भाताची कडबोळी | प्रणाल पोतदार, रायगड | Rice Kadboli | Pranal Potdar, Raigad

Published by प्रणाल पोतदार, रायगड on   February 1, 2022 in   RecipesTiffin Box

भाताची कडबोळी

साहित्य॒: २ कप भात, १/२ कप बेसन, १/४ कप ज्वारीचे पीठ, १/४ कप गव्हाचे पीठ, १ चमचा तिखट, १ चमचा धणेपूड, १ चमचा जिरेपूड, २ चमचे तीळ, १/२ चमचा हिंग,  १/२ चमचा हळद, ११/२ चमचा गरम तेल (मोहन), चवीनुसार मीठ, तळण्या-साठी तेल, सोबत खाण्यासाठी दही.

कृती॒: प्रथम भात मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न घालता अगदी बारीक वाटून घ्या. परातीत काढून घ्या. त्यात ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन, गरम तेल, तिखट-मीठ-हिंग-हळद, तीळ-धणेपूड, जिरेपूड टाकून गोळा मळून घ्या. पाणी न घालता वाटलेल्या भातात बसेल एवढेच पीठ टाका आणि घट्ट गोळा तयार करून तेलाचा हात लावून चांगले मळून घ्या. हाताने कडबोळ्या तयार करून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित मध्यम आचेवर तळून घ्या. गरमागरम कडबोळी दह्यासोबत खाण्यास द्या.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


प्रणाल पोतदार, रायगड