फेरेरो रोशर | बिंबा नायक | Ferrero Rocher | Bimba Nayak

Published by बिंबा नायक on   May 5, 2021 in   2021Dessert Special

फेरेरो रोशर हेझलनट

साहित्य : ११० ग्रॅम हेझलनट वेफर कुकी, १५० ग्रॅम हेझल नट, २०० ग्रॅम चॉकलेट स्प्रेड, २०० ग्रॅम चॉकलेट.

कृती : ओव्हन ३५०० फॅरे. (१८०० सेल्सिअस) तापमानाला प्रीहिट करा. बेकिंग शीटवर हेझलनट पसरवून ठेवा आणि दहा मिनिटे भाजून घ्या. ते ओव्हनमधून काढून घ्या. थंड होऊन त्यांची साले निघू द्या आणि बारीक कापून घ्या. त्यानंतर बिस्किटे, बदामांचे बारीक तुकडे एकत्र करा. त्यात चॉकलेट आणि हेझलची पेस्ट घाला आणि हाताने हे सर्व जिन्नस एकत्र करा. एका मोठ्या चमच्याच्या आकाराचा गोळा तयार करा. या मिश्रणाचे साधारण चाळीस बॉल्स होतील. ही संख्या आकारावर अवलंबून असेल. तुम्ही तयार केलेल्या मिश्रणाने गोळे होत नसतील, तर ते गोळे घट्ट व्हावे यासाठी पंचेचाळीस मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. चॉकलेट वितळवा आणि ते थंड होऊ द्या. गोळे फ्रीजमधून काढा व वितळविलेल्या चॉकलेटमध्ये घोळवा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


बिंबा नायक