे उत्पादन जवळजवळ ६५% आनुवंशिकते‌द्वारे ठरते. याचा अर्थ असा आहे, कीकुटुंबात एखाद्याला हा आजार असल्यास (कौटुंबिक इतिहास) तुम्हाला हा आजार होण्याचा धोका वाढतो.

आनुवंशिक थायरॉइड विकार टाळण्यासाठी प्रभावी उपायः

* संतुलित आहाराचे पालन करा.

* आयोडीनचे सेवन योग्य प्रमाणात ठेवा.

* ताणतणावाची पातळी नियंत्रित करा.

* नियमित व्यायाम करा.

* पर्यावरणातील विषारी घटकांपासून दूर राहा.

* पुरेशी झोप घ्या.

* नियमित थायरॉइड तपासणी करा.

* धूम्रपान सोडा.

* तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

* गॉइटरजन्य खाद्यपदार्थांचे सेवन मर्यादित करा.

थायरॉइड विकारांसह जगणे :

योग्य उपचारांद्वारे, बहुतेक लोक थायरॉइड विकारासह सामान्य, निरोगी जीवन जगू शकतात. नियमित तपासणी आणि रक्त तपासणी यामुळेतुमचे उपचार योग्य पद्धतीने परिणाम करत आहेत ना ह्याची खात्री पटवता येते. तसेच यामुळे गरज असल्यास डोस बदलणे शक्य होते.

जर तुम्हाला थायरॉइड विकाराची कोणतीही लक्षणे जाणवत असतील, तर योग्य निदान व उपचारासाठी त्वरित डॉक्टरांची भेट घ्या. प्रारंभिकनिदान व उपचारांमुळे गुंतागुंत टाळणे शक्य होते. परिणामी, रुग्ण लवकर बरा होईल.

आपल्या एकंदर आरोग्याची काळजी घेताना थॉयरॉइडची पातळी नियंत्रणात ठेवणेही महत्त्वाचे आहे. यामध्ये काही कमीजास्त वाटल्यासडॉक्टरांकडे जायला / वैद्यकीय तपासणी करायला संकोचू नका.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. विनायक सावर्डेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.