आंब्याची साटोरी | निर्मला आपटे, पुणे | Mango Satori | Nirmala Apte, Pune

Published by निर्मला आपटे, पुणे on   May 7, 2021 in   2021Recipes

आंब्याची साटोरी

साहित्य : १ वाटी आंब्याचा रस, १ वाटी साखर, १/२ वाटी सुक्या खोबऱ्याचा भाजलेला कीस, १/२ वाटी ड्रायफ्रूट पावडर, १ वाटी मैदा, १/२ वाटी रवा, २ चमचे तूप (मोहन), चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तूप व आवश्यकतेनुसार पाणी.

कृती : सर्वप्रथम कढईत आंब्याचा रस व साखर घाला. मिश्रण थोडे आटल्यानंतर त्यात भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस व ड्रायफ्रूट पावडर घाला. मिश्रणाचा गोळा तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. दोन चमचे तूप फेटून त्यात रवा, मैदा व मीठ घालून चांगले मिसळा. पाणी घालून हे पीठ घट्ट मळून घ्या. तासभर झाकून ठेवा. पिठाचे छोटे गोळे करा. गोळ्याची पारी तयार करून त्यात तयार मिश्रण भरून पारी बंद करा. हलक्या हाताने थोडे दाबून साटोरी लाटा. तयार साटोरी तुपात तळा.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


निर्मला आपटे, पुणे