आंब्याच्या सालीच्या पाकातील पुऱ्या | रामचंद्र मेहेंदळे, पुणे | Mango Peel Puri | Ramchandra Mehendale, Pune

Published by रामचंद्र मेहेंदळे, पुणे on   April 26, 2021 in   2021Recipes

आंब्याच्या सालीच्या पाकातील पुऱ्या

पुऱ्यांचे साहित्य : १/२ कप बारीक रवा, १ मोठा चमचा आंबट दही, २-३ आंब्याच्या सालांचा दुधात वाटलेला गर, १ मोठा चमचा साजूक तूप, चिमूटभर मीठ, तळण्यासाठी तेल.
पाकाचे साहित्य : १/२ कप साखर, केशर, वेलची पूड, १/४ कप पाणी, १/४ कप आंब्याच्या सालीला दुधात मिक्सरमध्ये वाटून गाळून तयार केलेले मिश्रण, पिस्त्याचे काप.

कृती : प्रथम रव्याला तूप व्यवस्थित चोळून चिमूटभर मीठ घाला. मग दही व आंब्याच्या सालांचा गर घालून रवा मळून घ्या. मिश्रण एक ते दीड तास झाकून ठेवा. त्यानंतर पाकात पाणी व पाव कप सालीचे गाळलेले मिश्रण घालून पाक करून घ्या. पाक चिकट झाल्यावर त्यात वेलची पूड, केशर घाला. रव्याच्या पिठाला तुपाचा हात लावून मळून घ्या. जाडसर व मोठी पुरी लाटून तळून घ्या. तळलेल्या पुऱ्या गरम पाकात उलटसुलट करून चाळणीत चाळून घ्या. पुरीवर पिस्त्याचे बारीक काप पसरवून घ्या.

अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


रामचंद्र मेहेंदळे, पुणे