एनर्जी बार | बिंबा नायक | Energy Bar | Bimba Nayak

Published by बिंबा नायक on   May 26, 2021 in   2021Recipes

एनर्जी बार

साहित्य : १ कप काळ्या मनुका, १/२ कप पिवळ्या मनुका, ३/४ कप बटर / मार्गारिन, १/२ कप साखर, १ अंडे (ऐच्छिक), ११/४ कप गव्हाचे पीठ, १/४ कप टोस्टेड व्ही जर्म (ऐच्छिक), १/२ कप दुधाची पावडर, १/२ कप काकवी, १/२ कप बदामाचे काप, १ कप ओट्स, १/२ कप दूध, १/२ छोटा चमचा किसलेले आले, १/२ छोटा चमचा मीठ, १/२ छोटा चमचा बेकिंग सोडा, ११/२ छोटा चमचा बेकिंग पावडर.

कृती : प्रोसेसरमध्ये मनुका फिरवून घ्या. क्रीम, बटर, साखर, काकवी, अंडे, गव्हाचे पीठ, दुधाची पावडर, व्हीट जर्म, बेकिंग पावडर, सोडा, मीठ आणि आले हे सर्व साहित्य स्कीम मिल्कसह ब्लेंडरमध्ये एकत्र वाटून घ्या. त्यात ओट्स, मनुका आणि निम्मे बदाम घाला. हे मिश्रण १३ × ९ × २ आकाराच्या पॅनमध्ये ओता आणि पसरवा. त्यावर आता शिल्लक बदाम घाला. हे मिश्रण १८०० सेल्सिअस तापमानाला तीस मिनिटे बेक करा. पॅन थंड होऊ द्या. मग या मिश्रणाचे १ इंच × ४ इंच या आकारात बार (तुकडे) कापून घ्या.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


बिंबा नायक