रोल्स | Rice Rolls | Rice Paper Rolls | Spring Roll Wraps | Rolls Rice

मँगो राईस रोल्स | समिता शेट्ये, रत्नागिरी | Mango Rice Rolls | Samita Shetye

मँगो राईस रोल्स

साहित्य : १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी तांदळाचे पीठ, ४ चमचे साखर, १/४ चमचा मीठ, २-३ चमचे तूप, ४ चमचे ड्रायफ्रूट्स, १ वाटी दूध, वेलची पूड, २ चमचे ओले खोबरे, हळदीची पाने, आवश्यकतेनुसार पाणी.

कृती : सर्वप्रथम एका भांड्यात तूप, दूध, पाणी व मीठ घालून उकळी काढून घ्या. उकळी आल्यावर तांदळाचे पीठ घालून दहा मिनिटे वाफवून घ्या. उकड थंड झाल्यावर पीठ मळून घ्या. आंब्याचा रस, साखर वाटून त्यात वेलची पूड, खोबरे व ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालून मिश्रण तयार करा. तांदळाच्या पिठाच्या पट्ट्या (चार ते पाच इंच) तयार करून सारण भरून रोल्स बनवा. हळदीच्या पानावर हे रोल वाफवून वरून ड्रायफ्रूट्स व साजूक तूप घालून सजवा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या


समिता शेट्ये, रत्नागिरी

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.