गावा डेलिकेसी (मॉकटेल) – शेफ निलेश लिमये

Published by शेफ निलेश लिमये on   May 31, 2019 in   2019Food Corner

गावा 


साहित्य : पेरू, ३ छोटे चमचे मध, २ छोटे चमचे लिंबाचा रस, चवीनुसार लाल मिरची पावडर आणि काळे मीठ, ८ पुदिन्याची पाने सजावटीकरिता

 

कृती : प्रथम पेरू स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याचे चौकोनी काप करावेत. पेरूचे काप गॅसवर गरम पाण्यात ८१० मिनिटांकरिता शिजवून घ्यावेत. थंड झाल्यावर शिजवलेले पेरू व थोडे पाणी घालून ब्लेंडरमधून ज्यूस करून घ्यावा. गाळणीने तो गाळून घ्यावा. ज्यूसच्या जारमध्ये पेरूचा ज्यूस, मध, लाल मिरची पावडर व काळे मीठ घालून एकत्र ढवळून घ्यावे. फ्रिजमध्ये थंड करायला ठेवावे. पुदिन्याची पाने घालून थंडगार ज्यूस सर्व्ह करावा.


शेफ निलेश लिमये