पनीर पिस्ता बर्फी | कालनिर्णय Instant Recipes

पनीर पिस्ता बर्फी

साहित्य :


  • ३०० ग्रॅम पनीर
  • २ वाट्या सोललेले पिस्ते
  • २ वाट्या दूध
  • 200 ग्राम पिठीसाखर
  • ४ टेबलस्पून तूप
  • १ टीस्पून वेलची पावडर
  • सजावटीसाठी बदामाची काप

कृती :


  • पिस्त्याचे बी दोन तास दुधात भिजवून ठेवावे त्यात टे फुलून येईल. मग दुधासह मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
  • पनीर हाताने मोडून त्यात पिठीसाखर मिक्स करावी. पिस्त्याचे मिश्रण त्यात घालून हे सारे पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
  • नॉनस्टिक भांड्यात तूप गरम करून हे मिश्रण त्यात घालावे. मंद आचेवर मिश्रण आळू द्यावे. आधी ते सैल होईल, मग आळेल.
  • मिश्रण सतत ढवळत राहावे. बर्फी सेट होऊ शकेल एवढे आळल्यावर ते खाली उतरवावे आणि त्यात वेलची पावडर घालावी. तुपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये हे मिश्रण सेट करावे. त्यावर बदामाच्या सळ्या भूरभूराव्यात.
  • बदामाचे साल काढू नका. हिरवट, पांढऱ्या बर्फीवर बदामाचे काप छान दिसतात.
  • आवडत असेल तर मसाल्याच्या मोठ्या वेलचीचे काही दाणेही या बर्फीवर घालता येतात. गार झाल्यावर बर्फी कापावी. ही बर्फी फ्रीजमध्ये ठेवून चार दिवस आणि बाहेर दोन दिवस राहते.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.